भारतीय वकीलातीतला अनुभव
विटेकर काकांचा "एक उद्विग्न करणारा अनुभव"वाचला . खरच खूप चिडचिड झाली . त्यावरून परदेशातील आमचा भारतीय वकीलातीतला अनुभव सांगावासा वाटतो .
मला पासपोर्ट वरील नाव बदलून घायचे होते. नवीन नावाने नवीन पासपोर्ट हवा होता . वकिलाती मध्ये सकाळी १० वाजता फोन केला. वेबसाईट वर १० वाजता ची वेळ दिलेली होती त्यानुसार . आधी कोणी फोन उचलला नहि. फोन घेणाऱ्या व्यक्तीने काय हवे विचारले. पासपोर्ट वरील नाव बदलण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात त्याची माहिती हवी म्हणून सांगितले . अत्यंत तुसडेपणाने उत्तर दिले कि वेबसाईट वर बघा . तिला सांगितले कि तिथे अर्धवट माहिती आहे .
मिसळपाव