मित्रांच्या भयानक मस्करीला बळी ठरलो होतो.
संध्याकाळच्या बरोब्बर पाचच्या दरम्यान टाईम स्क्वेअरच्या पायर्यांवर जाऊन आजूबाजूची मस्ती बघत विसावलो होतो . एप्रिल महिन्याची पहिलीच तारीख. अनायसे आलेला शनिवार. शनिवारि आम्हा भारतीयांचा छोटासा मेळावा ज्याला सोप्प्या इंग्रजीत गेट टुगेदर म्हटल जातं. शनिवार खास असायचा आमच्यासाठी .बीअर चे टिन घेऊन संध्याकाळच्या वेळी न्युयॉर्क शहरातल्या भन्नाट गर्दीत ,आजुबाजुच्या झगमगाटात ,त्याच गर्दीचा एक भाग बनायचो आम्ही.मजा यायची .मस्त ग्रुप होता .
सहा वाजत आले, पण कुणाचाच पत्ता नाही. फोनही उचलेनात कुणी. एक सोडला, दुसरा सोडला, 'अरे यार कुणीतरी रीप्लाय करा !