आसवांचा जुना आड आता नाही
वेदनांचे तसे लाड आता नाही..
मांडला मी असा स्वप्न बाजार पुन्हा
वास्तवाच्या भुता 'झाड' आता नाही..
वेदनांची खरी जाहली मज सोबत
संकटांना नव्या "हाssssड", आता नाही..
कल्पनांचा मना लाभला आधार नि...
जाणिवांची तशी चाड आता नाही..
झेलले घाव सारे सदा सुमनांचे
अन नव्याने भ्रमर धाड ....., आता नाही
विशाल
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1191
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुचना आणि सुधारणांचे स्वागत.
छान.