जडण-घडण...6
डी.एड्. च्या त्या दोन वर्षांनी मला भरभरून दिलं. उत्तम गुण मिळवून पाणावल्या डोळ्यांनी आम्ही सर्वांनीच विद्यालयाचा निरोप घेतला. आधी वरचेवर होणारं बोलणं कालांतराने कमी होत गेलं पण मैत्रीची नाळ मात्र टिकली.
त्यानंतर सुरूवात झाली नोकरी शोधायला. डी.एड्. करण्यापूर्वी वरचेवर वर्तमानपत्रात दिसणाऱ्या पाहिजेत च्या जाहिरातींना आता महत्व आलं. हो -ना करता-करता घरापासून चालत २०-२५ मिनीटांच्या अंतरावर असणाऱ्या एका विद्यालयात प्राथमिक शिक्षकाचं पद रिक्त असल्याचं समजलं. उत्साहाने शाळेत पोहोचले. पहिला पाठ घेतला आणि निरीक्षकांनी 'उद्यापासून या' असं सांगितलं. मी खूष. पगार... पाचशे रूपये फक्त.
मिसळपाव