Skip to main content

मुक्तक

“पडणे” एक कला

लेखक दशानन यांनी सोमवार, 15/12/2014 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
दुसरा कोणी पडला तर त्याच्याकडे पाहून फिदीफिदी हसण्याची आपल्याकडे वाईट सवय आहे. पण त्यांना पाडणाऱ्या व्यक्तीने घेतलेले कष्ट दिसत नसतात असे माझे स्पष्ट मत आहे म्हणून मी “पडणे” एक कला हा लेख लिहितो आहे. सतत पडण्याची माझी दीर्घकालीन वाटचाल आहे, मी रस्तावर पडलो आहे, पाण्यात पडलो आहे, डोंगरावर पडलो, स्कूटर, बाईक, कार मधून देखील पडलो आहे, तसेच अनेक वेळा खड्यात देखील पडलो आहे, तसेच एकदा हवेतून देखील पडलो आहे.

दुष्काळ आणी पॅकेजः काही किस्से १

लेखक जेपी यांनी रविवार, 14/12/2014 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग १- वेळः २ महिण्यापुर्वीची. स्थळ:एका बँक मॅनेजरची केबिन.(मॅनेजर रिटायमेंटला वर्ष कमी असताना नागपुरातुन थेट बदली होऊन लातुरात आलेला) ग्राहक-आत येउ का सायेब मॅ- या ग्रा- सायेब आपल्याला ते हे पीक कर्ज पायजे. ...मॅनेजर कागदपत्र पाह्तो. मॅ- किती कर्ज पाहिजे ? ग्रा- द्या कि एक लाख काय. मॅ- एक लाख !! काय करणार एवढ कर्ज घेउन ? फेडण होणार आहे का ? ग्रा- सायेब आता तुमच्या पासुन काय लपवायच,एका लाखापेकी ३६,००० ची म्हस घ्याची. १४,००० चा कडबा घ्याचा. आन राहीलेला पन्नास तुमच्या बँकेत यफडी करु.

प्रतीक्षा आणि आगमन

लेखक मधुरा देशपांडे यांनी शुक्रवार, 12/12/2014 04:19 या दिवशी प्रकाशित केले.
कुठल्याही विमानतळाचा आगमन कक्ष किंवा जवळपासचा परिसर. सगळेच आपापल्या धुंदीत आणि तरीही विमानाच्या वेळेकडे काटेकोर लक्ष. कुणी एकटेच, कुणी कुटुंबासोबत. कुणी अक्ख्या गावासोबत. कुणाच्या हातात स्वागताचे बोर्ड तर कुणाच्या हातात फुलं. सगळ्यांचे लक्ष फक्त आपली जवळची व्यक्ती कधी येतेय याकडे. कुणाच्या हातात नावांचे बोर्ड. एकदा या चार लोकांना यांच्या घरी यांना सोडले की माझे आजचे काम संपणार या विचारातले काही लोक. कुणाचा महिनाभराचा तर कुणाचा वर्षाचा विरह. पण सगळ्यात जास्त वाट बघायला लावणारी वेळ म्हणजे ही शेवटची काही मिनिटे. फोन, स्काइप, इमेल्स हे सगळे विमानात बसायच्या आधीपर्यंत चालूच असते.

पूर्वेच्या समुद्रात-३

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 10/12/2014 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
गोवा कारवारच्या आसपास नुसते इकडून तिकडे भटकणे झाल्यावर कोची च्या दिशेने कूच केले. तालसेरी (जुने नाव तेल्लीचेरी) च्या आसपास ( मंगळूरू च्या दक्षिणेस) परत काही रडारवर तपास लागला म्हणून पहाटे आमचा मोर्चा तिकडे वळविला गेला. तेंव्हा तेथे दोन मच्छीमार नौका दिसल्या. हे सर्व वीर श्रीलंकेतून येथे आले होते. तेंव्हा त्यांना ताबडतोब थांबण्याचा इशारा दिला गेला. सवयीप्रमाणे त्यांनी पळायला सुरुवात केली. आमच्या नौकेने त्यांच्यावर मशीनगन ने थोड्या गोळ्या डागल्या तरी ते दाद देईनात.

बस्स इतकेच..

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 10/12/2014 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यापासून दूर होऊन अमाप काळ लोटला दु:ख हलकं नाही झालयं पण सहन करण्याची ताकद वाढलीये.. बस्स इतकेच.. ---- आता दारावरचा पारीजात ओसंडून बरसला तरी त्याचा हेवा वाटेनासा झालायं फक्त एक हलकिशी कळ आली काल छातीत जेव्हा त्याचे एक फुल पायाखाली आले बस्स इतकेच.. ---- परवा अलमारी उचकतांना तुझे एक पैंजण हाताला लागले छन्न झालं एकदम आपल्या जोडीदाराअभावी एकाकी,केविलवाणे वाटले बस्स इतकेच.. ---- तिथेच बाजूला आपला एक अल्बम सापडला 'त्या' तस्बिरीतले तुझे डोळे आणि त्या डोळ्यातले ते काजळ.. बघता बघता कां कोण जाणे टचकन डोळ्यात पाणिच तरारले एकदम बस्स इतकेच.. ---- तुझी आठवण आजही येते अगदी नित्यनेमाने काही ठोके चुकतात

जडण-घडण 15

लेखक माधुरी विनायक यांनी मंगळवार, 09/12/2014 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत मार्केटमध्ये कंपनीचं चांगलंच नाव झालं होतं. मला आठवतंय, त्या वर्षी दिवाळीसाठी वेगवेगळ्या आकारातल्या १०० पेक्षा जास्त शुभेच्छापत्रांसाठी मी संदेश लेखन केलं. यात आकार वैविध्याबरोबर पॉप अप, विनोदी, कॉर्पोरेट अशा प्रकारांचाही समावेश होता. एकंदर घोडदौड वेगात सुरू होती. मागच्या भागात सांगितलेल्या द्व्यर्थी किंवा काहिसे अश्लील शुभेच्छा संदेश लिहिण्याचं सुचवणाऱ्या त्या प्रसंगानंतर माझी एकंदर प्रतिक्रिया लक्षात घेत तो विषय तिथेच संपला होता. मला त्या वेळी घड्याळं जमवायची आवड होती. पण ही घड्याळं मनगटावर कमी आणि माझ्या डेस्कवर जास्त वेळ दिसायची.

ती गच्चीवरची झाडं.

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 08/12/2014 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
आता हे नाव वाचून तुम्हाला वाटत असेल ह्यात काय नवीन आहे, काय विशेष आहे ? तर विशेष अस काही नाही, साधी झाडंच आहेत ती. पण मला जरा वेगळी वाटली, कशी ? ते सांगावास वाटलं, म्हणून हा तोकडा का होईना प्रयत्न. आता इथे, फिलीप्पिंस मध्ये येयून मला जवळ जवळ दीड वर्ष होत आली. वयाच्या ३० व्या वर्षी पहिल्यांदा घरातून बाहेर पडलो, ते सुद्धा थेट घरापासून हजारो मैल दूर. आत्तापर्यंत मी घरच्यांबरोबरच राहत होतो, सगळ जागच्या जागी मिळायच, व्यवस्थित, अगदी ऑफिसमधून घरी गेल्या गेल्या, गरम गरम जेवण पुढ्यात आणून आई ठेवायची, सकाळी ऑफिसच्या बस ला सोडायला न चुकता भाऊ हजेरी लावायचा. अगदी सुखाच आयुष्य.

टेक्श्चर

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 04/12/2014 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
कापडाच्या दुकानात एक कापड आवडलं पण घेतलं नाही दुकानदाराला सांगितलं धागा छान आहे रंग उत्तम आहे नक्षीही सुरेख आहे फक्त 'टेक्श्चर' चांगलं नाही नंतर विचार केला, तेंव्हा काही माणसं डोळ्यासमोर तरळली; त्यांचही असंच आहे....
काव्यरस

साल्याने पेपर टाकलाय.......

लेखक सार्थबोध यांनी बुधवार, 03/12/2014 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
आय टी मध्ये राजीनामा देणे, या क्रियेला पेपर टाकणे असे म्हणतात, त्यावर हि कविता. साल्याने पेपर टाकलाय................... तो रोज ऑफिसला येतो वेळेत येतो; वेळेत जातो नऊ तास भरले नाहीत; तर चिंता करतो कमी भरले तास; तर नंतर भरून काढतो साहेबाने काम दिले; तर नाश्त्याला पण जात नाही साहेब जागेवर असताना; जागचा उठत नाही कितीपण महत्वाचे काम असो; साहेब गायब झाल्याशिवाय हा जागचा हालत नाही साहेब खुर्चीत यायच्या आत, जागेवर यायची सवय काही जात नाही जास्त सुट्या घेत नाही, घेतली तरी अप्रुव्हल घेतल्याशिवाय; कलटी टाकत नाही ओव्हर टाइम कधी मागत नाही कॉम्प-ऑफ कधी घेत नाही. मोबाईल वर फोन आला; तर साहेबासमोर बोलत नाह

पूर्वेच्या समुद्रात -- २

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 28/11/2014 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे जहाज संध्याकाळी गोव्याच्या आसपास पोहोचले. अर्थात हे फक्त आम्हाला जी पी एस आणि दीप स्तंभांवरून कळत होते. पावसाळी वातावरणामुळे समुद्रकिनारा दिसत नव्हताच. पण गोव्याच्या आसपास पोहोचल्यावर तेथील तट रक्षक दलाच्या मुख्यालयात संपर्क केला असता पुढचे दोन दिवस गोवा ते कारवार अशी गस्त घालण्याचे आदेश मिळाले. म्हणजे सरळ दक्षिणेकडे कूच करायच्या ऐवजी तिथेच खेटे मारत राहायचे होते. आता हे का करायचे तर पावसाळ्यात मासेमारी बंद असते. हा काळ माशांच्या प्रजननाचा असतो त्यामुळे मत्स्यबीज कमी होऊन पुढच्या वर्षभर तुटवडा जाणवू नये म्हणून केलेली बेगमी असते.