जडण-घडण 20
बघण्या-दाखवण्याचे कार्यक्रम उत्साहात सुरू होते. या बाबतीत माझ्या आई-बाबांच्या बरोबरीने इतर नातेवाईकांचा उत्साह बघून मला मौज वाटत होती. मी या बाबतीत तटस्थ राहायचं ठरवलं होतं, त्यामुळे नव्या कामाकडे लक्ष केंद्रित करता येत होतं. नव्या माध्यमात मी रूळू लागले होते.
आमच्या संचालक बंगाली बाई, भरपूर उत्साही आणि प्रयोगशील. सतत नाविन्याच्या शोधात. त्यांचं मराठी बोलणं, हा आणखी एक गमतीचा भाग. त्यांच्या बोलण्यात केवळ नपुंसक लिंगाच्या अनुषंगाने उल्लेख यायचे. ते कामत, ते कागद, ते पंखा, ते टिव्ही, ते मधुरा आणि ते स्टोरी. असं बरंच काही.
मिसळपाव