नजरा
तो झोपेतच यंत्रवत पावले टाकणारा, तेल लावून चापून पाडलेला भांग, गळ्यात अडकवलेली water bag , आईच्या खांद्यावर त्याचे दप्तर , बेफिकीरपणे आई बरोबर पडणार्या पावलांत बूट, अंगात uniform , गळ्याला टाय.. आणि रोजचाच प्रश्न आज डब्याला काय? ,... बस stop वर तो आई बरोबर उभा !!
आणि तो बस stop च्या समोरच्या parking lot वर, अंगात half pant , आणि फाटलेला बनियन, चपला वैगरे चैन त्याला परवडण्यातली नव्हतीच, हातात फडका, लोकांच्या कार पुसत तो एकटा उभा ,...
त्यांची नजरा नजर होते: एक नजर बेफिकीर, झोपाळू,घाबरी आणि शाळेत सकाळी जायचे म्हणून काहीशी वैतागलेली,,..
मिसळपाव

