Skip to main content

मुक्तक

दत्तकविधान-९

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 12/03/2010 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या तपश्‍चर्यापूर्तीचा दिवस! सकाळी दहा वाजता निमिषला घरी आणण्यासाठी जायचं होतं. मनस्वी आज तिच्या भावाला पहिल्यांदाच पाहणार होती. तिच्या प्रतिक्रियेविषयी प्रचंड उत्सुकता होती. एवढे दिवस तिच्यासाठी ती केवळ दंतकथा होती. शाळेत, शेजारीपाजारी चर्चा करून झाली होती. आता प्रत्यक्ष घरी आल्यानंतर ती त्याला कसं स्वीकारते, हे पाहण्याची आम्हाला उत्कंठा होती. आधी संस्थेच्या कार्यालयात गेलो. निमिषला पाहून मनस्वीची प्रतिक्रिया अतिशय नॉर्मल होती. अगदी कुठल्याही बाळाला पाहावं, अशीच. मी आलो, तोपर्यंत आमच्या स्वागताची आणि सत्काराची तयारी झाली होती. संस्थेत पाट, रांगोळी काढण्यात आली होती.

दत्तकविधान-८

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 12/03/2010 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा आपल्या फॅमिली डॉक्‍टरांकडे जाण्याची औपचारिकताच बाकी आहे, असा आमचा समज होता. ...पण प्रत्यक्षात तो खोटा आहे, हे कळायला पुढचे चार दिवस जावे लागले. बाळाला डॉक्‍टरांकडे घेऊन जाण्यासाठी मी संस्थेत गेलो, तेव्हा तर मोठी धमालच झाली! बाळाला न्यायचं, त्याला पहिल्यांदाच छातीशी धरायचं, उन्हातान्हाचा त्रास नको, म्हणून मारे कार घेऊन गेलो होतो. सोबत सासूबाई होत्या. त्याला पाहून त्या त्यांच्या कामासाठी दापोडीला जाणार होत्या. गाडी पार्क करून उतरताना नेमका एका कुठल्याशा पीआरचा फोन आला. त्याला त्याचं कसलंतरी "दुकान' छापून आणायचं होतं. फोनवर बोलता बोलता मी गाडीतून उतरलो आणि अगदी आठवणीनं दार लॉक करून टाकलं.

दत्तकविधान-७

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 12/03/2010 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
दत्तक मुलासाठी नावनोंदणी केल्यानंतर तब्बल पावणेदोन वर्षांनी आम्हाला पहिलं बाळ आज पाहायला मिळणार होतं. लग्नाआधीपासून ठरविलेल्या एका निर्णयाच्या पूर्ततेतला महत्त्वाचा टप्पा आज पार पडणार होता! त्या निर्णयावर आम्ही ठाम राहिलो होतो, पण मध्यंतरी परिस्थितीच अशी होती की आशा सोडून द्यायचे विचारही मनात येत होते. सुदैवानं ती लवकर निवळली आणि आज या महत्त्वाच्या वळणावर आम्ही उभे होतो. मी सकाळी रत्नागिरीहून पुण्याला आलो आणि 11 वाजता हर्षदासह संस्थेत दाखल झालो. आम्हाला तिथे दिवसभर द्यायचा होता. फॉर्म भरून देताना आमच्या मुलाखती आणि सविस्तर माहिती घेण्यात आली होती.

दत्तकविधान-६

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 12/03/2010 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
मनस्वीला सांगून झालं, पण आईवडिलांना सांगणं ही मोठी कसोटी होती. आम्ही घेतलेला निर्णय पालकांना उशीरा कळवला, पण त्याला अगदी कडाडून विरोध झाला नाही. "तुमचा निर्णय आहे ना, ठीक आहे. आम्हाला मान्य आहे,' अशीच सर्वसामान्य प्रतिक्रिया होती. तेवढंही दिलासादायक होतं. मूल मिळवण्याचं टेन्शन असताना हा आणखी एक ताण आम्हाला झेपणारा नव्हता. सुदैवानं तो टळला. दत्तक मुलासाठी देण्याच्या कागदपत्रांत आम्हाला ओळखणाऱ्या तीन व्यक्तींची ओळखपत्रं आणि आम्हाला भविष्यकाळात काही झाल्यास एका जोडप्यानं त्या बाळाची पूर्ण जबाबदारी घेण्याबाबतचं पत्र (बॉंड) देणंही आवश्‍यक होतं. माझ्या धाकट्या साडवानं ती जबाबदारी स्वीकारली होती.

दत्तकविधान-५

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 12/03/2010 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
मनस्वीला आम्ही दुसऱ्या बाळाविषयी अगदी सहजपणे सांगितलं. "तुला घरात एकटं वाटतं ना, कंटाळा येतो ना, मग घरात एखादं बाळ असेल तर किती छान,' हा तिच्या मानसिक तयारीचा मूळ गाभा होता. तिनंही ते सहज मान्य केलं. पण लहान बाळ म्हणून मावसबहिणीलाच तिनं जवळून पाहिलं होतं. त्यामुळं बाळ आणायचं ते मुलगीच, अशी तिची ठाम धारणा होती. मग आपल्या घरात आधीच तुम्ही दोन मुली (आई आणि ती) आहात ना, मग आणखी एक मुलगी आणली तर कशी चालेल? त्यापेक्षा मुलगा आणला, तर दोन मुलगे-दोन मुली (आई-बाबा व मनस्वी आणि तिचा भाऊ) होतील, असं तिला पटवून दिलं. तिलाही ते पटलं. शेजारी कळलं तरी हरकत नाही, अशी वेळ आली, तेव्हाच आम्ही मनस्वीला सांगितलं.

दत्तकविधान-४

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 12/03/2010 01:45 या दिवशी प्रकाशित केले.
दीड वर्षं! तब्बल दीड वर्षं हातावर हात धरून भजन करायचं होतं. दुसरं मूल हवं होतं, त्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली होती, पण मुलाचीच प्रतीक्षा होती. हा दीड वर्षांचा कालावधी फार जीवघेणा होता. आमच्या हातात काहीच नव्हतं...वाट बघण्याखेरीज! मनस्वी आता हळूहळू मोठी होऊ लागली होती. शाळा, बाल भवनमधील दोस्त मंडळी, सोसायटीतल्या शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या घरात धुडगूस सुरू झाल्यानं तिचीही स्वतःची मतं तयार होऊ लागली होती. "आपल्याकडेही बाळ आणायचं,' असं टुमणं सुरू झालं होतं. आम्ही तिला सांगूही शकत नव्हतो आणि लपवूही शकत नव्हतं. तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार होता.

दत्तकविधान-३

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 12/03/2010 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
संस्थेत आमची प्राथमिक मुलाखत झाली. आमचं मूल दत्तक घेण्याचं कारण, त्यामागची मानसिकता, आमची मानसिक-आर्थिक तयारी, दत्तक मुलाची प्रक्रिया, त्यासाठीची कागदपत्रे, सगळी माहिती देण्यात आली. जवळपास दोन तासांचं ते मार्गदर्शन होतं. त्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं - दत्तक मूल मिळण्यास किमान दीड वर्षाचा कालावधी लागतो. दत्तक घेऊ इच्छिणारे पालक "वेटिंग लिस्ट'वर आहेत! दीड वर्षं हा कालावधी आमच्यासाठी अगदीच अनपेक्षित, प्रदीर्घ होता. आमचं दोन मुलांमधल्या अंतराचं नियोजन बोंबललं होतं. म्हणजे मनस्वी साडेचार वर्षांची होईपर्यंत तरी तिला भाऊ मिळणार नव्हता. तोपर्यंत गावभर बोंब करून कुणाला सांगणंही योग्य नव्हतं.

दत्तकविधान-२

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 12/03/2010 01:42 या दिवशी प्रकाशित केले.
हर्षदा आणि मी एकत्र भेटून (एकमेकांशी) लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा दुसऱ्याच बैठकीत आपल्या (भावी) अपत्यांविषयी चर्चा केली होती. सुदैवानं तिची आणि माझी आवड त्या बाबतीतही जुळली... एकट्या मुलांचे प्रश्‍न आसपासच्या कुटुंबांत पाहायला मिळत होते. मुलं एकांडी, हेकेखोर होणं, एकाच प्रकारे विचार करण्याची किंवा दुसऱ्यामध्ये न मिसळण्याची प्रवृत्ती निर्माण होणंही नवीन नव्हतं.

दत्तकविधान-१

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 12/03/2010 01:18 या दिवशी प्रकाशित केले.
child ``अमक्‍या तमक्‍याचं तिसरं मूलही असंच सातव्या महिन्यात गर्भात गेलं...'' कुणीतरी मला कळवळून सांगत होतं." "अरे, एवढी गंभीर परिस्थिती होती, तर कुणी सांगितलं होतं, नस्ती रिस्क घ्यायला?'' माझी त्यावरची सहजस्फूर्त, पहिली प्रतिक्रिया ही होती.

पार्किंग आणि माझा रोड सेन्स !

लेखक जयवी यांनी बुधवार, 10/03/2010 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
पार्किंग म्हटलं की माझ्या नव-याला फार टेन्शन येतं…..अर्थात मी शेजारच्या सीटवर असले तर…!! कारण नेहेमी गाडीतल्या एयरकंडीशनरच्या थंडगार झुळकीने मला अगदी गाडीत बसल्या बसल्या लगेचंच गाढ झोप लागते. पण कशी कुणास ठाऊक….. पार्किंगची वेळ आली की आपोआपच जाग येते आणि माझ्या मेंदूत काहीतरी विलक्षण हालचाली होतात. बापडी मी त्या मेंदूच्या आज्ञेचं फक्त पालन करते. तर माझं काय चुकलं…!! आता नव-याचं इतकं ड्रायव्हिंग झाल्यानंतर पार्किंगच्या वेळी जर माझी थोडीफार मदत होत असेल तर काय हरकत आहे. पण नको…..तितकीसुद्धा मदत नको असते त्यांना माझी.