राती आभाळ रडलं

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
राती आभाळ रडलं अंधारी नाही दिसलं जीर्ण न शीर्ण वसन काजळले माझे सदन वटवॄक्ष मायेचा वठला झरा वाळवंटी आटला या नीरव रेतीमधले टोचतात निवडूंगी भाले मन छिन्न न खिन्नही आभाळी नक्षत्रही नाही या सांजसयीच्या प्रहरा शोधिते तो सायंतारा ..!! अनिल

स्वामी अभिनयाचा `ऑफर'विना भिकारी!

लेखनविषय:
लेखनप्रकार
http://saknsak.files.wordpress.com/2007/12/qayamat_wpaper2.jpg चि त्रपटसृष्टी फार निर्दय आहे. ती नको त्याला डोक्‍यावर बसवते आणि गरज असेल त्याला बाहेर फेकून देते. याच नियमानुसार एका अतिशय गुणी, प्रतिभावंत कलाकारावर सध्या अन्याय होतोय. गेली काही वर्षं तो पडद्यावर फारसा दिसत नाहीये. पडद्यावर काही वेळा दिसतंय, ते फक्त त्याचं नाव. तो आता (अभिनयाला कंटाळून की काय?) निर्माता झालाय. "खेल', "रक्त', "भागम्‌ भाग', "मिशन इस्तंबूल'सारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे (म्हणजे परदेशात चित्रित झालेले) चित्रपट त्यानं काढलेत. एखादा अपवाद वगळता ते फारसे कुणाला माहीत असण्याची शक्‍यता नाही, हा भाग वेगळा.

वादळ आता माणसाळतंय......

लेखनविषय:
उधळत, उसळत,-- थैमान घालणारं, वादळ आता माणसाळतंय...... उजाड झाले आहेत किनारे आणि निर्मनुष्य झाल्या आहेत वस्त्या पाऊलवाटा शोधताना स्वतः मधेच हरवलंय पण तरीही .......... वादळ आता माणसाळतंय ! एकाकी वृक्षावर विस्कटलेलं घरटं सावरण्यासाठी -----काडी काडी शोधतंय कारण वादळ आता माणसाळतंय! उगारलेले हात जोडण्यासाठी दुरावलेली मनं सांधण्यासाठी आकांतानं तळमळतंय कारण वादळ आता माणसाळतंय! राख पसरली आहे आकांक्षांची आणि उरले आहेत काही कोळसे ....... माणुसकीचे उजाडलेल्या जमिनीवर, हिरवी पात शोधतंय कारण वादळ आता माणसाळतंय! उरल्या नाहीत कसल्या खुणा अन दीपस्तंभही कोसळलेले स्मशानवाटेवर...

आहे आणि नाही असा!

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आहे आणि नाही असा! . संतत पडणारा पाऊस.. आहे आणि नाही असा! पाना पानावर ओलावा.. आहे आणि नाही असा! एकच थेंब खरा.. इथे तिथे विखुरलेला.. भुरभूर वारा; बोचरा, कापरा! थरथरती फांदी; झटकत पानांना..? टिप्प... एक थेंब; थेंबांना जोडणारा.. एक थेंब; थेंबांनी जोडलेला... आहे आणि नाही असा!!! =================== स्वाती फडणीस......... ०४-०८-२००८

एक हट्टी "देशप्रेमी'

लेखनविषय:
लेखनप्रकार
...तरीही "भारतकुमार' विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तो पुन्हा कपाटातल्या "ओम शांती ओम'च्या सीडीपाशी गेला. सीडी काढून त्यानं खिशात टाकली अन्‌ थेट न्यायालयाचा रस्ता धरला. विक्रमादित्य चालत असताना सीडीतून शाहरुख नावाचा वेताळ बाहेर आला. ""काय रे मिळतं तुला बॉलिवूडच्या बादशहाला त्रास देऊन? प्रसिद्धी?'' वेताळानं विचारलं. विक्रमानं चेहऱ्यावरचा हात हलकेसे बाजूला केला. वेताळ आणखी कावला. म्हणाला, ""बरं, असो. एक गोष्ट ऐक! आटपाट नगराचा एक राजा होता. तो काही राजघराण्यात जन्मला नव्हता.

तुला खात्री आहे?

लेखनविषय:
भोवती बघ.. थोडं तु खाली बघ इथे दिसणारे चेहरे बघ... तुला खात्री आहे?तुला इथेच पोचायचं होतं? हे तुझ्या भोवतीचे मित्र... पण हे आहेत का "खरे" मित्र? ते करतील का तुझ्यावर माझ्याइतकं प्रेम? तुला खात्री आहे? तुला इथेच पोचायचं होतं? तु "हे" आयुष्य जगायच्या इतक्या घाईत आहेस त्यासाठी इतक्या वेदना दिल्यास.. दुखावलं आहेस भोवती बघ.. अगदी नीट बघ फक्त दोघे..तु आणि मी तुला खात्री आहे? तुला इथेच पोचायचं होतं? माझ्या अश्रुंमुळे मन वळवू नकोस, मी रडत नाहि... हे अश्रु हल्ली माझा भाग झाल्यासारखे वाटतात भोवती बघ.. अगदी नीट बघ सगळ्या भोवतालच्या सवयीच्या लोकांना बघ तुला खात्री आहे?

`नावा'त काय आहे?

लेखनविषय:
लेखनप्रकार
राजधानीतील महाराष्ट्र सदनातल्या दालनात नारायण राणे अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होते. त्यांना आज त्यांचे हे नेहमीचे दालन मिळण्यास उशीर झाल्याने ते वैतागले होते. त्यातून तिथल्या कर्मचाऱ्यानं "साहेब, परवाच तर येऊन गेलात ना? मग आत्ता परत कसे? काम झालं नाही का?' असा उद्धट प्रश्‍न विचारल्यानं राणे आणखी अस्वस्थ झाले होते. गेल्या सहा महिन्यांसाठी आणि पुढच्या सहा महिन्यांसाठी हे दालन बुकच करून ठेवलं असतं, तर बरं झालं असतं, असा विचार त्यांच्या डोक्‍यात चमकून गेला.
Subscribe to मुक्तक