कितीक दिवस हे
लेखनविषय:
काव्यरस
कितीक दिवस हे दुरुन दुरुन पहाणे
मनातिल गुपीते सारीत सारीत बोलणे
सोंग हे पांघरुन
गुज मनी दडवून
उगीच उगीच हासणे
कितीक दिवस हे...
हले ना ओठ जरी भाषेचा आड काही लपत्ये
श्वासांची माळ तुझी कुणाचे नाव उरी जपत्ये,जपत्ये,जपत्ये
कसल्याशा कळेला दाबीत दाबीत जगणे
कितीक दिवस हे...
सुनेसे गाव जसे, मनात भाव तसे दाटले
भवती भिड जरी,एकटा जीव असे भासले,भासले,भासले
आपुल्याच जीवाला जाळीत जाळीत रहाणे
कितीक दिवस हे...
फुटु दे बांध आता, मुखाचे बंध से सुटू दे
भारला सूर उरी, जाऊ दे पार नभी भिडू दे, भिडू दे, भिडू दे
हवे हवे असताना टाळीत टाळीत वागणे
कितीक दिवस हे...
गीत -- कौस्तुभ आपटे
हे गाणे खालील लिंकवर ऐकू शकता
http://soundcloud.com/kaustubh-apte/kityek-divas-he-mp3
आवड्ल्यास http://www.facebook.com/AseSphuraveGeet या फेसबूक पेज ला जरू लाईक करा.
वाचने
2592
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
अगतीक..
छानच आहे आवाज कौस्तुभ .
कितीक दिवस हे दुरुन दुरुन
In reply to कितीक दिवस हे दुरुन दुरुन by श्री गावसेना प्रमुख
+१
In reply to +१ by १००मित्र
ही ही ही
सर्वांचे धन्यवाद !
एक खुस्पटवजा सूचना-
In reply to एक खुस्पटवजा सूचना- by बॅटमॅन
लपत्ये
In reply to लपत्ये by तिमा
फक्त लय भारी
In reply to लपत्ये by तिमा
अपत्ये लै खुपत्ये
In reply to अपत्ये लै खुपत्ये by अभ्या..
@अपत्ये लै खुपत्ये>>>ए. मी
In reply to लपत्ये by तिमा
(अपत्ये) लेकुरे उदंड झाली |