अजित डोवाल : बस नाम हि काफी है
लेखनप्रकार
"It is not always easy. Your successes are unheralded--your failures are trumpeted."
President John F. Kennedy, CIA Headquarters, 28 November 1961
गुप्तहेर खात म्हंटल की मराठी माणसाला थेट बहिर्जी नाईक आठवतो आणि चाणक्याचे कोटस वैगेरे आठवायला लागतात . एरवी गुप्तहेर खात्याची आठवण आपल्याला कुठे बॉम्ब स्फोट झाला की खापर फोडायला आणि शिव्या घालायला कुणीतरी पाहिजे तेंव्हा च होते. वर केनेडी ने म्हणल्याप्रमाणे यांच्या यशोगाथा कुणाला कळत नाहीत मात्र यांच्या अपयशाचा सार्वजनिक पंचनामा होतो. अनेक उदाहरण अशी आहेत की गुप्तहेर खात्याच्या सतर्कतेमुळे अनेक बॉम्बस्फोट आणि अतिरेकी हल्ले टळले आहेत. मात्र सर्व सामान्य जनतेपुढे हि माहिती फारशी येत नाहि. पण कुठे बॉम्बस्फोट झाले की प्रसारमाध्यम लगेच आपल्या गुप्तहेर यंत्रणेतल्या त्रुटिवरुन आरडाओरड सुरु करतात . आणि फुटबॉल क्रमवारी पासून जागतिक आरोग्या निर्देशांकामध्ये पाकिस्तान शी स्पर्धा करण्याच्या भारतीय वृत्तीला, "त्या पाक्ड्यांची ISI बघा कशी हिरीरीने काम करते नाहीतर आपली RAW बघा बसलेत हातावर हात ठेवून " अस म्हणे मानवते. यातल्या बहुतेक लोकाना RAW चा longform पण माहित नसतो मग त्यांनी १९७१ च्या युद्धात बजावलेली जबरदस्त कामगिरी यांचा पत्ता असण्याची सुतराम शक्यता नाहिच. गुप्तहेर खात्याबद्दल चे हे औदासिन्य सर्वसामान्य लोकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वत्र आढळते .
अशा या देशात अजित डोवाल सारख्या खमक्या माजी गुप्तहेर अधिकाऱ्याची मोदींचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक झाल्याच्या बातमीला माध्यमांमध्ये कुठेतरी कोपरयात किंवा मधल्या पानावर जागां मिळाली यात आश्चर्य ते काय ? त्या बातम्यांमध्ये पण डोवाल हे अडवाणी यांचे निकटवर्तीय असून पण मोदी यांनी त्यांची नेमणूक कशी केली असा आश्चर्यमिश्रीत खोचक सुर होता. पण सुदैवाने अजित डोवाल ला प्रसिध्द होण्यापेक्षा त्याचे काम अचूक करण्यात जास्त रस आहे. त्याची दीर्घ कारकीर्द तरी हेच सांगते .
मी डोवाल बद्दल पहिल्यांदा वाचले ते हुसैन झैदी च्या डोंगरी ते दुबई या दाउद इब्राहिम च्या उदयावर लिहिलेल्या अप्रतिम पुस्तकामध्ये . भारतीय गुप्तहेर खात्याने पाकिस्तान मध्ये दडुन बसलेल्या दाउद ला उडवण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत . पण एकदा ते त्याच्या खुप जवळ पोहोंचले होते . जावेद मियांदाद चा मुलगा आणि दाउद च्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस . छोटा राजन या दाउद च्या प्रतिस्पर्धी टोळीशी हातमिळवणी करून हा बेत आखण्यात आला होता . या टोळीचे दोन उत्कृष्ट नेमबाज फरीद तनाशा आणि विकी मल्होत्रा हे दुबई (जिथे विवाह सोहळा पार पडणार होता ) ला पोहोंचले पण होते.सर्व तपशील ठरवला होता . अगदी बारीक सारीक गोष्टी पण पक्क्या झाल्या होत्या . म्हणजे अगदी हे नेमबाज कुठे उभे राहणार आणि गोळ्या कधी झाडणार इथ्पर्यन्त. पण ……। कुठेतरी माशी शिंकली आणि अंतर्गत गडबडीमुळे हे योजना ऐन वेळेस बारगळली . हातातोंडाशी आलेला घास गेला. हुसैन झैदी च्या पुस्तकातले हे प्रकरणच (प्रकरण २२- हेरांचे संमेलन ) मुळातुन वाचण्यासारखे आहे. तर हे सगळे operation अजित डोवाल पार पाडत होता . ह्यानंतर अजित डोवाल या नावाबद्दल कुतूहल तयार झाले नसते तरच नवल ,
कळस म्हणजे हा अजित डोवाल चक्क पाकिस्तानात ७ वर्ष राहून हेरगिरी करून राहून आला आहे . ते पण काहुटा (पाकिस्तान ची पहिली आण्विक भट्टी जिथे आहे ) अशा ठिकाणी . त्यामुळेच अजित डोवाल ला पाकिस्तान आणि ISI याबद्दलचा तज्ञ म्हणून ओळखले जाते. operation Blustar च्या काही वेळ अगोदर हा पठ्ठ्या वेश बदलुन सुवर्ण मंदिरात जाऊन राहिला होता . कारकीर्दीच्या सुरुवातीलाच याने २० वर्ष खदखदणारा मिझोराम प्रश्न सोडवण्यात सक्रिय वाटा उचलला होता . अशा असंख्य देशाच्या इतिहासाला वळण देणारया कामगिऱ्या पार पाडणारा हा लढवय्या कायमच पडद्याआड राहिला . गुप्तहेर खात्याबद्दल प्रचंड औदासिन्य असणार्या देशात या योद्ध्याला भारत रत्न किंवा गेला बाजार पद्मश्री मिळणे तर शक्य नाही . पण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या पदावर नेमणूक झाल्याने त्या पदाचा नक्कीच सन्मान झाला आहे . अजित डोवाल चि या पदावर नेमणूक झाल्याने दाउद , सलाउद्दीन आदी लोकांमध्ये नक्कीच धडकी भरली असेल . बाकीचे माहित नाही पण राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तहेर खाते या आघाडीवर नक्कीच अच्छे दिन येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वतहाचा जीव देशासाठी धोक्यात घालणाऱ्या या unsung hero ला बहिर्जी नाईकांच्या महाराष्ट्रातुन एक मानाचा मुजरा
वाचने
10744
वाचनखूण
प्रतिक्रिया
53
मस्त!
अभिनंदन .... मोदी सरकारच !!!!
चांगली माहिती पुरवल्याबद्दल
In reply to चांगली माहिती पुरवल्याबद्दल by मृत्युन्जय
मि पण हेच म्हणतो.
In reply to चांगली माहिती पुरवल्याबद्दल by मृत्युन्जय
पुस्तकाच्या फ़िल्मिकरणाच्या
स्वतहाचा जीव देशासाठी धोक्यात
स्वतहाचा जीव देशासाठी धोक्यात घालणाऱ्या या unsung hero ला बहिर्जी नाईकांच्या महाराष्ट्रातुन एक मानाचा मुजराहेच म्हणतो ! अनसंग हिरो राहणे हा हेर आणि हेरखात्याचा जितका "ऑक्युपेशनल हॅझार्ड" आहे त्यापेक्षा अनेक पटींनी ती "प्रत्येक हेराच्या वैयक्तीक आणि एकूण सर्वच देशाच्या सुरक्षेसाठी घेतलेली खबरदारी" असते, हे अनिवार्य सत्य आहे. मात्र अजित डोवाल यांची खुद्द पंतप्रधानांचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक करण्याने मोदींचा मानसीक कणखरपणा आणि तो प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारी ठाम राजकीय इच्छाशक्ती अधोरेखीत झाली आहे. काही दिवसांच्याच कालावधीतच मोदींनी उचलेल्या या आणि इतर काही राजकीय पावलांमुळे जगातल्या आपल्या (मोजकेच किंवा नावाखातर असलेल्या) मित्रांना, कुंपणावर बसलेल्यांना आणि शत्रूंना योग्य ते संदेश जात आहेत. भारतीय नागरिकांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे.In reply to स्वतहाचा जीव देशासाठी धोक्यात by डॉ सुहास म्हात्रे
+१
In reply to +१ by पिवळा डांबिस
वाचाळता न करावी,
वाचाळता न करावी, माणसे ऐशी जोडावी| हृदया धडकी भरावी, शत्रूच्याही||अगदी चपखल ! :)In reply to वाचाळता न करावी, by डॉ सुहास म्हात्रे
प्रतिसादांसह धाग्याला......
In reply to प्रतिसादांसह धाग्याला...... by अत्रुप्त आत्मा
+ १ अगदी...
मस्त ओळख!
अमोल साहेब,
In reply to अमोल साहेब, by सुबोध खरे
@सुबोध खरे साहेब
right person in the right
ग्रेट ! बस्स नाम ही काफी नही
खान्ग्रेस सत्तेवर असतानाही रॉ चा प्रमुख ही संघाजवळी व्यक्ति असे
खान्ग्रेस सत्तेवर असतानाही रॉ चा प्रमुख ही संघाजवळी व्यक्ति असे
मस्त ओळख...
धन्यवाद अजित डोवाल ह्यांची
अरे वा! माहिती वाचून आपणच
In reply to अरे वा! माहिती वाचून आपणच by रेवती
+1
In reply to +1 by आत्मशून्य
आशा धर्तीचा
चांगली माहिती
छान
छान माहिती. बाकी डोंगरी टु
दाउद ला मदत करणारा राज्यातील आणी केंद्रातील " पवारबाज" होता
In reply to दाउद ला मदत करणारा राज्यातील आणी केंद्रातील " पवारबाज" होता by सुबोध खरे
बोलके उदाहरण !
In reply to दाउद ला मदत करणारा राज्यातील आणी केंद्रातील " पवारबाज" होता by सुबोध खरे
एखाद्या चित्रपटाप्रमाणे वाटत
In reply to एखाद्या चित्रपटाप्रमाणे वाटत by रेवती
हम्म
अजित दोवेल ह्यांचे नक्कीच
In reply to अजित दोवेल ह्यांचे नक्कीच by निनाद मुक्काम …
रोचक माहिती आहे.
ओळख..
धन्यवाद
In reply to धन्यवाद by विकास
डोवाल यांच्याबद्दल बरीच
विकास
अजित डोवल याचं "दहशतवादाला
In reply to अजित डोवल याचं "दहशतवादाला by कल्पक
कल्पक दुव्या बद्धल धन्स !
छान
In reply to छान by माईसाहेब कुरसूंदीकर
लै भारी माईकाकू,
संपत्तीवर कब्जा
In reply to संपत्तीवर कब्जा by सुबोध खरे
माहिती
In reply to माहिती by माईसाहेब कुरसूंदीकर
माईसाहेब,
In reply to माईसाहेब, by सुबोध खरे
जौध्याना ते
In reply to माईसाहेब, by सुबोध खरे
तुम्ही
...असो आता सुराज्य आले आहे!.बघुया काय होते..!!!
माई
In reply to माई by निनाद मुक्काम …
@निनाद....
In reply to @निनाद.... by मुक्त विहारि
(राहुल) गांधीगिरी म्हणतात ना ती ही
In reply to (राहुल) गांधीगिरी म्हणतात ना ती ही by आत्मशून्य
अथवा आपण केलेल्या विधानाचा अर्थ काय होतोय
चांगली माहिती पुरवल्याबद्दल धन्यवाद.
अतिशय उत्तम माहिती
उत्तम लेख...
अजित डोभाल यांच्या कर्तृत्वाचे कौशल्य पणाला