(करमणूक)

सन्जोपरावांची 'मिरवणूक' बघून आमची करमणूक झाली आणी हे विडंबन प्रसवले! ;) गणपतीबाप्पा मोरया!!

कधी रे येशील तू... अनामिका....

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
पुनवेच्या चंद्राला नभी शोभतसे, शुभ्र चंद्रिका यमुनेच्या तीरी साद घाली, हरीची मुग्ध सानिका ऐकुनि ते सूर, नुपुरे झंकारित येई वेडी राधिका येई त्वरेने, नजरा चुकवित, परि नसे ती अभिसारिका परमात्म्याची ओढ तिला, ती होय अलौकिक साधिका दिव्यत्वावरि प्रीती करी, ती हरीची प्रियतम प्रेमिका दोन ह्रदयांचे पाहुनि मिलन, मोहुनि जाती वृक्ष-लतिका साक्ष आहे, या अमरप्रेमाची, वृंदावनातील मधु-मल्लिका सांगे मजला ही स्नेहकथा, जाईची अबोध कलिका झुरते मी वेड्या राधेपरि, कधी रे येशील तू... अनामिका....

कथा कढईभर शिऱ्याची!

लेखनविषय:
लेखनप्रकार
खाण्याशी सख्य लहानपणापासूनच जडल्यामुळे आणि कुणी मखरात बसवून आवडीचे पदार्थ करून खायला घालण्याची शक्‍यता नसल्यामुळे मुदपाकखान्यात स्वतःचं कौशल्य आजमाविण्याविना पर्याय नव्हता. उपाशी राहायला लागणार नाही, एवढा स्वयंपाक इयत्ता नववीत असल्यापासूनच यायला लागला होता. दहावीत असताना तर त्यावर कडीच झाली. तेव्हा रत्नागिरीत राहत होतो. दहावीचं महत्त्वाचं वर्ष होतं. वर्षभर थेटरात जाऊन चित्रपट न पाहण्याचं पथ्य वगैरे (आई-वडिलांच्या धाकामुळे का होईना,) पाळलेलं. अभ्यासाचं "शिवधनुष्य' पेलताना खांद्याचे पार वांधे झालेले. त्यातून नेमकं फेब्रुवारी का मार्च महिन्यात आत्तेबहिणीचं पुण्यात लग्न ठरलं.

(म्हातारचळ म्हातारचळ)

अनिरुद्ध अभ्यंकर 'दूर पळ दूर पण' सांगताना बघितले आणि आमच्या मनात आजूबाजूची वेगवेगळी चळिष्ट चित्रे साकारली! ;) खोकत खोकत पहाता पहाता उठते जेव्हा एक कळ मन माझे म्हणते तेव्हा म्हातार चळ म्हातार चळ एरंडाचं पान माझ्या टाळू वरुन ढळलं नाही काशाची ती वाटी गं उष्मा अंगचा सरला नाही खिडकीमधे आज पुन्हा दिसलं आहे 'मृगजळ' मन माझे म्हणते तेव्हा म्हातार चळ म्हातार चळ समोरच्या घरामधे अशी एक रात्र येईल नजर तेव्हा माझी अगदी पहा धुंद होऊन जाईल वासनेच भूत नुसतं शरिरात नाही बळ मन माझे म्हणते तेव्हा म्हातार चळ म्हातार चळ चतुरंग

एक छोटी कविता (तक्रारवजा)

Taxonomy upgrade extras
माझ्या मुलीने मागील वर्षी केलेली एक कविता. मी जास्त वेळ ऑफिस मधे घालवतो आणि सुट्टिच्या दिवशी खेळायला जातो ह्याची तक्रार आहे इथे -

फांसे

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
सापशिडीच्या खेळात '९८' च्या सापाला चुकवायचं आहे कवड्यांच्या खेळात 'तीन पाय कुत्रं' टाळायचं आहे 'पांच, तीन दोन' मध्ये कुणाचेतरी हात ओढायचे आहेत 'नाठेठोम' मध्ये अजुन, सगळ्या जोड्या जिंकायच्या आहेत कॅरम मध्ये कधीतरी, क्वीनचे 'कव्हर' घ्यायचे आहे आयुष्याच्या 'ल्युडोत' अजून सहाचे 'दान' पडायचे आहे !

(...आदिम घास...)

हा थरकाप उडवणारा...आदिम ध्यास.. हीच आमच्या आदिम घासामागची प्रेरणा! ;) ...आदिम घास... ================================ अमूर्त अनाकलनीय कवितांपासून.. लपूनछपून.. स्वत:ला वाचवत.. फिरत होतो, अगदी तेव्हापासून! मी टाळत होतो... प्रत्येक असह्य कविता... जीवघेण्या प्रतिकांतून.. उपमांच्या कराल जबड्यांतून.. थरकाप उडवणार्‍या रुपकांपासून.. दूर.. दुबळ्या वाचकासारखं जगत..! त्याच विडंबनाच्या ध्यासापोटी.. दुर्बल वाचकाचा लेखक झाला.. लेखकाचा झाला विडंबक... लेखणीत चळ, शब्दात घोळ असलेला... चक्रम.. विक्षिप्त..! आणि त्या बरोबरच जन्माला आली.. वक्रोक्तीतली हूल...

...आदिम ध्यास...

लेखनविषय:
...आदिम ध्यास... ================================ अजस्र अवाढव्य श्वापदांपासून.. लपूनछपून.. स्वत:ला वाचवत.. फिरत होतो, अगदी तेव्हापासून! मी शोधत होतो... एक सुसह्य विश्व... जीवघेण्या पंज्यांतून.. मृत्यूच्या कराल सुळक्यांतून.. थरकाप उडवणाऱ्या गर्जनांपासून.. दूर.. दुबळ्या उंदरासारखं जगत..! त्याच सुरक्षिततेच्या ध्यासापोटी.. दुर्बल उंदराच मांजर झालं.. मांजराचा झाला वाघ... पंज्यात बळ, जबड्यात सुळे असलेला... सक्षम.. सशक्त..! आणि त्या बरोबरच जन्माला आला.. गर्जनेतला ललकार... सार्वभौमत्वाची आग..! स्वार झाली... गर्जणार्‍या दर्यावर.. पिसाळलेली आयाळ काबूत घेत.. गोठवणारी..

गोपाला गोपाला... देवकीनंदन गोपाला......!

लेखनविषय:
द्वापारयुगी मथुरानगरीचा राजा होता 'कंस'..... सदा छळे तो सज्जना, करी अति विध्वंस.... अत्याचारांचा भार न पेलवला धरणीमातेला.... दुष्टाच्या निर्दालना, जन्म घेण्या...ती विनवी प्रभुला... या कंसाची, पाठची बहीण होती 'देवकी'... पुढे 'वसुदेवा'ची ती राणी झाली लाडकी... वरातीच्या रथाचे सारथ्य पत्करले होते कंसाने... बहिणीची पाठवणी करत होता मानाने.... इतक्यात, घनगंभीर आवाजात, एक आकाशवाणी वदली... ऐकून ती, कंसाची जणू पाचावर धारण बसली... "कंसा, तुझी लाडकी बहीण आता तुझीच वैरिणी बनेल. देवकीच्या 'आठव्या' गर्भाकडून तुझा मृत्यू घडेल." ऐकून ती आकाशवाणी, चवताळला, संतापला कंस... नवपरिणित दांपत्याला मग घडला बंदिवास
Subscribe to मुक्तक