कटलेल्या पतंगाकडे त्याच्यासोबत नाराज होऊन बघणारी , त्याच्या मदतीने उंच आकाशातले तारे मोजणारी, त्याला भिजवणारी ,त्याच्यासोबत भिजणारी ,त्याच्या मनातली असंख्य गुपितं जपणारी, दारुच्या बाटल्या लपवून घेऊन त्याच्या कटात स्वतःला सामील करुन घेणारी ,रात्रीच्या अंधारात त्याच्यासोबत दिवसभरातला उन्हं सावल्यांचा खेळही थांबवणारी ......गच्ची .
ठाण्याच्या आनंद टॉकिज मागे असणार्या तीन ते पाच मजली इमारतीच्या गर्दीत आमच्याही इमारती वसलेल्या .
जागेच्या भयाण, न सुटलेल्या प्रश्नाला जागलेल्या.