माझी फोटोग्राफी - महाबळेश्वर.....
नमस्कार मंडळी.......
कालच्या फोटोंना दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद........ :)
खूप छान वाटलं सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून..........
तुमच्या प्रशंसेने प्रेरित होऊन काही फोटो टाकते आहे....
आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो तिकडचे फोटो......
आशा आहे हे पण फोटो तुम्हाला आवडतील.......
मिसळपाव
दुपारी थोडे उन्ह पडल्यावर...........
चतुर. एक साधा किटक. पण थेट काही दशके मागे नेणारा. शाळेतले दिवस आठवायला लावणारा. फुलपाखरे, टाचण्या आणि चतुर हे विशेष कुतुहलाचे विषय. काही मुले फुलपाखरे पकडायची व बाटलीत ठेवायची. मग ती मेल्यावर पंख पुस्तकात घालायचे! हा प्रकार मला कधीच आवडला नाही. त्या काळी प्रकाशचित्रणाचा नाद नव्हता आणि अक्कलही नव्हती (अजुनही नाहिये म्हणा; पण हातात क्यामेरा तर आहे?)
मला चतुर आणि टाचण्या अधिक आवडायच्या. चतुर बरे. दबकत जाऊन पकडायचे आणि शेपटाला बारीक घागा बांधुन पतंगासारखे उडु द्यायचे.

२. पक्ष्याच्या डोळ्यातून (bird's eye view :) )
.
.
(फिरता प्राणी) बबलु-अमेरिकन...