Skip to main content

मांडणी

शुक्रतारा ....मंदवारा ... नाबाद ५० वर्षे

लेखक चौकटराजा यांनी बुधवार, 31/10/2012 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रतारा मंदवारा या गाण्याला जन्मून ५० वर्षे झाली. आज ही हे गीत आजच्या तरूण पिढीत लोकप्रिय आहे. आणि आठवण म्हणून म्हातार्‍या-कोतार्‍यातही. एक समर्थ भावगीत गायक म्हणून या गीताने अरूण दाते ( खरे अरविन्द दाते ) याना ओळख मिळवून दिली.सुधा मलहोत्रा यांचा मधाळ आवाज मराठी गानससिकाना परिचित झाला तो ही याच गाण्याने. त्यावेळी आकाशवाणी मुंब्ई केंद्रावर जे लोक नोकरीस होते त्यांची सांस्कृतिक चंगळच होती. नीलम प्रभू.

पाठशिवण!

लेखक स्पंदना यांनी बुधवार, 31/10/2012 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
सांजेला तसा वेळ होता. अजुन शिवारात लगबग जाणवत होती. आताशा पाहुणा म्हणुन आलेल्या मला, माझ नेहमीच ठिकाण......मोटवन खुणावत होती. तस तिच माझ नात फार वर्षांच. आजोळी आईचा पदर धरुन येउ लागल्यापासुनच माझ्या आजोबांनीच पहिला हिची ओळख करुन दिली होती अन, शाळा कॉलेज संपवुन आलेल्या माझ्या गद्धेपंचवीशीला निवांतपणासाठी हिची ओढ होती. नेहमीसारख मी मोटवनीवरुन विहिरीत डोकावुन पाहिल. काळशाऽऽर पाणी खोलवर डुचमळत होत. क्षणभर भारल्यासारख झाल..... आजुबाजुचे आवाज विरले..... "थंड आहे पाणी ते!", मी दचकलो. मला माहितही नाही आणि माझ्याशेजारी एक निटस नवयौवना उभी! नाही म्हंटल तरी जरा मोहरलो... "खाली

सहजच..१

लेखक अश्फाक यांनी शनिवार, 29/09/2012 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या रोजच्या जिवनात कळत ऩकळत किती लहान मोठे प्रसंग अविरत घडत असतात. कधी ते आपल्याला हसवता,,राग आनतात , कधी दुखी करतात तर कधी उद्वीग्न कधी समधानी करतात . अशाच लहान मोठ्या प्रसंगांना कलमबद्ध करन्याचा एक प्रयत्न करत आहे , बघा आवडले तर अजुन लिहीन. हो तर सुरुवात घरी घडलेल्या एका मजेशीर प्रसंगापासुन करु या , मी व सौ सहजच गप्पा मारत बसलो होतो आणि विशय निघाला नविन घराच्या बांधकामाचा , एक जागा दोन वर्शा पासुन घेवुन ठेवली आहे पन काम चालु करयला या ना त्या कारनाने उशीर होत आहे. बोलता बोलता बांधने बांधकाम सारखे शब्द वारवार येत होते .

शब्दांचा स्पर्श !!

लेखक जेनी... यांनी गुरुवार, 06/09/2012 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
शांत स्वरात मिसळावा,अन एकच तरंग कानात घुमावा, इतका सुरेख प्रवास व्हायचा शब्दांचा ! कधी तोच शब्द, तुझ्या माझ्यात ओठांचा आधार घेऊन, अस्तित्व सिद्ध करायचा ! तर कधी, अबोल डोळ्यातल्या भावनेच्या स्वरूपात, स्वता:ला पहायचा ! मी खरच हरवून जायची ,उताविळ नजरेनं, तुझ्या नकळत तुझाच पाठलाग व्हायचा ! तुझ्या एकेक हालचालीवर, शांत नजरेन लक्ष ठेवायची मी, तुझं बोलन तुझं चालणं, अगदी तुझं माझ्याकडे चोरून बघणं हि मी मनमुराद लुटायची,पण मग कळलं, कि तुलाही शब्दांचा अर्थ जाणून घ्यायचाय ! तुझ्याही डोळ्यात, त्या अर्थाचे भाव तयार झालेत, तुझ्याही ओठांवर त्या शब्दांना, स्पर्शाच्या खुणा ठेवायची इच्छा आहे ! बाहेरच्या जगापासू
काव्यरस

लबाड सभ्य

लेखक सृष्टीलावण्या यांनी शनिवार, 25/08/2012 06:30 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या सत्तालोभी र्‍हस्व दृष्टि राजकारणी मंडळींनी काही स्वयंघोषित इतिहासकारांना हाताशी धरून जातीचे राजकारण चालवले आहे. विशेषकरून ब्राह्मणद्वेष हा त्या गलिच्छ खेळीचा पाया झालेला आहे. अफझलखानाला पिता मानणारी मंडळी सध्या कृष्णाजी भास्कर ह्या अफझलखानाच्या वकिलावर चिखलफेक करताना आढळतात. ह्यात त्यांनी आनंद मानायला कोणाची हरकत असायला काहीच कारण नाही. कारण कोणीतरी (बहुदा विनोबाजींनी) म्हटले आहे की श्रोते कीर्तनाचा लाभ घेत असताना पालीचा आनंद मात्र किडे मटकवण्यात असतो. पण आश्चर्याची बाब म्हणजे ह्या सर्व स्वघोषित विद्वज्जनांना महाराजांचे वकील श्री. गोपीनाथपंत बोकील ह्यांचा अनायास विसर पडलेला दिसतो.

'भारतीय' एक पहावा असा चित्रपट

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 21/08/2012 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
एक शहरातला तरूण खेड्यात जातो. तिथे तो काही बदल घडवू इच्छितो. इथले लोक इतके सुस्त कसे ? आपल्या प्रगतीसाठी ते काहीच हालचाल का करत नाहीत ? असे प्रश्न त्याला पडतात. विजेचा भरोसा नाही , पिण्याच्या पाण्याचेही हालच. गावात एका तरुणीने शाळा स्वरूपाचे काही कार्य चालू केले आहे. सगळी 'स्वदेश' ची आठवण यावी अशी परिस्थिती. यात भर म्हणजे चित्रविचित्र दाढी वाढलेला असंबद्ध वाटावं असं बोलणारा असा एक साधु बैरागीही यामधे आहे. त्यात देशपांडे होता यात मकरंदच पण अनासपुरे आहे. -- अलिकडच्या काळात ग्रामीण मराठी चित्रपट म्हटलं की जे शहरी लोक काम करतात त्यांच्यापैकी एक म्हणजे मोहन आगाशे.

'आम्ही ऑलिम्पिक बघितले' : लंडन २०१२ तिकीट - फ्रॉड (झोल) वेब साईट

लेखक स्वरालि यांनी शुक्रवार, 03/08/2012 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
लंडन २०१२ ची तिकिटे resale ला ठेवली आहेत असे समजले. दीड वर्षापूर्वी लंडन २०१२ official वेब साईट वर रजिस्टर करूनही (कोणत्याही खेळाचे) तिकीट मिळाले नाही, म्हणून खूप वाईट वाटत होते...आणि रागही येत होता (विशेषतः टीवी वर ऑलिम्पिक खेळ होताना 'रिकाम्या सीट्स' बघून मनात नुसता राग खवळत होता). लंडन मध्ये असूनही एकही ऑलिम्पिक खेळ बघायला न मिळणे म्हणजे काय?