Skip to main content

मांडणी

ट्रम्प व्हिझिट पुणे

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 24/02/2020 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
माननीय श्री डोनाल्ड ट्रम्प तात्या यांच्या TrumpIndiaVisit दरम्यान पुणे दौऱ्यातील मधील कार्यक्रम. सकाळच्या 5.30 ला येणाऱ्या महाराष्ट्र एक्सस्प्रेस ने ७ वाजता पुणे रेल्वे स्टेशन वर आगमन मका यांच्याकडून हे सुरांनो चंद्र व्हा हे फ्युजन ऐकवून स्वागत रिक्षा चालका सोबत भाड्यावरून वाद.

शिवजयंतीच्या निमित्ताने... लाल महालावरील शिवाजी महाराजाचा सर्जिकल स्ट्राईक

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 19/02/2020 12:08 या दिवशी प्रकाशित केले.

शिवजयंतीच्या निमित्ताने...

लाल महालावरील शिवाजी महाराजाचा सर्जिकल स्ट्राईक

 शिवजयंती उत्सवाच्या पर्वणीत महाराजांच्या पराक्रमाची गाथा लष्करी अधिकार्‍यांच्या नजरेतून सादर करण्यात विलक्षण आनंद होतो आहे. महाराजांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून फत्ते केलेल्या अनेक कारवायातून जगातील लष्करी इतिहासात त्यांचे उत्तुंग व विराट व्यक्तिमत्त्व खुलून दिसते. त्यात शायिस्ताखानाला खतम करायची सर्जिकल स्ट्राईक मोहीम अग्रणी आहे.

प्रतिमांचे शिकार

लेखक सर टोबी यांनी सोमवार, 10/02/2020 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
आपण वेगवेगळ्या प्रतिमांचे नकळतपणे शिकार होत असतो. कुठले तरी ठिकाण, एखादा सिनेमा, एखादं हॉटेल खूप छान आहे अशी प्रसिध्धी असते. त्या ठिकाणी आपण जातो परंतु कित्येक वेळेला येणार अनुभव जे काही ग्रेट वगैरे ऐकलेले असते त्याच्या जवळपास तर सोडाच पण भिकार म्हणावा इतका वाईट असतो. आपण किती भिडस्त किंवा फटकळ आहोत त्यानुसार आपण जमेल तसा आपला अनुभव व्यक्त करतो. पण काही प्रतिमा तर त्याहून बळकट असतात. म्हणजे इतक्या कि जर आपल्याला सर्वमान्य अनुभव आला नाही तर आपल्यातच काही तरी उणीव आहे म्हणून आपण स्वतःला दोष देतो.

निर्ढावलेपणाचा प्रवास

लेखक सर टोबी यांनी शनिवार, 08/02/2020 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
तसे आपण सर्वच काही ना काही गोष्टींना निर्ढावलेले असतो किंवा हळू हळू आपण त्या गोष्टींशी जमवून घ्यायला सुरुवात करतो. आपल्यातले काही जण तर सर्वसाधारण जाणीवांच्यापलीकडे जाऊन स्थितप्रज्ञ झालेले असतात. हॉस्पिटलमध्ये काम करणारा स्टाफ हा पेशंटच्या वेदना आणि अडचणी यांनी फारसा बाधित न होता आपले काम आणि आपले जीवन व्यवस्थित जगायला शिकतो. ज्या गोष्टींमुळे सामान्य माणसं हलून जातात तिथे हि माणसं निर्विकारपणे आपलं काम करीत राहतात. आणि असं निर्विकार होणं हे आवश्यक पण असते. पण आपल्यातले बऱ्याच उदारमतवादिनीं काही काळ का होईना गेल्या काही वर्षात मोठे भावनात्मक आव्हान पेलले असण्याची शक्यता आहे.

भाग १७ - कादंबरीतील व्यक्तींचा, स्थानांचा चित्रमय परिचय

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 05/02/2020 19:28 या दिवशी प्रकाशित केले.

• चित्रमय परिचय

 Figure 1माधवनगरचा गुरूवार पेठेतला आमचा त्या वेळचा बंगला व बागेचा भाग. जिथे हे नाट्य घडले. बागेचे कालांतराने रिंग टेनिसचे कोर्ट बनले होते. शशी मोठा झाल्यावर आपल्या मित्रांसह तिथे खेळताना...  Figure 2 त्याच जागेतील नव्या बंगल्याचे रूप  Figure 3 प्रज्ञानानंद सरस्वती - आई व वडिलांचे गुरू.

भाग १६ अंधारछाया अंतिम प्रकरण १५ - ‘पकडा! पकडा! तिच्या वरल्या सावलीला जाळून टाका’ म्हनायला लागला.

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 02/02/2020 23:41 या दिवशी प्रकाशित केले.

अंधारछाया

पंधरा शशी लाकडं जमवायला पोर येत होती. सकाळपासून मी माझी बॅट, स्टंपा आत टाकल्या कोठीच्या खोलीत. बागेतल्या कॉटच्या फळ्या घरात टाकल्या आणि फाटकाशी होतो लक्ष ठेऊन. कुणी पोरं येत नाहीत ना पहायला! मन आत होते. मावशीपाशी. गेल्या अमावास्येपासून पंधरा दिवसात बोलत नव्हते कुणी फार. दादा रामायणाचे वाचन करीत, ऑफिसमधून आले की. आई मावशीकडून जपाच्या माळा करून घेई. कुणीच कुणाशी गप्पा मारत नव्हते. ना हसून खेळून होते. त्यात आज पौर्णिमा. दादा आईला सांगत होते, ‘आज पुन्हा जपले पाहिजे तिला म्हणून’. परवा माझ्याच्याने राहाववले गेले नाही.

भाग १५ अंधारछाया प्रकरण १४ - ‘अहो, या पोरटीला घरातून घालवा बरं! माझ्याने आता सहन नाही होत.

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 31/01/2020 19:23 या दिवशी प्रकाशित केले.

अंधारछाया

चौदा मंगला अशी बोलली ही गधडी तडा तडा. मला सुचेना काय करावं! एरव्ही एक थप्पडच ठेऊन दिली असती. असं अद्वा तद्वा बोलली असती ती तर. पण शारीरिक त्रासानं आधीच बेजार त्यात अमावास्याची रात्र! मी ही आवरलं मनाला. बराच वेळ पुटपुटत होती काही काही. मग आम्ही गाद्या टाकल्या. पडलो. तरी मनातून काही केल्या जाईना तिचे बोलणं. काकांनी पाठवली तिला अभ्यास करायला. तब्बेत सुधारायला. पण हिचं हे लचांड निस्तरता निस्तरता आलेत नाकी नऊ. बरं काकांना कळल तर म्हणतील तुला कोणी सांगितलं होते हे नसते धंदे. त्यांचा आधीच भुता-खेतांवर विश्वास कमी.

भाग १४ अंधारछाया प्रकरण १३ - ‘रक्ताची उलटी होतेय...मिरजेच्या मिशन हॉस्पिटलात न्या...कुठला कोण तो कुडबुड्या गुरूजी...‘मला तर फसवून तुम्हा त्या गुरूजीकडे नेलत!

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 30/01/2020 00:56 या दिवशी प्रकाशित केले.

अंधारछाया

तेरा मंगला बेबीला कॉफी दिली. पुन्हा झोपवली कॉटवर. अंगावरची लाली कमी झाली. पण तिच्या हाताला हात लाववेनात! हातपाय सणकून तापले होते. कपाळावर हात ठेवून पाहिला. तर कपाळ थंड होते! ताप पाहिला तर साडे अठ्ठ्याण्णव काय करावे कळेना. झोपल्या झोपल्या कॉफी पिते म्हणाली, म्हणून दिली कढत कढत. डोळा लागला असे वाटून मी गेले स्वैंपाकघरात. आज जपाच्या माळा झाल्या नाहीत हिच्या. रात्री मग जागावे लागते, एकशेआठ माळा पुऱ्या करायला! दुपारी हे आले. जेवले. तरी ही झोपलेलीच होती. मुले दुपारच्या सुट्टीत खायला आली. तेंव्हा म्हटले, ‘चार घास खाऊन घेतेस का बेबी? तर म्हणाली, ‘नको पडू दे’.

मला भेटलेले रुग्ण - २१

लेखक डॉ श्रीहास यांनी बुधवार, 29/01/2020 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
https://misalpav.com/node/45617 निदान झालं , त्यानंतर ॲलर्जीबद्दल सविस्तर समजावूनही पेशंटच्या सासऱ्यानी एकच प्रश्न ७ वेळा विचारला तेव्हा मी त्यांना रागवलो !!....कारण एकच प्रश्न ७ वेळा उत्तरून कंटाळलो होतो आणि परत ह्यांना आणू नका हे देखील म्हटलो होतो... काल त्या पेशंटच्या सासऱ्यांना साॅरी म्हटलो तर त्यांना काहीच आठवत नव्हतं पण पेशंट विसरली नव्हती आणि म्हणाली की ह्यांना शक्यतो मी आणत नव्हते व आलेच तर काहीही बोलायचं नाही हे बजावूनच सोबत आणायचे ... पण कालपर्यंत असलेलं हे ओझं मनावरून उतरून गेलं ....

भाग १३ अंधारछाया प्रकरण १२ - मग खाज सुटते सगळीकडे! कुठे कुठे, कशी कशी खाजवू? ...पाणी ओतू अंगावर, का मोरीचा ब्रश फिरवू कमरे खालून?

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 28/01/2020 15:29 या दिवशी प्रकाशित केले.

अंधारछाया

बारा मंगला संक्रांतीचे तिळगूळ, गुळाच्या पोळ्या, सगळं यथास्थित झाले. आपले दहा पंधरा दिवस बरे गेले म्हणायचे असे मनात आले. त्या दिवशी ती विहिरीकडे गेली. यानंतर दरवाजाकरून घेतला रहाटाच्या खालच्या जागी. त्याला कुलुपाची व्यवस्था केली. तेंव्हा हायसे वाटले. पण तेंव्हा पासून बराच फरक पडलाय तिच्यात. एक प्रकारचा अल्लडपणा आलाय असे वाटले. गुरूजींना भेटून सांगितले. तसे ते म्हणाले, ‘आता महत्वाची पायरी आली आहे. हीच तिची मानसिक स्थिती तिला सोडवणार आहे आपल्या जंजाळातून. पण चुकून पुन्हा निराशा वाटली तर मात्र खंड पडेल बरे व्हायला’.