अव्यक्त स्पंदने
- Read more about अव्यक्त स्पंदने
- Log in or register to post comments
...आणि मलाच माझी दया आली... इतका जीव लावतो आपण काही माणसांना .. त्यांच्या वागण्यात जरा जरी बदल झाला तरी कळवळून येत मनात..
कधीकधी स्वतःला त्यांच्या जागी ठेवून विचार करायला लागतो आपण.. त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करतो ...पण त्रास काही संपत नाही.. असं का वागवस वाटलं असेल त्या व्यक्तीला माझ्याशी हे काही केल्या उमगत नाही..
मग अशावेळी काही हक्काची माणसं आठवतात ... जी कायम सोबत असतात सावलीसारखी ...या अशा काळात त्यांची जास्त आठवण येते..
कधीकधी वाटत खूप गृहीत धरतो आपण त्यांना.. तुम्ही खूप महत्वाचे आहात हे सांगायचंच राहून जातं बऱ्याचदा.. ही माणसं रक्ताच्या नात्यांनी बांधलेली नसतात..