किंग, क्वीन नि आणखी काही.
प्रत्येक स्त्रीच्या मनात एक क्वीन असते म्हणे. ती सापडण्याचा क्षण टिपणं आवश्यक असतं. पुरुष तरी का अपवाद असावेत? क्वीन सापडणं हा स्वत्व गवसण्याचा क्षण असावा असं तो चित्रपट पाहिलेल्या लोकांची मतं वाचताना जाणवलं. तसंच असेल!
..................
सातवीच्या वर्गात असलेला पण वर्गात कधीच न बोलणारा मुलगा शिक्षकांच्या आग्रहामुळं एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतो. स्पर्धेवेळी सगळ्यांची भाषणं ऐकून हातपाय गळपटलेला, काय बोलायचं ते न आठवता जसं सुचेल तसं धाडकन बोलून खाली बसतो. नंतर स्पर्धेत तिसरा मिळालेला क्रमांक. इथं 'किंग' सापडत असेल का?
-----------------
नुकताच दहावीला चांगले मार्क मिळवून कॉलेजला आलेला तो. आतापर्यंत मराठी माध्यमात शिकलाय. अकरावी च्या पहिल्या युनिट टेस्टला फारच कमी गुण. इंग्रजी समजत नाही हो नीट. घरच्यांची सॉलिड बोलणी खाल्लीत. नंतर अचानक कधीतरी आपल्याकडं पाहताना दिसलेला चेहरा बघताना सुखावलेला तो. ठरवून अभ्यास करुन फर्स्ट टर्म ला पहिल्या पाचात येतो. इथं 'किंग' सापडत असेल का?
------------------
नुकतीच अरेन्ज्ड मॅरेज झालेली मुलगी. सासरचे कसे आहेत फार ठाऊक नाही. नव्याचे नऊ दिवस सरतात नि एक दिवस सासू चार दिवस बाहेर जायला निघते. जातानाच्या सूचना सांगितलेल्या आहेतच तरी कुकरला भात लावताना तांदूळ किती घ्यावेत हे सासूला विचारत असलेली ही जमेल तसा स्वैपाक करुन सासर्यांना जेवायला वाढते. घाबरतच जेवायला वाढताना 'मस्त झालाय स्वैपाक म्हणणारे' सासरे. इथं क्वीन सापडत असेल काय?
------------------
कॉलेजात हॉस्टेलला असताना, विद्यार्थ्यांना वेळेवर नीटसं काही मिळत नाहीये, अनागोंदी कारभार सुरु आहे असं वर्तमानपत्रात छापून आल्यावर नाही, असं काही नाही तुम्ही आमच्या कॉलेजची माफी मागितली पाहिजे असं वर्तमानपत्राच्या कार्यालयात जाऊन सांगताना सांगणारा सुसंगत सांगतोय, बोलतोय म्हणताना आपसुकच संवादाची सूत्रं एका आतापर्यंत दुर्लक्षित विद्यार्थ्याच्या हाती येतात तेव्हा त्याला 'किंग' सापडत असेल काय?
-------------------
एखाद्या कामामध्ये काही गोष्टी करताना बारीक गोष्टींचा विचार घडून कामाची सुसूत्रता नि त्यानुसार अम्मलबजावणी करवून घेताना एखादा नकळतच 'किंग' बनत असेल काय?
....................
मला काही तरी करायचंय, आत्मविश्वास वाढवायचा आहे, मोठं व्हायचंय ह्याचा काही नक्की फॉर्म्युला असतो? काही सूत्र असतं? नसावं बहुधा.
परवापेक्षा काल नि कालपेक्षा आज एखादं पाऊल थोडं मोठं नि दमदार टाकलं, एखादी छान कृती केली की सहजच आपल्याला एखादी गोष्ट जमते नि त्या कृतीद्वारे आपण आपल्याला सिद्ध केलेलं असतं. ते सिद्ध करणं अथवा होणं हेच आत्मविश्वासाचं दृढीकरण लक्षण.
एखादी गोष्ट नाही जमली तरी ती गोष्ट करण्यासाठी केलेली खटपट, धडपड नि त्या गोष्टीच्या यशस्वीतेसाठी केलेली वाटचाल आपल्याला आवश्यक ती नियोजनाची नि आवश्यक कष्टांची कल्पना देत असतं. ध्येयाकडं जाताना केलेला प्रवास सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतोच.
प्रत्येकामधल्या क्वीन अथवा किंगचा शोध घ्यावा, मागोवा घ्यावा, हुडकून काढावं. मात्र नंतर सापडलेल्या क्वीनला अथवा किंगला वारंवार 'चेक' करत रहावंच. काय म्हणता?
वाचने
5916
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
आपसुकच संवादाची सूत्रं एका
आपसुकच संवादाची सूत्रं एका आतापर्यंत दुर्लक्षित विद्यार्थ्याच्या हाती येतात तेव्हा त्याला 'किंग' सापडत असेल काय?हे असे होते खरे, मी स्वताही अनुभवलेय बरेचदा. इतरांचेही अनुभव पाहिलेत. अगदी गली क्रिकेटमध्येही असला अनुभव घेतलाय.मत्स! परशात्न अव्ले.. तुमचे
In reply to मत्स! परशात्न अव्ले.. तुमचे by बालगंधर्व
तेम्क यु.
चला
In reply to चला by इरसाल
मुक्तक आवडले.
मुक्तक आवडले.
In reply to मुक्तक आवडले. by यशोधरा
खूप सुन्दर प्रशन्त'जी!!!!..
चान चान...! करमणूक झाली वाचुन.
In reply to चान चान...! करमणूक झाली वाचुन. by आत्मशून्य
साँशय तर मलापण कधीच नसतो.
In reply to साँशय तर मलापण कधीच नसतो. by कवितानागेश
विस्कटुन सांगा
छान लिहिलंय...
मीही अनुभवलंय ..... १० वी ला
मात्र नंतर सापडलेल्या क्वीनला
चांगलं लिहिलंय
In reply to चांगलं लिहिलंय by पैसा
सहमत
In reply to सहमत by कवितानागेश
वेगळा धागा काढून
In reply to वेगळा धागा काढून by तुमचा अभिषेक
छान नाव ठेवले की!
नुकताच दहावीला चांगले मार्क
अप्रतिम लिहिले आहे.
मस्त विचारमंथन......
छान
आवडले.
वा व्वा भाई !
ह्म्म्म!! दिसामाजि काहितरि
In reply to ह्म्म्म!! दिसामाजि काहितरि by सूड
तुम्हाला दिसामाजी काहीतरी
In reply to तुम्हाला दिसामाजी काहीतरी by कवितानागेश
ह्म्म!! असोच्च्च्च!!
वाचक, प्रतिसादक, ह्यांचे आभार
In reply to वाचक, प्रतिसादक, ह्यांचे आभार by प्यारे१
@आत्मशून्य ह्यांचे खास तर सूड
In reply to @आत्मशून्य ह्यांचे खास तर सूड by अत्रुप्त आत्मा
कुणाला कधी काय आवडेल...
सेन्सिबल. किंग/क्वीन
छान छान हो...परेषानजी!
आवडले
लेखन आवडले . विचार पटले .