मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

!!! हाफ कटींग !!! .....

सन्दीप१२३३० · · जे न देखे रवी...
काव्यरस
बस्सsss , हवा टपरी वरचा हाफ कटींग सोबत दोस्तांची 'un -Scheduled' Meeting .. कॉलेजचे 'Boring Lecture' करू आम्ही 'Bunk' Canteen मधले खाऊ ते फास्ट -फ़ूड 'Junk' बस्सsss , हवा टपरी वरचा हाफ कटींग सोबत दोस्तांची 'un -Scheduled' Meeting .. ओफिसमधे Over-Time करू आम्ही काम बॉस ची खिटपीट पण ऐकू , सुबह -शाम.. बस्सsss , हवा टपरी वरचा हाफ कटींग सोबत दोस्तांची 'un -Scheduled' Meeting .. पंजाबी ढाब्यावर करू "Result Party"....३५ Percent ची आणि महागड्या हॉटेल मध्ये करू पार्टी 'Increment' ची बस्सsss , हवा टपरी वरचा हाफ कटींग सोबत दोस्तांची 'un -Scheduled' Meeting .. Corporate मध्ये होऊ मोठ्या पदावर अधिकारी वा , व्यवसायात मिळवू यश आकाशापरी.. आम्ही सोडणार नाही ती टपरी आणि तो हाफ कटींग जीवनात अनमोल स्थान असलेली आहे ती "Very Important Thing"..!! चलो इसी बात पे हो जाये एक........................ !!!! "हाफ कटींग" !!!! -संदीप सरदेसाई

वाचने 3179 वाचनखूण प्रतिक्रिया 17

अत्रुप्त आत्मा 02/02/2012 - 08:32
प्रॉडक्शन चालू आहे... ;-) प्रॉडक्ट तपासणीसाठी कस्टम अधिकारी वल्ली यांना पाचारण करणेत यावे...अशी इनंती करनेत येत हाये...(लै काम वाढलय हल्ली) नवकाव्य जिलबी संघ, चालक-श्री पात्तळपिठेश्वर तांबेवाले

In reply to by मी-सौरभ

सन्दीप१२३३० 02/02/2012 - 22:37
सौरभ दा.. हाफ कटींग ही द्विरुक्ती कशी काय बुवा? काही उमजले नाही हो...

In reply to by सन्दीप१२३३०

वपाडाव 03/02/2012 - 00:08
मित्रा, कटिंग म्हणजेच हाफ नव्हे का... मग हाफ कटिंग म्हणजे पाव चहा नाही का होणार... म्हणुन त्यास द्विरुक्ती असे म्हटले गेले असावे...

प्रचेतस 02/02/2012 - 09:39
बस हवा सलूनमध्ये आता एक हेयर कट डोक्यावर फिरवा जरा वस्तरा झट पट कॉलेजमध्ये करतात स्टाईल्स वेगवेगळ्या मग मीच का उगाच आता राहू येडागबाळ्या बस हवा सलूनमध्ये आता एक हेयर कट डोक्यावर फिरवा जरा वस्तरा झट पट ऑफिसात आम्ही आता करूच कमी काम सलूनमध्येच आता वेळ घालवत राहू जाम बस हवा सलूनमध्ये आता एक हेयर कट डोक्यावर फिरवा जरा वस्तरा झट पट तेल मालिश करूनी अंग घेऊ रगडून सलूनमध्ये जोरदार टाकू बिल फाडून बस हवा सलूनमध्ये आता एक हेयर कट डोक्यावर फिरवा जरा वस्तरा झट पट कार्पोरेट मध्ये जरी होऊ मोठे अधिकारी तरी सलूनशी नाळ कधी तुटणारी नाही आम्ही सोडणार नाही ते सलून आणि हेयर कट कपाळावर उभरली आहे केसांची ती एक बट चलो, इसी बात पे हो जाये एक.....!!!हेयर कट!!!

In reply to by प्रचेतस

सन्दीप१२३३० 02/02/2012 - 22:57
क्या बात है वल्ली काका .... :-) हेअर कटिंग चे सुंदर विडंबन पाहून चेहऱ्यावर आली स्माईल.. सलून चे दर्शन करविलेत, वाचल्यानंतर बदलून गेली हेअर स्टाईल ..!!! :)) प्रातिधानिक, विडंबनात्मक, अतिहास्यास्पद, सद्सतविवेकी, घ्रुणाहीन, कृपाभिलाषी, आसक्त आणि आशावादी अशा द्विरुक्तीबद्दल धन्यवाद.. सादर प्रणाम !!

In reply to by स्पा

सूड 02/02/2012 - 23:28
हल्ली स्पाकाकांचे डोळे ज्या फ्रिक्वन्सीने पाणावतात त्याने कल्याण मनपाचा पाण्याचा प्रश्न सुटायला हरकत नाही. ;)