टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
दूर पळ दूर पळ
खोल खोल
आत आत
उठते जेव्हा
एक कळ
मन माझे
म्हणते तेव्हा
दूर पळ दूर पळ
ऍडम आणि ईव्हला
टाळू म्हणून टळलं नाही
तुझी माझी गत गं
त्यांच्याहून वेगळी नाही
झाडावरती आज पुन्हा
पिकलं आहे एक फळ
मन माझे म्हणते तेव्हा
दूर पळ दूर पळ
कधीसुद्धा संपू नये
अशी एक रात्र येईल
बुद्धी तेव्हा आपली सारी
गलितगात्र होईल
वासनेच भूत तेव्हा
भावनेला लावेल चळ
मन माझे म्हणते तेव्हा
दूर पळ दूर पळ
-अनिरुद्ध अभ्यंकर
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

वा!
भावनाविष्काराचा खेळ सुरेख मांडला आहे
हम्म!!
अतिशय बोलकी कविता..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
वा वा अनिरुद्ध!
मुक्त छंदातली ही कविता छान आहे. आंदोलित मनाचा खेळ चांगला उतरलाय!
कधीसुद्धा संपू नये
अशी एक रात्र येईल
बुद्धी तेव्हा आपली सारी
गलितगात्र होईल
(बुद्धी गलितगात्र होणे फारसे पटत नाही)
त्या ऐवजी शेवटच्या ओळीमधे अर्थात आणि तालात एकदम फिट्ट बसण्यासाठी असा काही बदल करता येईल का?
मती तेव्हा आपली सारी
अगदी गुंग होऊन जाईल
(स्वगत - कोणाला टाळून पळून चाललाय हा अनिरुद्ध कोण जाणे?
)
चतुरंग
मस्त
मस्त कविता..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
पिकलं आहे एक फळ
फळ तयार झाल्यावर पळ पळ कशाला?
कविता छान आहे.
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
उत्तम!
एकदम वेगळी हाताळणी. हायक्लास.
(चतुरंग : माझ्या मते मुक्तछंद नाही - छंदोबद्धच आहे.)
रामदास- मला वाटते पिकलेले फळ बायबलमधले आहे. ऍडम-ईव्ह यांनी हे "विवेकबुद्धीचे" फळ खाल्ल्यावर त्यांची निरागसता नाश पावली, आणि त्यांना नंदनवनातून हाकलले गेले. त्या फळापासून दूर पळायचे (की नाही) हा विचार असावा - कवीच खुलासा करू शकेल.
सुंदर कविता
कविता आवडली
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
सुरेख आहे
सुरेख आहे कविता.
सुंदर
सुंदर कविता !!
क्या से क्या हो गया .. जानेजा तेरे प्यार मे,
सोचा क्या .. क्या लिखा तेरे प्यार मे !
(भलाच होता माणुस आधी
विडंबने तो टंकित होता,
काय जाहले .. कोणी फितवले
कवी बनवले विडंबकाला !)
मस्त मस्त !
फार आवडली कविता !
--लिखाळ.
धन्यवाद!!
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकंचे मनापासून आभार!!
(आभारी) अनिरुद्ध अभ्यंकर