Skip to main content

कविता

गुलाम!

लेखक उमेश कोठीकर यांनी रविवार, 29/03/2009 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
तुझा जन्म दु:ख माझे अष्ट्पुत्रा! शाप माझे! माझा कळप पुरुषी येथे स्थान काय तुझे? तुझे अर्थार्जन माझे तुझे प्रजनन माझे श्वास घे तू जगण्यापुरते मात्र नियंत्रण माझे! संतती! पौरूष माझे कन्यादान पुण्य माझे! घरा येता अवकळा मग पांढरे पाय तुझे! असो पोकळ पौरूष कर पूजन तू माझे तुझ्या अस्तित्वी पहारा तुझ्या मागे नाव माझे! तुझे तनमन माझे! तुझे प्राण आत्मा माझे आला जरी कधी यम आण परत प्राण माझे! मंगळसूत्र! चिन्ह माझे! बाळग जाणिवेचे ओझे! ताट वाढ आधी मला जे उरेल ते तुझे! तू लक्ष्मी? धन माझे जे जे तुझे ते ते माझे चल!
Taxonomy upgrade extras

... कवितेचा आजार हवा

लेखक अजय जोशी यांनी शनिवार, 28/03/2009 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
सांगितले मी कुणातरी की शब्दाला आकार हवा कुण्या कवीने म्हटले मजला, 'कुणाकुणाला मार हवा?' 'मीही आहे तयार' म्हटले, 'पण थोडेसे थांबा ना...' विष काढण्याआधी जरासा नागाचा फुत्कार हवा तिने पहावे, तिने म्हणावे - किती काम सांगशी तिला ! तीच अता कंटाळुन म्हणते, 'बसण्यासाठी पार हवा..' रस्त्यावर टाळत असते अन घरी कधी भेटत नाही स्वप्नी येउन हळूच म्हणते - तुजसारखा यार हवा.. चोरुन घेती शब्द कुणाचे अन खाऊनी जाती भाव सलाम यांना करण्यासाठी निश्चित वेडा ठार हवा औषध पिऊन तेच तेच कंटाळुन गेले कितीतरी मदिरा नसते उपाय यावर - तुजला बाराक्षार हवा दुर्मुखला चेहरा घेऊनि प्रेमाचे गुणगान क
Taxonomy upgrade extras

आता नको

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शनिवार, 28/03/2009 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
भावनांचे पसारे खुप झाले हे असे वेडावणे आता नको ... ! वळणावर त्या रेंगाळलेल्या आठवांची साथ आता नको ... ! हृदयात तू कोंडलेल्या सखे सुखांचा गुदमर आता नको ... ! चल सखे स्वप्न स्वप्न खेळु वास्तवाचा धाक आता नको ... ! हरवले स्वर ते सारे आता हुरहुर मारव्याची आता नको ... ! त्या तिथे पलिकडे .., ते चित्र फसव्या सुखाचे आता नको ... ! चल सखे पैलतीरी जावू मोह ऐलतीराचा आता नको ... ! विशाल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या स्क्रीनसेव्हरचे प्रकाशन

लेखक सागर यांनी शुक्रवार, 27/03/2009 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, आज गुढीपाडवा.... चैत्र शुद्ध प्रतिपदा , शके १९३१ (२७ मार्च २००९) छत्रपती शिवराय म्हणजे अवघ्या महाराष्ट्दैवत आराध्य दैवत. तर अशा या आराध्याच्या चरणी पुण्यातील संगणक सॉफ्टवेअर कंपनी संकेतस्थळ.कॉम च्या सौजन्याने छत्रपतींच्या जीवनावर आधारीत अशा अनेक उपक्रमांची सुरुवात करण्याकरिता शिवमुद्रा.कॉम (http://www.shivamudra.com/) हे संकेतस्थळ आकारास आले आहे. हे संकेतस्थळ छत्रपतींच्या पुण्यतिथीच्या दिवशी सुरु करण्याची योजना आहे. या संकेतस्थळाने सुरु होण्यापूर्वीच शिवाजी महाराजांवर मराठीतील पहिलाच स्क्रीन-सेव्हर प्रकाशित केला आहे.

दादा म्हनले ... !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 27/03/2009 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
दादा म्हनले आंदोलन करा आमी बशी जाळ्ळ्या... दादा म्हनले चळवळ करा आमी दुकानं फोळ्ळी... दादा म्हनले सत्याग्रेव करा आमी फॅक्टरी बंद पाळ्ळी... दादा म्हनले त्यो लै बोलतुया तेची जीभ तोळ्ळी ... दादा म्हनले आमी दिल्लीला चाल्लो आता वो.............? विशाल

गुढी उभारावी अशी

लेखक राजा यांनी शुक्रवार, 27/03/2009 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
गुढी उभारावी अशी
एक उभी केली काठी त्य़ाला बांधली गोड गाठी निंबाचा उघळा वर तांब्याची लोटी दर वर्षी आपण अशी पारंपारीक गुढी उभारतो पण थोर पुरुषांनी अशा अमर गुढ्या उभारल्या भक्तीची गुढी तुकारामांनी ज्ञानाची गुढी ज्ञानेश्वरांनी गिता संदेशाची गुढी कृष्णांनी शांतीची गुढी बुध्दांनी महाराष्ट्राची गुढी शिवरायांनी समतेची गुढी ज्योतिबांनी सत्य अहिंसेची गुढी गांधीनी देश भक्तीची गुढी सावरकर, भगतसिंगांनी स्वच्छतेची गुढी गाडगेबाबांनी शिक्षणाची गुढी कर्मवीर अण्णांनी मला वाटते मोठे काम करणे म्हणजेच गुढी उभारणे होय आपण सुध्द
Taxonomy upgrade extras

तुझं घर

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 26/03/2009 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या शब्दांची पाखरं उडतील वार्‍यावर दाही दिशांत फिरून शोधतील तुझं घर तुझ्या अंगणी विसावा घेतील ती क्षणभर माझ्यासाठी आणतील तुझ्या गाण्यातले सूर माझ्या आशेचा पाऊस बरसेल झरझर ओल्या मातीच्या गंधाने धुंदावेल तुझं घर मोती थेंबांचे सांडेल तुझ्यासाठी फुलांवर माझ्यासाठी आणील तो तुझा प्राजक्तबहर माझ्या स्वप्नांचे काजवे जागतील रात्रभर उजळेल तुझं घर, तुला दिसेल समोर उभा अंगणी मोहक चांदण्यांचा गुल्मोहर माझ्यासाठी झळाळेल तुझ्या हास्याचे झुंबर माझ्या कल्पनेचा वारा माझा धरून पदर मला संगती नेईल दाखवाया तुझं घर मंद शीळ घालून तो उघडील तुझं दार माझ्यासाठी आणील तो ............तुलाच माझ्यासमोर!
Taxonomy upgrade extras

निरोप

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 26/03/2009 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
कसा आज मोगरीने डाव साधला सुन्न ओझे आठवांचे घाव घातला.. सुटे भान दिशाहिन आज जाहलो सापडेना मार्ग माझा चांद मातला.. हरवले माझे पण तुला पाहता आसवांनी दोर माझा आज कापला.. संपले ते स्वप्न सारे सत्य जाणता भुतकाळ रम्य सारा आज बाटला.. हंसलीस खिन्न सखे ओठ दाबुनी आसवांना लपविता भाव दाटला.. एकवार हास पुन्हा ओठ दुमडूनी अजुनही त्यात माझा श्वास गुंतला..! विशाल

आता नाही

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 25/03/2009 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
आसवांचा जुना आड आता नाही वेदनांचे तसे लाड आता नाही.. मांडला मी असा स्वप्न बाजार पुन्हा वास्तवाच्या भुता 'झाड' आता नाही.. वेदनांची खरी जाहली मज सोबत संकटांना नव्या "हाssssड", आता नाही.. कल्पनांचा मना लाभला आधार नि... जाणिवांची तशी चाड आता नाही.. झेलले घाव सारे सदा सुमनांचे अन नव्याने भ्रमर धाड ....., आता नाही विशाल

शाळा

लेखक जागु यांनी बुधवार, 25/03/2009 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
आठवते मज शाळा शाळेतील फळा पृथ्वीचा तो गोळा अन बेकंबे चा पाढा ! भिंतीवरचे सुविचार घडवित होते आचार मास्तरांची छडी घाली शिस्तीची घडी पुस्तकातील धडा भरे ज्ञानाचा घडा कवितेचे पठण लावे आयुष्याला वळण शाळेची मधली सुट्टी डब्यासंगे जमे गट्टी सर्वत्र आरडा ओरडा शिक्षेसाठी उठा बशा पिटीचा एक तास मैदानाची पाहे वाट कसरत अन कवायती श्रमाचीही कळे मती जन गण मन ची सुरूवात वंदे मातरमने शेवट संस्कारांची ही देवाण जीवनातील ही ठेवण.
Taxonomy upgrade extras