राती आभाळ रडलं
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
राती आभाळ रडलं
अंधारी नाही दिसलं
जीर्ण न शीर्ण वसन
काजळले माझे सदन
वटवॄक्ष मायेचा वठला
झरा वाळवंटी आटला
या नीरव रेतीमधले
टोचतात निवडूंगी भाले
मन छिन्न न खिन्नही
आभाळी नक्षत्रही नाही
या सांजसयीच्या प्रहरा
शोधिते तो सायंतारा ..!!
अनिल
वाचने
1935
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
व्वा!!!
सुरवातीला..
मस्त
आवडली