मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राहणी

सुसंवाद

सुचेता ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजपर्यंत खुपदा असे पहावयास मिळ्ते कि एखाद्या कल्पनेवर एखादी स्त्री काय लिहु शकेल ? असा विचार करुन लेखकांनी लिहलेले आहे, म्ह्नणुन सहज च असा विचार आला कि पुरुषांच्या जिव्हाळ्याच्या या विषयावर मी त्यांच्या नजरेतुन काही वेगळे लिहु शकेन का? जिव्हाळ्याचा विषय म्हणले तर सहजच आठ्वते ती मदीरा किंवा चेतन्यनलिका... खुप सहज पणे या सवयीवर येता जाता ताशेरे मारले जातात... तर या विषयावर पुरुषांना काय वाटत असावे... जर घरात सुसंवाद असेल तर कदचीत या प्रकारचे नेराश्य कमी होउ शकेल...या अर्थाची ही १ मुक्त कविता... अशाप्रकारचे लिह्ण्याचा पहिलाच प्रयत्न चु.भु.दे.घे.

(बोल)

बेसनलाडू ·
काहीच का गं कळत नाही तुला माझ्या पोटातलं? नेहमीच तो मोबाइल घेऊन तासन् तास बसायचं! मैत्रिणींना सांगायची ती दुसर्‍यांची लफडी नी कथा जाणशील तरी कधी तु माझ्या पोटातली व्यथा? मला म्हणे फोनवर बोलता येत नाही कधी केला असाच लाडाने तर एक 'हॅलो' पण येत नाही? म्हणे सांगायला कशाला हवं? समजायचं असत ते! काय समजू मी की मेली तुझी भुक आहे? अकलेचे तारे तोडायचं नको बोलू ते सर्व माहीतच आहे पण 'लगेच ठेवुन पोळ्या करते' हे वाक्य काय अवघड आहे ? प्रेरणा: जागुताईंचे बोल

(पाहिजे वीकांत मोठा)

बेसनलाडू ·
पाहिजे वीकांत मोठा पाहिजे सोडा, टकीला पाहिजे वोडका थोडी पाहिजे पोकर, पसारा होउ दे मग रात्र कितिहि डाव हा खेळून जाउ विसरुनी त्या सायबाला उद्विग्नता उधळून देउ मिटुनि तू डोळे तुझे रे पापडी भरपूर खाशी सोबतीला श्रिम्प थोडे तू बशा घेऊन बससी छेडुनी कोणा सखीला हास्यकल्लोळात बुडवु विसरुनी त्या सायबाला उद्विग्नता उधळून देउ तृप्तता नरड्यात थोडी तृप्तता लीवर् मधेही शांतता विश्वात सार्‍या शांतता खोलीमधेही सटकताना रामप्रहरी काहिशी चलबिचल व्हावी झोपलेल्या बांधवांची थोडिशी चुळबूळ व्हावी सोमवारी ब्याद परते शुक्रवारी चाट देउ विसरुनी त्या सायबाला उद्विग्नता उधळून देउ प्रेरणा: मित्रमंडळींचे शुक्रवार-शनिवार-रवि

ग्वाल्हेरी मराठीचा लहेजा

भोचक ·
माझ्याच कार्यालयात काम करणार्‍या ग्वाल्हेरच्या अरूंधती आमडेकर या मराठी मुलीने लिहिलेला हा लेख. दिल्लीला जवळजवळ खेटलेल्या ग्वाल्हेरमध्ये मराठी कोणत्या रूपात नांदतेय ते आपल्याला कळेल. भाषाचा संपूर्ण लहेजा तिथलाच आहे. फक्त वाक्यरचना वाचण्यास सोपी जावी म्हणून तेवढी संपादीत केलीय. बाकी शब्द वगैरे तेच ठेवलेत. 'अरे, यार दादा तूने आज फि‍र मेरा पेन ले लि‍या. आई देख ना इसको. बाबा आपके लि‍ए चाय बनाऊ? माझं एवढं बोलण झालं की बाबांचा चेहरा बघायसारखा असतो. "हुम्म, हे काय चालू ए अरुंधती‍ तुझं. कि‍ती वेळा सांगायचं की‍ घरात तरी मराठीत बोलत जा. आता कॉलेज झालं ना तुझं.

तो व मी - लफडा अनलिमिटेड.

दशानन ·
तो- अरे बाबा खुप सुखी आहेस रे. मी- कारे असं का वाटलं तुला ? तो- तुझं लग्न झाले नाही ना त्यामुळे. मी- अच्छा.. म्हणजे ज्याचे लग्न नाय झालं तो सुखी ? तो- नाय तर काय.. परवाची गोष्ट तो व्ही-डे काय विसरलो घरात महाभारत चालू आहे, तीने मला धुतला. मी- तु व्ही- डे विसरलास लेका ? चांगले केले धुतला ते. तो- अरे कामाच्या रगाड्यात विसरलो त्यात काय येवढे..३६४ दिवस प्रेम व्यक्त करतोच ना मी काही ना काही तरी करुन. मी- काय झालं व्यवस्थीत सांग. तो- शनिवारी सकाळी तीने मला हसून चहा दिला बेड वरच. मी- मग, तु काय केलं. तो- नेहमी पेक्षा त्यात साखर जास्त होती, म्हणून मी म्हणालो साखरेचे भाव खुप वाढले आहेत..

मैने प्यार किया

बेसनलाडू ·
लेखनप्रकार
प्रेमाच्या बाबतीत तर मला पाडगावकरांचं 'तुमचं आमचं अगदी सेम असतं', हे मुळीच पटत नाही. म्हणजे प्रत्येकाचं प्रेम त्याच्या किंवा तिच्यासाठी इतकं जिवलग आणि खास असतं की ते इतर कुणासारखं होऊच शकत नाही. मग त्यात फोनवरचं तासन् तास बोलणं असो; समुद्रकिनार्‍यावर एकत्र हिंडणं, एकत्र खाल्लेली भेळ किंवा भुट्टा किंवा 'कच्ची कैरी'चा गोला असो; की क्लासला ज़ातो/ते आहे सांगून बागेत भेटणं असो. सगळं अगदी स्पेशल आणि इतरांपेक्षा वेगळंच असतं.

(फुकट सकाळ)

बेसनलाडू ·
(आमच्या घरात दर शुक्रवारच्या मित्रमंडळी आयोजित 'पोकर नाईट' नंतर शनिवारी सकाळी सगळे काही/सगळे जण ठप्प होते/होतात. अशा एका शनिवार सकाळचे हे चित्र) फुकट सकाळ *** कुठे कोण पडले पहाटे बघितले कि वातावरण स्तब्ध नि:शब्द होते सुटीच्या सकाळी असावे तसे हे पहा फक्त पेले रिकामे रिकामे *** नि ओट्यावरी आकृत्या बाटल्यांच्या (नि सोफ्यावरी मित्रही सांडलेले!) अकल्पित जशी गूढ पिशाच्चे असावीत निघाले धुराचे किती लोट होते फुप्फुसातुनी? घाबरा जाहलो मी *** आधारीतः धुकट सकाळ

आमच बी क्वाश्चुम डिजाइन

प्रकाश घाटपांडे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आमच बी क्वास्चुम डिझाईन
तर काय सांगत व्हतो मी. हां आमी कापड घाल्तो ती सोताच उन थंडी वारा पाउस या पासुन सौरक्षन व ल्वॊकांच लज्जा रक्षन याच्यासाटी. आता कापडाच्या आत समदीच मान्स भोंगळी असत्यात म्हनून काय भोंगळ फिरायच? आता यकदा आमची प्यांट लाग्ली गळायला. पट्टा घालायला लागला. लै़च वैताग यायला लागला. मंग आमी ती प्यांट घालन सोडुन दिल. दुसरी प्यांट घालायला लाग्लो. तसे आमी कंच्या बी प्यांटवर कंचा बी शर्ट घालतोय. कापडं घालतोय ह्य काय थोडयं का? काही दिवसांनी ही प्यांट टाईट व्हायला लाग्ली.

एक सकाळ - मुंबईतली आणि अमेरिकेतली

आनंद घारे ·
लेखनप्रकार
गेले सोळा आठवडे अमेरिकेत राहून नुकताच मी मायदेशी परत आलो. साहजीकच मला अमेरिका कशी वाटली असे लोक विचारतात, त्याचे उत्तर काय द्यावे याचा विचार पडतो. तिकडे ज्या गोष्टी चांगल्या वाटल्या त्यांना त्या चांगल्या आहेत असे कोणी म्हंटले की "तंकडचं सगळं लय भारी हाय हे आयकून आमाला आत्ता कंट्टाला आला हाये!" अशी प्रतिक्रिया एकाद्याकडून येते किंवा त्याचा बादरायण संबंध आपली संस्कृती, अस्मिता वगैरेशी जोडून राष्ट्राभिमान, देशभक्ती, धर्मनिष्ठा वगैरेवरले बौध्दिक दुसरा कोणी सुरू करतो.