गेम ड्रोम -१
बारावी निकाल लागला . .खरं म्हणजे परत एकदा निकाल लागला . . मार्च ला ३ विषय . .
जून ला साला १ विषय . . . " च्यायला हे केमेस्ट्री काय सुटत नाय अद्दया " . बाजूला थांबलेला माझा मित्र म्हणाला . . काही न बोलता नोटीस बोर्ड समोरून बाजूला झालो . मित्र हि होताच बाजूला . तिथून जे सुटलो ते थेट त्याच्या घरीच. . म्हणजे अगदीच काही ढ प्रकारात नवतो . बाकी विषयात होते ७५-८० . . पण केमेस्ट्री . . आयुष्यात लागलेली सर्वात मोठी पनवती होती च्यायला . विषय वाईट नाही तो . मजेदार आहे . पण काही केल्या डोक्यात घुसाय्चाच नाही . एक तर घोकंपट्टी कधी जमली नाही . प्रत्येक गोष्ट समजून घेऊन करायची मस्ती होती .
मिसळपाव