Skip to main content

मुक्तक

गावाकडची जुनाट आज्जी .....

लेखक चुकलामाकला यांनी रविवार, 19/04/2015 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
जुन्या वहीची कोरी पाने खिन्न उदासी त्यांच्यावरती हुशार अवखळ मुले आजची होड्या का हो बनवत नाही अंगणातली हळवी माती वाट पाहुनी थकून गेली इवले इवले पाय चिमुकले इथे कधी का धावत नाही सडा गुलाबी गोड फळांचा बदाम आहे उभा कधीचा मगज आतला शुभ्र बदामी कुणा कधी का खुणवत नाही आंब्याची ती डहाळ वेडी कैर्‍यांच्या वजनाने झुकली तिला वाटते तुटून जावे एकाकीपण सोसत नाही सुट्टी येते .... संपून जाते..... गावाकडची जुनाट आज्जी उगा बिचारी वाट पहाते .....वाट पहाते.... (पहिल्या कडव्याची कल्पना एका हिंदी शेरावर आधारित.)

जालीय निदान

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 19/04/2015 01:32 या दिवशी प्रकाशित केले.
जालीय निदान ( internet diagnosis) काल माझ्याकडे सोनोग्राफीसाठी २५ वर्षांची एक लग्न न झालेली मुलगी आली होती. तिला पाळीच्या दिवसात फारच जास्त त्रास होत असे म्हणून स्त्रीरोग तज्ञाने माझ्याकडे पाठविले होते. माझ्या सोनोग्राफी च्या खोलीत मी रुग्णांच्या नातेवाईकांनासुद्धा येण्याची परवानगी देतो. त्याप्रमाणे तिची आई सुद्धा आली होती. मी तिचे केस पेपर पाहीले त्यात फारसे काही आढळले नाही. तिची सोनोग्राफी सुरु केल्यावर तिने मला बरेच प्रश्न विचारायला सुरुवात केली. डॉक्टर endometriosis अजून आहे का/ माझ्या ओव्हरीज कशा आहेत. त्यावर काही डाग आहे का? आतमध्ये सिस्ट (cyst) आहे का? गर्भाशयाला सूज आहे का?

सैतानाच्या भात्यामधले चार बाण धारदार

लेखक पगला गजोधर यांनी शुक्रवार, 17/04/2015 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
सैतानाच्या भात्यामधले चार बाण धारदार उपहास, चरित्र-हनन हत्या व जयजयकार होता त्यांचा वार संहार न ज्ञानामाउली वाचणार ना महात्मा वा घटनाकार प्रथम उपहासे यथाशक्ती दुर्लक्षीणार लोकामुखी गाथा इंद्रायणी बुडविणार नंतर इतिहासे चारित्र्य डागाळनार बाई वा बाटलीशी नाळ जोडवणार तरीही न खचला महामानव जर हत्या त्याची निश्चित ही होणार जर कीर्तीरूपी तो उरला तर समाधी स्थळी माथा टेकवून मुखे जयजयकार करणार
काव्यरस

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 17/04/2015 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.

ह्युमन रिसोर्स - एक प्रजात

लेखक चिनार यांनी बुधवार, 15/04/2015 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत असं सांगतो की, "कालानुरूप प्रत्येक प्रजातीचा जीव स्वत: मध्ये बदल घडवून आणतो जेणेकरून तो जीव इतर जीवांशी स्पर्धा करूनही टिकून राहू शकतो आणि पुनरुत्पादन करू शकतो" नाही नाही... या सिद्धांतावर आक्षेप नाहीये माझा. किंबहुना आक्षेप घेण्याएवढी पात्रतासुद्धा नाहीये. पण काहीही म्हणा, या डार्विनभाऊंना दूरदृष्टी नव्हतीच. मुळात त्यांनी अभ्यास केलेल्या प्रजातींशिवाय अस्तित्वात येऊ शकणाऱ्या काही प्रजातींकडे त्यांचे दुर्लक्षचं झाले.

ड्रिल

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 14/04/2015 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
ड्रिल म्हणजे कवायत हे शारीरिक शिक्षण( physical Training) नव्हे. यातील मुळ फरक काय ? तर एक शारीरिक प्रशिक्षण आहे आणि दुसरे मानसिक प्रशिक्षण. आमच्या एका मित्राच्या भाषेत डोक्याला भोक पडून काही गोष्टी डोक्यात घुसवल्या जातात आणि मग सिमेंटने सील केल्या जातात. शस्त्र चालवायला शिकवणे सोपे असते पण प्रत्यक्षात त्याचा वापर करणे हे तेवढे सोपे नसते. जेंव्हा तुम्ही शत्रूच्या समोर बंदूक हातात घेऊन उभे राहता आणि चहुबाजूनी गोळीबार सुरु होतो तेंव्हा तो आवाज तुम्हाला गर्भगळीत करून टाकतो तेंव्हा तुमची मती गुंग होते आणि हात पाय काम करेनासे होतात. अशा वेळेस काही गोष्टी यांत्रिकपणे करायला शिकवले जाते.

पुरुशाचे अस्तित्व...!

लेखक संदीप डांगे यांनी सोमवार, 13/04/2015 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
एका महान कवितेवर तितकेच टुकार विडंबन... मंडळी गोड माणुन घ्या. कर्तव्याच्या नावाखाली छळ मांडलाय पुरुषांचा. जन्मापासुन ते मृत्युपर्यंत कर्तव्याच्या दोरखंडाने बांधलंय त्याला. या दोरखंडातुन कधी सोडवण्याचा प्रयत्न केलाय कुणी? नाही! कारण प्रत्येक मनुष्याला फक्त आणि फक्त घेणंच माहीत आहे. एक पुरुष जेव्हा लहान कोंब असतो, तेव्हा आईच्या पोटातच त्याला इंजिनेर, डॉक्टर होण्याचे फर्मान सोडले जाते. कसा तरी करत जन्म घेतलाच त्याने, तर आई-बापाची स्वप्ने पुरी करायच्या बोझाखाली कोमेजुन टाकले जाते. आणि मोठेपणी हुंड्यापायी आईवडिलांना हवी असलेली मुलगी पुढ्यात आणून टाकली जाते.

स्रीचे अस्तित्व!

लेखक अश्विनि कोल्हे यांनी सोमवार, 13/04/2015 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
कर्तव्याच्या नावाखाली छळ मांडलाय स्रीचा. जन्मापासुन ते मृत्युपर्यंत कर्तव्याच्या दोरीने बांधलंय तिला. या दोरीतुन कधी सोडवण्याचा प्रयत्न केलाय कुणी? नाही! कारण प्रत्येक मनुष्याला फक्त आणि फक्त घेणंच माहीत आहे. एक स्री जेव्हा लहान कळी असते,तेव्हा आईच्या पोटातच तिला कुचलुन टाकले जाते. कशी तरी करत जन्म घेतलाच तिने ,तर कर्तव्याच्या बोझाखाली कोमेजुन टाकले जाते. आणि मोठेपणी हुंड्यापायी आईवडिलांना नकोशी झालेली मुलगी एखाद्या श्रीमंत वयस्काला विकुन टाकली जाते. आता काळ बदललांय जरी म्हणत असले तरी जमाना तोच आहे फक्त पद्धत बदललीय. स्वतःला सुशिक्षीत म्हणवणारा नवरा मुलगाही "आईवडिल म्हणतील तसंच" म्हणुन स्वतः

दिवस असे कि (भाग ३)

लेखक मालविका यांनी सोमवार, 13/04/2015 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
कोळथर ला आल्यावर पहिला दिवस छान पार पडला . दुसर्या दिवशी मुंजीसाठी करंज्या करायच्या होत्या . सकाळी सगळ जेवण वगैरे तयार करून आम्ही करंज्यांची जय्यत तयार केली . गावातील बायका मदतीला येणार होत्या . ताई च घर मस्त जुन्या पद्धतीच आहे. तिच्याकडे तशीच जुनी खूप भांडी वगैरे आहेत . वेगवेगळ्या प्रकारची भांडी मी तिथे बघितली . "पायली" च भांड आमच्याही घरी आहे पण "निठवी " हे एक मापाच भांड मी तिच्याचकडे पहिल्यांदा बघितलं . त्यांच्या घरी एकूण ८/९ पोळपाट आणि त्याहून जास्त लाटणी होती . वेगवेगळ्या प्रकारचे आणि मापाचे हे पोळपाट होते .

गेम ड्रोम -१

लेखक अद्द्या यांनी शनिवार, 11/04/2015 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
बारावी निकाल लागला . .खरं म्हणजे परत एकदा निकाल लागला . . मार्च ला ३ विषय . . जून ला साला १ विषय . . . " च्यायला हे केमेस्ट्री काय सुटत नाय अद्दया " . बाजूला थांबलेला माझा मित्र म्हणाला . . काही न बोलता नोटीस बोर्ड समोरून बाजूला झालो . मित्र हि होताच बाजूला . तिथून जे सुटलो ते थेट त्याच्या घरीच. . म्हणजे अगदीच काही ढ प्रकारात नवतो . बाकी विषयात होते ७५-८० . . पण केमेस्ट्री . . आयुष्यात लागलेली सर्वात मोठी पनवती होती च्यायला . विषय वाईट नाही तो . मजेदार आहे . पण काही केल्या डोक्यात घुसाय्चाच नाही . एक तर घोकंपट्टी कधी जमली नाही . प्रत्येक गोष्ट समजून घेऊन करायची मस्ती होती .