मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निरोप

विशाल कुलकर्णी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
कसा आज मोगरीने डाव साधला सुन्न ओझे आठवांचे घाव घातला.. सुटे भान दिशाहिन आज जाहलो सापडेना मार्ग माझा चांद मातला.. हरवले माझे पण तुला पाहता आसवांनी दोर माझा आज कापला.. संपले ते स्वप्न सारे सत्य जाणता भुतकाळ रम्य सारा आज बाटला.. हंसलीस खिन्न सखे ओठ दाबुनी आसवांना लपविता भाव दाटला.. एकवार हास पुन्हा ओठ दुमडूनी अजुनही त्यात माझा श्वास गुंतला..! विशाल

वाचने 1914 वाचनखूण प्रतिक्रिया 8

शितल 26/03/2009 - 18:03
एकवार हास पुन्हा ओठ दुमडूनी अजुनही त्यात माझा श्वास गुंतला..! मस्तच :)

क्रान्ति 26/03/2009 - 19:58
सुरेख कविता! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

उमेश कोठीकर 29/03/2009 - 16:05
मस्त विशाल्.सुंदर.

प्राजु 30/03/2009 - 02:59
क्या बात है विशाल... सुरेख!!!! शेवट अतिशय नाजूकपणे साधला आहेस.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अनिल हटेला 30/03/2009 - 09:11
"एकवार हास पुन्हा ओठ दुमडूनी अजुनही त्यात माझा श्वास गुंतला..!" क्या बात है !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 30/03/2009 - 09:27
एकवार हास पुन्हा ओठ दुमडूनी अजुनही त्यात माझा श्वास गुंतला..! ओहो, क्या बात है ! विशाल येऊ दे रे अजून अशाच सुंदर कविता !

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निखिल देशपांडे 30/03/2009 - 09:46
असेच म्हणतो.... शेवट मस्तच साधलास रे....