स्वामिनी
गविंच्या आदेशानुसार थोडं साध ललित लिहीता येत कां ते पाहतोय. किती जमलयं ते तुमच्या प्रतिसादांवरुन कळेलचं.
तिचे आणि माझे नाते, स्वामिनी आणि चाकराचे. पण ती खुप चांगली आहे, हिडीस-फिडीस नाही करत कधी. तिची अट एकचं असते निमुटपणे तिच्या आज्ञा पाळणे. त्यात कुठल्याही प्रकारची तडजोड चालत नाही तिला. मला तिचे सगळे मुड सांभाळायला लागतात. कारण मुळातच ती फार लहरी आहे. आणि तिच्या या लहरीपणामध्ये प्रचंड ताकद असते. त्या लहरींवर मी लाटेवरील कागदाच्या होडीसारखा असतो. तितकाच असहाय्य, तितकाच बिचारा.
मिसळपाव