अंतर
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about अंतर
- 6 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
कितीक हळवे…. कितीक सुंदर
किती शहाणे अपुले अंतर
आत्ताच ह्या गाण्याच्या ओळी ऐकल्या…..अगदी आत पर्यंत भिनत गेल्या. दोघांमधले हे अंतर कितीवेळा असे शहाणे असते….!! कधी हे अंतर अगदी आरपार छेदून जातं तर कधी युगं लोटून जातात पण पार करता येत नाही. कधी हे अंतर ..अंतर वाटतंच नाही. इतकी दोघं एकमेकांच्या जवळ येतात. एकदा ही जवळीक साधली की मात्र बाकीचे फार दूर वाटायला लागतात. कधी एकमेकांच्या जवळ पोचायला सुद्धा कोणी तरी बांधून दिलेल्या पुलाची….सेतूची गरज लागते. कित्येकदा तो बांधून दिलेला पूल मोडकळीस येतो….. त्याला गोंदण-शिंपण करुन नेटका करता करता जीव मेटाकुटीला येतो.