विरहगान

लेखनविषय:
ढाळु नकोस आसवे, अस्वस्थ नको मज करु समजदार असताना तु, नको असा अविचार करु हि अशिच रित जिवनाची,टिचभर पोटाचि खळ्गी भरन्याचि दुर देशी जावे लागते, यास उपाय काय करु समजदार असताना तु नको असा अविचार करु आस धरुन सुखाचि उध्याच्या, गोड स्वप्नात र॑गुया मनि उ॑च ईमले उभारुन, चल स्वप्न साकारु समजदार असताना तु, नको असा अविचार करु मी येईन परतोन, ही मनात ठेव खुण, कधी ? केव्हा ?????, नको विचारु समजदार असताना तु, नको असा अविचार करु

छंदोमयीतील भावनर्तन!

'वादळवेल' या कुसुमाग्रजांच्या कविता छंदोमयी या काव्यसंग्रहात १९८२ मध्ये प्रसिद्ध झाल्या. यातील ८१ कविता नाशिकच्या परिसरातील पुण्यसलिला गोदावरीला त्यांनी अर्पण केल्या आहेत. रचनेच्या दृष्टीने या संग्रहात वैविध्यपूर्णता आली आहे, पण विषयाच्या दृष्टीने मात्र आधीच्या कुसुमाग्रजांच्या कवितेच्या वळणापेक्षा वेगळे वळण या कवितेने घेतले आहे अस मात्र दिसत नाही असे डॉ उषा देशमुख ह्यांनी म्हटले आहे. परंतु माझ्या मते येथे आत्ममग्न वृत्तीचे वेगळेपण ठळकपणे जाणवते. कसाला लागला आहे येथे अंतस्थ वीणेचा विषण्ण सूर! आकाश व माती यांच्या नात्याचा शोध हा कुसुमाग्रजांच्या काव्यप्रतिभेला लागलेला छंद.

चिमणं गोष्टी

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
चिमणं गोष्टी . चिमणे चिमणे रडू नको! आईचा पदर ओढू नको! सोपवते तुज बाईंच्या हाती, शाळेला कधी टाळू नको!!! चिमणे चिमणे झालीस मोठी, पंख पसरून उडण्या साठी.. भरारी घेताना भिऊ नको! उंच उंच जाण सोडू नको!!! चिमणे चिमणे रडू नको! सुटले घरटे समजू नको! संसारी केली तुझी पाठवणी, कमी स्वत:स लेखू नको!!! चिमणे चिमणे झालीस मोठी! टिपशील दाणे बाळा साठी! शेवटची गं ही बाळे पाठवणी, आता चिमणू राहू नको!!! चिमणे चिमणे झालीस मोठी, चिमणं गोष्टी विसरू नको! चिमणे चिमणे रडू नको, चिव-चिव करण सोडू नको!!! ============================= स्वाती फडणीस........ २००-०६-२००८

ठसे

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
ठसे . सुखावलं की हसायचं.. मनोमन फुलायचं! दुखावलं की रडायचं.. आतल्या आत कुढायचं! सुख दुःखाच्या किनारी, ठसे उमटवत जायचं.. एक ठसा सुखाचा! एक ठसा दुःखाचा! एक ठसा खोल उमटून, एक नजरेतून गेला सुटून.. एका ठशात पाणी साठून, एक लाटेत गेला वाहून.. मागे वळून पाहताना मग.. तळीच येतात दिसून!! तळ्यां काठच्या सागरी फेणफुले जाती गळून! ========================== स्वाती फडणीस........ ०५-०७-०८

दृष्टिक्षेप

लेखनविषय:
'अंजली'ला लावलेली टेप आहे गॅसवर सध्या जुना 'निर्लेप' आहे रोज कविता चोरल्या काही नव्या मी पायरट मी खास - जॉनी डेप आहे१ बाटल्या उघडून बसलो सर्व तरिही "ग्लास सुकले", त्यांस हा आक्षेप आहे! ना करीना, मल्लिका, प्रीती, बिपाशा 'ऍश' आणिक 'कॅश' - दृष्टिक्षेप आहे? पाडताना काव्य मी थांबू कशाला? दोस्तहो, पहिली न माझी खेप आहे =================================================== १.

उगीच अबोला ---

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
उगीच अबोला उगीच भांडणे अशीच गेली संध्याकाळ वाळूवरती रेघा मारीत उगीच दवडला आपुला वेळ दोनच घटकेचे हे यौवन त्यातही आपुले केवळ दो क्षण सखे भांडणे हवीत थोडी प्रेमाची पण केवळ दो क्षण सखे नदी ती पाहतेस ना ओढीने बघ वहात जाते सागराच्या कुशीत शिरूनी शांत होउनी मिसळून जाते एकरूपता अशी पाहीजे दोन जीवांची दोन मनांची भेटही आपुली अशीच व्हावी असेल जरी ती दोन क्षणांची

दर्शन -- भक्तिगीत

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
पांडुरंग पांडुरंग दर्शन दे रे कधीचे प्राण माझे नयनी उभे रे ॥धृ॥ नाण्यावरी ठसा जसा, दिवा मंदिरात तसा तूच सामावला माझ्या अंतरात वितळू दे काया, तुझ्या मुर्तीत घे रे ॥१॥ पांडुरंग पांडुरंग ... ऐकीयले जनाघरी जाते तू ओढीले नरहरी सोनाराचे दागिने करीले देई हाक येथ पहा, लेकरु तुझे रे ॥२॥ पांडुरंग पांडुरंग ... जन म्हणे विठोबाच्या नादी खुळावला दृष्टाळला जन्म सारा, संसार नासला उत्तराया तूच नाथा, प्रकटोनी ये रे ॥३॥ पांडुरंग पांडुरंग ... भक्तिगीत --कौस्तुभ

कवितेच्या झाडावर...

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कवितेच्या झाडावर बसती शब्दांचे पक्षी पानोपानी कोरित जाती सात सुरांची नक्षी गणमात्रांच्या नाजूक वेली वेढीतात तिजला यमकांची चरणात पैंजणे छंद मधुर मेखला भव्य कल्पनाविलासापुढे नीलांबर ठेंगणे काव्यफुले फुलल्यावर लाजे पुनवेचे चांदणे सुधारसाशी पैज लाविती नवरस अभिमाने विश्वात्मक हा विशाल हृदये वसतो प्रेमाने षड्ज लावुनी मोर नाचती प्रीती गती संगम कोकिळकंठामधुनी निघतो नभचुंबी पंचम अचल स्वरांच्या तीरामधुनी वाहे स्वरसरिता कवितेची लागते किनारी नाव भावगीता --अशोक गोडबोले, पनवेल.

रविकर

लेखनविषय:
सकाळी सकाळी खिडकीतून येणारी अवखळ तिरीप पापण्या चाळवते, आणि दाखवून तुझी पाठमोरी आकृती लगेच शिरते तुझ्या कुरळ्या केसांत. न गुंतता तिथेच माझ्या बोटांसारखी अलगद उतरते तुझ्या कानावरती. चकाकतो एक थेंब - शिंपल्यातला मोती. तो कवडसा जेमतेम गाल गोंजारतो आणि घाईत तुझ्या खांद्यावर उतरतो खरपूस कांतीवर माखतो वर्ख सोन्याचा बेमुर्वतपणे, होय!

चाहूल

लेखनविषय:
तुझे हसू आरशात आज आहे चांदण्याची, बरसात आज आहे | मिटले कसे कमलदल अलगद बंदिवान त्यात, भ्रमर आज आहे | घुमती आसमंती नाद पैंजणांचे सूर-लयीत हरवले, जग आज आहे | उमटती हळूवार तरंग जळावरी विश्व हे रजनीच्या, अधीन आज आहे | सळसळती पाने, रान सारे जागे सर्वांगी भिनलेला, गंध आज आहे | नयनी उमटे लाली, मन धुंदावलेले स्वप्नांची मज, चाहूल आज आहे |
Subscribe to कविता