चवींचा "जिव्हा" ळा...... माझ्या मनातला!
सकाळी सकाळी लेकीला मस्त भुक लागली होती. कूकर नुकताच झाला होता. पटकन तिला तूप मेतकूट भात कालवून द्यावा असं वाटलं. म्हणून कूकर उघडला..आहाहा...मस्त आंबेमोहोर चा जिवघेणा गंध नाकात शिरला. (उपासाच्या वेळी असले वास जरा जास्तच जिवघेणे वाटतात) तिच्या नेहमीच्या प्लेट मध्ये काढला.त्यावर भरपूर साजुन तुप ओतले.साधारण ४-५ चमचे.मग तो आं.मो.चा गंध अधिकच गहिरा झाला .....त्यात साजुक कणीदार तूप अस मस्त शिरत होतं....आणि त्या तुपाचा रवाळपणा पहिल्या वाफेच्या भाताच्या ताज्या ताज्या गरम पणामुळे असा प्रेमानं विरघळत होता.......आहाहा.... चवीपुरतं मीठ घातलं आणि मेतकूटाची बरणी(आईने दिलेली) काढली. ती उघडल्या उघडल्या पुढल्या मानासिक छळाची कल्पना केली.....कारण असं सुंदर्...तो typical पिवळा रंग....perfect भाजलेलं (आईच्या भाषेत "खमंगपणा वर" भाजलेलं) मेतकूट्..आपला रंग आणि गंध दाखवत होतं.माझ्या आईची resipes सांगायची एक वेगळीच vocabulary आहे...म्हणजे कसं माहितिये का?..मी तिला विचारल ना आई मेतकूट सांग ना कसं करू....तुझ्यासारखं जमायला हवय गं....मग आई सुरू... साधारण सगळं वाटी वाटी घे....आणि असं 'खमंगपणावर" भाज्....आता वास्तविक खमंगपणावर या term ला तसा शाब्दिक अर्थ काहिहि नाहिये....पण ते तिला कळतं आणि सवयीने मलाही! उअक्डीच्या मोदकाची रेसिपी सांगताना तर तिचा एक शब्द मला जाम हसवतो.... पाण्याला "मुंगेरी आधण" आलं ना की त्यात पिठी घाल्....आता मुंगेरी आधण म्हणजे काय? तर पाणी न उकळता पातेल्याच्या तळाशी बारीक बारीक बुड्बुडे जमायला लागले ना की आलं तिचं ते मुंगेरी आधण्...उकळी फुटण्या आगोदरची stage! फार गमतीदार असतात तिचे शब्द्!..असो!
...तर मग मी ते चमचे -२ चमचे मेतकूट भातात घातलं आणि छान कालवून दिला.सोबत गोड लिंबाचं लोणचं ही घातलं. तो मस्त चवीचा भात आणि लिंबाच गोड लोणचं.... तिनेही असा पहिला घास तोंडात घातला आणि मग लोणच्याची चुटूक बोटानी जिभेवर लावली (हे असं खायचं हा माझा download) ...आणि मग तृप्त पणे डोळे मिटून जे ... हंsssssss केलं ना ...आहाssss मीच तृप्त झाले.
काय होत येवढं त्यात? साधा तूप भात मेतकूट; पण कित्ती खमंग्...सात्विक्..असं साधच पण पोटावर प्रेम करणारं खाणं! मग मन अशाच काही चवींच्या आठ्वणीत गेलं.. तूप्,मेतकूट भात... असाच पहिल्या वाफेचा वरण ,भात तूप मीठ लिंबू! अक्षरशः सूख! अजुन काही....
१) भरपूर पावसात भिजुन ....खुप भुक पोटात घेउन घरी पोचल्या पोचल्या कपदे बदलून येइपर्यंत ......आईने केळीच्या पानावर वाढलेली गरम गरम मुगाची खिचडी+भरपूर तूप + कैरीचे लोणचे + खमंग पापड...
२) ऑड वेळी लागलेली भूक + शिल्लक राहिलेल्या भाताचा भरपूर लसूण घालून ..परतून परतून केलेला फोडणीचा भात..
त्या वेळी त्या साध्या फोदणीच्या भाताची जी taste लागते ना....आहाहाह!
३) तव्या वरची गरम गरम ..भरपूर पदर सुटलेली पोळी आणि ताज्या दुधाचा ultimate चहा....
४) अशीच उशीरा घर दाखवलेली रात्र्.....आणि ३ शिट्ट्यात झालेला गरम गरम भात आणि झण्झणीत पिठलं....
५)नवर्यांची लाडकी बायको माहेरी गेली असताना स्वतः भुकेच्या वेळी बनवलेली कां.ब.र. भाजी म्हणजे कांदा बटाटा रस भाजी आणि कोपर्यावरच्या बेकरीतुन आणलेला ताजा ब्रेड.
६) लहानपणी,...शाळेतल्या डब्यातली भेंडीची भाजी आणि पोळी......आणि मित्राच्या /मैत्रिणीच्याच डब्यातली आवडणारी लाल भडक बटाट्याची काचर्याची भाजी...अजुन अनेकांना आठवत असेल ना! आणि घरी आल्यावर आईकडे ती भाजी कर ना ग आई असा केलेला लाडिक हट्ट्.......आणि आईने तीच भाजी करून डब्यात दिली की " नाहि गं पण अम्याच्या डब्यात अस्ते तशी नाही लागली " असे बोलुन केलेला हलकटपणा! :)
७) तूप गूळ पोळीचा लाडू ( शिळ्या पोळ्यांचा)..
८) आजीने कालवून दिलेला साय भात ( oh साय...... my another favorite)
९) ....पातेल्यातली साय तर मला अजुन बोलावते.....ये गं जाई...मी बघ कशी पोहते आहे....! आणि मग ती दाट साय वाटीत काढुन घ्यायची ...त्यावर अशी साखर पेरायची ..चमचा घ्याय्चा आणि ...'' wallah"
10) तिखट तिखट आमटी भात्..... हा आमटी भात तर..... आई गं...कधीही विचारा...खायला तयार असायचे मी!
...या अशा आणि इतर अजुन अनेक .. न संपणार्या चवी...जिभेवर आणि पोटावर प्रेम करणार्या साध्या साध्या पण मनात कायम रेंगाळणार्या जिव्हा स्मृती...तुमच्याशी share कराव्या वाटल्या....
..काय मग्?..उद्या खाणार ना तुप्,मेतकूट भात?.....
याद्या
9985
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
जिभेवर आणि पोटावर प्रेम
ते आपापल्या सोयीनुसार घ्याव!
लेख आवडला. तों. च. (चळचळून)
अगं आता बास त्या आठवणी! त्रास
In reply to लेख आवडला. तों. च. (चळचळून) by शुचि
हं...दही भात...एक chemistry
In reply to लेख आवडला. तों. च. (चळचळून) by शुचि
ए, गप्प बैस ना माझे बाई! हे
ए, गप्प बैस ना माझे
In reply to ए, गप्प बैस ना माझे बाई! हे by रेवती
मेतकुटाची रेशिपी द्या
In reply to ए, गप्प बैस ना माझे by गणपा
युरेका युरेका !!!!!
In reply to मेतकुटाची रेशिपी द्या by विलासराव
धन्यवाद
In reply to युरेका युरेका !!!!! by गणपा
चवींचा 'जिव्हा'ळा आवडला
दडपे पोहे
जाई........अग मा़झेच बालपण
...very much touched..!
In reply to जाई........अग मा़झेच बालपण by निवेदिता-ताई
ताई, मला पण बोलव की गं घरी
In reply to ...very much touched..! by जाई अस्सल कोल्हापुरी
शाहरूक भौ,,,,
In reply to ताई, मला पण बोलव की गं घरी by शाहरुख
होय, बोलवावं लागतं. प्राजु
In reply to शाहरूक भौ,,,, by जाई अस्सल कोल्हापुरी
वरण आणि भात. वरणाच्या
अरे दुष्टं माणसा कुठे फेडशील
In reply to वरण आणि भात. वरणाच्या by llपुण्याचे पेशवेll
एकदम सहमत. मस्त लेख!
In reply to वरण आणि भात. वरणाच्या by llपुण्याचे पेशवेll
+१
In reply to वरण आणि भात. वरणाच्या by llपुण्याचे पेशवेll
चवदार लेख.. तात्या.
.
हिहहाह्...आणि लेखातले ......
In reply to . by बिपिन कार्यकर्ते
मस्त लेख ! सगळ्या चवी अजून
धपाटे
लिखाण आवडल आणि तुमच्या आईचे
!@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^&
अवलिया , शिवीगाळ हिब्रू मध्ये आहे का स्वाहिलीमध्ये?
In reply to !@^%$#%*&!#%^&^#&@!)(&*&*#!^& by अवलिया
मस्तच लेख आहे.. अगदी
अवलिया मला सगळी @ घालुन
छ्या, हे काही खरं नाही. भात
लेख अतिशय चविष्ट आणि
काय हे जाई?
मला भात जास्त आवडत नाही पण
:)
_/\_
हिहहहहहाआ (हे सौथ इण्डीयण
In reply to _/\_ by धमाल मुलगा
आय माय स्वारी.
In reply to हिहहहहहाआ (हे सौथ इण्डीयण by जाई अस्सल कोल्हापुरी
नाय! स्वारी नाय आज! मी तर
In reply to आय माय स्वारी. by धमाल मुलगा
जळजळ
ये ब्बात.!..... कशी ग तु?
वा वा वा!
>>चांगली हिरव्या मिरच्या आणि
In reply to वा वा वा! by चतुरंग
आई शप्पथ रंगा.......
In reply to वा वा वा! by चतुरंग
>>वांग्यांची चमचमीत भरली
In reply to आई शप्पथ रंगा....... by जाई अस्सल कोल्हापुरी
ही
In reply to >>वांग्यांची चमचमीत भरली by धमाल मुलगा
शिक्षा द्यायची?
In reply to ही by श्रावण मोडक
येड
In reply to शिक्षा द्यायची? by धमाल मुलगा
गुपित फोडू?
In reply to येड by श्रावण मोडक
मग
In reply to गुपित फोडू? by धमाल मुलगा
आहाहाहाहा......... बै का छळ
मस्त
छान!
आयला या धाग्यावर
....गाल पुढे आहे...चापट द्यावी....! गुन्हा मान्य!
In reply to आयला या धाग्यावर by llपुण्याचे पेशवेll
सुंदर!
तुमच्या प्रतिसादाला अत्युच्च
In reply to सुंदर! by समीरसूर
नावं नाही ठेवली
In reply to तुमच्या प्रतिसादाला अत्युच्च by रेवती
वोक्के! वोक्के! आता तुमी फास!
In reply to नावं नाही ठेवली by समीरसूर
आयला खान्देश्......आणि.. जळगावी वांग्याच भरीत..... आहाहा.....
आ गा गा गा गा......... जाई......
१,२,४ जीवघेणे