मृगजळ
लवचिक अंतर जरी निरंतर,हळवे आपुले नाते ख़ास,
जवळ येईना दूर जाईना, तरी सुखावे खोटा भास.
भासामागे धावत जाता, मनात हीरवळ पायी आग,
बेधुंदित ना दाह जाणवे, स्वप्नी राहो नकोच जाग!
अशी बंधने हलके धागे, वार्यावरती फिरती विरती,
कधी हव्याश्या कधी नकोशा, गाठी त्याला आपसुक पडती,
नसता गुंता - ओढातान, अडकत जाते आपली मान,
तुला दुखावे मला दुखावे, असे मोकळे अंतर छान!
अनामिक हे भाव असुदे, अनाम असता अर्थ अपार,
अस्फुट राहो गुज मनीचे, का द्यावा शब्दांना भार,
तुला कळावे मला कळावे, असो वेगळा अर्थ तयांस,
कुरवाळु हे मृगजळ र्हदयी, सत्याहुनही सुखद भासं...
लेखनविषय:
याद्या
3365
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
लवचिक अंतर
वा. अतिशय सुरेख.
कविता फरच
फारच सुंदर
कविता आवडली
अप्रतिम!
आपणां
अनामिक हे
एका
In reply to अनामिक हे by प्राजु
अच्छा ...
In reply to एका by शैलेन्द्र
छ्या..
In reply to अच्छा ... by टारझन
सुरेख कविता!
सुंदर
छान कविता.
सुंदर !!!
मीली,