ठसे
.
सुखावलं की हसायचं..
मनोमन फुलायचं!
दुखावलं की रडायचं..
आतल्या आत कुढायचं!
सुख दुःखाच्या किनारी,
ठसे उमटवत जायचं..
एक ठसा सुखाचा!
एक ठसा दुःखाचा!
एक ठसा खोल उमटून,
एक नजरेतून गेला सुटून..
एका ठशात पाणी साठून,
एक लाटेत गेला वाहून..
मागे वळून पाहताना मग..
तळीच येतात दिसून!!
तळ्यां काठच्या सागरी
फेणफुले जाती गळून!
==========================
स्वाती फडणीस........ ०५-०७-०८
वाचने
3843
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख..
सुख दुःखाच्या किनारी,
ठसे उमटवत जायचं..
एक ठसा सुखाचा!
एक ठसा दुःखाचा!
वा!
कविता थोडी अनवट परंतु सुरेख वाटली..
स्वातीताई, अजूनही येऊ द्या...
तात्या.
मनापासून
:) मनापासून आभार
विनंती...
In reply to मनापासून by स्वाती फडणीस
एक विनंती -
आपले सभासद नाम कृपया देवनागरीत लिहावे..
आपला,
(मराठी) तात्या.
वा
आज मेजवानी स्वातीताईंकडुन !!
>>तळ्यां काठच्या सागरी
>>फेणफुले जाती गळून!
फेणफुले ही कल्पना छान वाटली, वेगळी !
मनापासून आभार
:)
चांगला
चांगला ठसा उमटवला आहे
सुंदर
सुंदर कविता ...
मदनबाण.....
सुंदर काव्य स्वातीताई!
मला वाटतं 'मिपा'वर आपलं हे पहिलंच लिखाण! स्वागत!!
तुमची कविता वाचून माझ्या मनात आलेल्या भावना तुम्हाला इथे वाचायला मिळतील.
चतुरंग
मी कशी काय
मी कशी काय नव्हती ही कविता वाचली!! :S
खूप छान लिहिलय, आवडलं एकदम!
तळ्याकाठच्या सागरी
फेनफुले : मोठी भन्नाट कल्पना!
सुरेख शब्दचित्र आवडले.
छान ठसा उमटला.
कविता मनात ठसून गेली. छान कविता.
पुण्याचे पेशवे
मनापासून आभार
:)