चिमणं गोष्टी
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
चिमणं गोष्टी
.
चिमणे चिमणे रडू नको!
आईचा पदर ओढू नको!
सोपवते तुज बाईंच्या हाती,
शाळेला कधी टाळू नको!!!
चिमणे चिमणे झालीस मोठी,
पंख पसरून उडण्या साठी..
भरारी घेताना भिऊ नको!
उंच उंच जाण सोडू नको!!!
चिमणे चिमणे रडू नको!
सुटले घरटे समजू नको!
संसारी केली तुझी पाठवणी,
कमी स्वत:स लेखू नको!!!
चिमणे चिमणे झालीस मोठी!
टिपशील दाणे बाळा साठी!
शेवटची गं ही बाळे पाठवणी,
आता चिमणू राहू नको!!!
चिमणे चिमणे झालीस मोठी,
चिमणं गोष्टी विसरू नको!
चिमणे चिमणे रडू नको,
चिव-चिव करण सोडू नको!!!
=============================
स्वाती फडणीस........ २००-०६-२००८
वाचने
4774
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
बडबडगीत
In reply to बडबडगीत by आनंदयात्री
हेच म्हणते!
In reply to हेच म्हणते! by मनस्वी
+१
In reply to +१ by धनंजय
+१ असेच म्हणतो.
In reply to बडबडगीत by आनंदयात्री
छान!
खूप सुंदर
आभार
वा!
आभारी आहे.
व्वा..
अप्रतिम
मनापासून आभार
वा स्वाती..
आभारी आहे.