Skip to main content

मांडणी

नायक क्रमांक एक

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 02/04/2013 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी. (कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे) (ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे.

आज फिर मरनेका इरादा है ......!!!

लेखक जेनी... यांनी सोमवार, 01/04/2013 04:13 या दिवशी प्रकाशित केले.
आज तो जीने की तमन्ना है........... हा लेख विजुभाऊंना समर्पित ...... ******************************************************************************************************************************************************* आज फिर मरनेका इरादा है! . . . . काल डायवोर्स पेपर वर सह्या करताना तुझा हात एकदा तरी थरथरेल ,नजर बिथरेल असं वाटलं होतं, पण नाही ,एका अर्थी बरंच झालं. तुला मोकळ्या आभाळाखाली मोकळा श्वास हवा होता, आणि तुला श्वास घेताना मला पहायचं होतं.

गाथा 'टायटन' ची - Heritage Collection

लेखक मोदक यांनी रविवार, 24/03/2013 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
. टायटन एज् बाजारपेठेमध्ये आले त्याच दरम्यान National Institute of Design मधील एक तरूण 'प्रोजेक्ट वर्क' साठी टायटन मध्ये दाखल झाला. घड्याळांच्या डिझाईन क्षेत्रामध्ये संपूर्णपणे नवीन व अननुभवी असलेल्या या तरूणाने Etikoppaka या आंध्र प्रदेशातील पारंपारिक लाकडी खेळण्यांच्या डिझाईन प्रमाणे भिंतीवरील घड्याळे तयार केली. ही कल्पना यशस्वी ठरली व या घड्याळांची अल्पावधीतच प्रचंड प्रमाणात विक्री झाली.

कोकणातील शिमगोत्सव

लेखक मंदार कात्रे यांनी रविवार, 17/03/2013 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणातील शिमगा सगळ्या चाकरमानी लोकांच्या हृदयातला हळवा कोपरा ! कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपती च्या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात . घरट्याबाहेर उडालेल्या पिल्लाची जशी पक्षिण वाट पाहते ,तसेच गाव आणि गावकरी आपल्या चाकरमान्यांची वाट पहाट असतात. कोकणात विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण सुमारे 5 ते 15 दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन शुद्ध द्वादशी /त्रयोदशी किंवा पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. यामध्ये मुख्य काम म्हणजे ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे (देवीच्या उत्सवमूर्ती) ठेवून पालखी देवळातून सहाणेवर आणणे .

साक्षात्कार

लेखक सस्नेह यांनी शनिवार, 16/03/2013 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : साक्षात्कार या शब्दातून कोणताही दैवी अगर परमेश्वरी साक्षात्कार या लेखात अभिप्रेत नाही. a समोर आणि मागे ...वर आणि खाली ..या बाजूला अन त्या बाजूला एक लांबलचक अंधारा बोगदा.. बोगद्यात प्रवेश करताना वाटत होतं, हां हां म्हणता संपेल तो. पण जसजसं आत जाऊ तसं अंधार दाटतच चाललाय ...अंतराचा ठाव लागेना झालाय... मी जात आहे..की येत आहे ?

विकसित भारत ?

लेखक जोशमनिष यांनी बुधवार, 27/02/2013 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्याच आठवड्यात मी पद्मालय येथे गाडीवर गेलो होतो. सकाळची वेळ होती. गाडीवरून मी एका छोट्याशा गावाजवळून चाललो होतो. कुठल्याही भारतीय खेडे गावाबाहेर रस्त्याच्या बाजूलाच प्रातर्विधीसाठी बसलेले लोक दिसणे यात आपल्याला नाविन्य / आश्चर्य / खेद वाटत नाही. पण त्यादिवशी मला एक नववधू परततांना दिसली. नवीनच लग्न होऊन आलेली ती चिसौकां मोठ्या बावरलेल्या नजरेने चालली होती. कपाळावर बांधलेल्या मुंडावळ्या व अंगाची हळद नवीन लग्नाची साक्ष देत होते.

वीर सावरकर

लेखक Dhananjay Borgaonkar यांनी मंगळवार, 26/02/2013 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज स्वा.सावरकरांची पुण्यतिथी. २६ फेब्रुवारी १९६६ रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांचे मुंबई येथे निधन झाले. राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरानी सुरु केली.पुढे त्याचे रुपांतर अभिनव भारत या संघटनेत झाले. सावरकर जातीभेद नष्ट करण्यासाठी सुद्धा खुप लढले. हिंदुत्व ही संज्ञा त्यांनीच तयार केली. हिंदुत्वाविषयीचे त्यांचे विचार आजही अत्यंत प्ररणादायी आहेत. सावरकरांनी ११ वर्षे काळ्यापाण्याची शि़क्षा भोगली. तुरुंगात असताना त्यांनी अनेक महाकावव्ये लिहिली. १९२१ साली त्यांची तुरुंगातुन सुटका झाली. त्यानंतर ते हिंदु महासभेचे अध्य़क्ष अनेक वर्षे होते.

अध:पतन

लेखक खटासि खट यांनी शुक्रवार, 22/02/2013 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्रकांत, माझ्याशी लग्न करशील ? नाही मधू.. आपला फक्त हनीमून होऊ शकतो. असले जोक्स एकमेकांना सांगणे ही हाईट असलेल्या काळातल्या झंपूतात्यांच्या हातात ती आमंत्रणपत्रिका पडताच ते तीनताड उडाले. हल्ली उडण्यात नवलाई अशी राहीलीच नव्हती. परवा रणछोडदास वाण्याच्या अमेरिकेतल्या मुलीने लग्न न करताच तसंच कुणाबरोबर रहायला सुरूवात केल्याची बातमी कानी पडली तेव्हां पण ते असेच उडालेले. रणछोडदास मात्र अरे बाबा त्येला लीव्ह इन रिलेशनशिप म्हणतेत, इटस लीगल असं कसंनुसं हसत सांगत होता. याच सज्जन गृहस्थानं याच पोरीचा देशी मित्र खालच्या जातीचा होता म्हणून त्याला गायब केल्याचं बोललं जात होतं.

उलट तपासणी - भाऊ तोरसेकरांचा ब्लॉग...

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 14/02/2013 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, काही दिवसांपुर्वी पुण्यनगरी दैनिक रेल्वे प्रवासात सहज वाचायला मिळाले. त्यातील 'उलटतपासणी' हे सदर वाचून व अरुंधती राय ताईंनी काढलेल्या अनमोल विचारांच्या धाग्यात सहभागी न होता हा नवा धागा टाकावासा वाटला. श्री. भाऊ तोरसेकर एक वरिष्ठ पत्रकार आहेत. त्यांचे लेख नुसतेच वाचनीय नसतात. तर मननीयही असतात. विविध बातम्यांमागील पटकन लक्षात न येणारी तथ्ये त्यात उलगडली जातात. अनेकदा नेमके असेच मला वाटते पण ते इतक्या अचूकपणे मांडलेले वाचून आपल्या मतांना/ विचारांना एक प्रकारचा आधार मिळतो असे वाटते. त्यांच्याशी वाद घालून त्यांचे वाभाडे काढणारे कमी.