मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रवास

२६ जुलै २००५ एक अनुभव !!

अमोल केळकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आता काही दिवसात पाऊस चालु होईल. पावसाळा हा सर्वांना आवडतो. माझ्यासकट सर्वांच्या रम्य आठवणी पावसाशी निगडीत असतात मग ते पावसात मनसोक्त भिजणे असो वा केलेला एखादा सुंदर प्रवास असो. २६ जुलै २००५ पासुन मात्र मुंबईकरांना पाऊस म्हणले की एक प्रकारची सुप्त भीती वाटू लागली आहे. 'न भुतो न भविष्यती!' अशा प्रकारचा झालेला पाऊस जो मी अनुभवला तो शेअर करण्याचा एक प्रयत्न .

मुंबई ते मैसूर

आनंद घारे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्वतः हे सुंदर शहर पाहण्यासाठी किंवा दुस-या कुणाला दाखवायच्या निमित्याने ते पुनः पाहण्यासाठी मी पूर्वी तीन चार वेळा मैसूरला एक पर्यटक म्हणून येऊन गेलो होतो. त्यातल्या प्रत्येक वेळी इथली प्रेक्षणीय स्थळे एकामागून एक पाहून पुढचे ठिकाण गांठण्यात थोडी घाईगर्दीच झाली होती. त्यासाठी इकडून तिकडे फिरतांना शहराचा जेवढा भाग दिसला होता तेवढा पाहूनच हे गांव माझ्या मनात भरले होते. कधी काळी आपण इथे रहायला येऊ शकू अशी शक्यता त्या वेळेस स्वप्नातसुध्दा दिसत नव्हती त्यामुळे इथल्या रहिवाशांचा थोडा हेवाच वाटला होता.

त्या गुर्जरनगरी: ओळख

ऋषिकेश ·
लेखनप्रकार
नुकताच कुठे अमेरिकायण संपवून मायदेशी परतलो होतो. बर्‍याच दिवसांनी आईच्या हातचं रुचकर जेवण नशिबी येत होतं. त्याशिवाय मित्रांबरोबरचं पूर्ववत फिरणं (खरंतर भटकणं- अगदीच खरं सांगायचं तर उंडारणं), विकेंडला १-२ चित्रपट, हळूहळू येऊ लागलेले आंबे वगैरे गोष्टींचा आनंद मनापासून घेत होतो. अमेरिकेत राहून ज्या स्थळांच - व्यक्तींचं - प्रसंगांचं महत्त्व नव्याने कळलं होतं त्या सार्‍या स्थळांना-व्यक्तींना-क्षणांना नव्याने भेटत होतो. लोकलची गर्दी , धूळ, कचरा या गोष्टीही माझ्या आयुष्याचा भाग मोठ्या सहजतेने बनू लागल्या होत्या. थोडक्यात सारं काही आलबेल होतं.

नायाग्रा चित्रदर्शन

कोलबेर ·
लेखनविषय:
अमेरिकेला जाणार्‍या भारतियांना सगळ्यात मोठे आकर्षण असते ते नायाग्रा धबधबा बघण्याचे आणि त्यामुळेच कधीही इथे गेले तरी भारतीय लोकांची प्रचंड गर्दी बघायला मिळते. (ह्याचा फायदा असा की इथे अगदी ढाब्या पासून गाड्यांपर्यंत भारतीय खाण्याची रेलचेल असते. :) ) मागच्या वर्षी ह्याच सुमारास नायाग्राला भेट देऊन आलो होतो. अमेरिका आणि कॅनडा अश्या दोन देशांच्या सिमेवर बसलेला हा प्रचंड धबधबा. व्हिसाच्या कटकटी मूळे त्यावेळेस फक्त अमेरिकेच्या बाजुने जेवढे बघता आले तेवढे बघीतले ह्यावर्षी योगायोगाने बरोबर त्याच सुमारास कॅनडातील टोरांटोला गेल्याने कॅनडाच्या बाजूने हा धबधबा पहायला मिळाले.

सारे प्रवासी गाडीचे

भोचक ·
लेखनप्रकार
परशुरामची झोप मोडू नये म्हणून भुंग्याने पार मांडी फोडली तरी कर्णाने हु की चू केले नव्हते, असे म्हणतात. तद्वतच मध्य प्रदेश नामे राज्यात सार्वजनिक प्रवास करण्यासाठी कमीतकमी एवढी तरी सहनशीलता हवीच. सहनशीलतेची परीक्षा वा कसोटी पाहणारे प्रसंग आपल्या आयुष्यात अधून मधून येत असतील, पण या बाबतीत आपल्या लोकांना अधिक मजबूत करणेसाठी मध्य प्रदेश सरकारने कायमस्वरूपी सोय केली आहे, ती वाहतुकीच्या खासगीकरणाच्या रूपाने. आपल्याकडे 'यष्टी'च्या खासगीकरणाची आरोळी आली की सगळे कर्मचारी एकत्र येऊन शड्डू ठोकून उभे रहातात.

भक्ति-शक्ति

झकासराव ·
लेखनप्रकार
भक्ति शक्ति- निगडि येथील हे शिल्प. अर्थात हे पुर्ण शिल्प नाही. ह्याची कल्पना छान आहे. शिवाजी महाराजांच्या मागे मावळे आहेत आणि तुकाराम महाराजांच्या मागे वारकरी आहेत. आणि त्यांची भेट अस शिल्प आहे. हे पुर्ण शिल्प मला एकत्रीत कॅमेर्‍यात बंदिस्त नाही करता आल. त्याला कसलेला आणि अनुभवी छायाचित्रकार हवा :) ध्यास घेवुन आभाळाएवढी कामगिरि करणार्‍या ह्या दोन महामानवाना वंदन करतो.