आमचा रंग देऊन पाहा
**********************************
**********************************
ढगांना सांगीन जरासे जमीनीवर येऊन पाहा
वीजा पोरखेळ होई इथे श्वांस तर घेऊन पाहा
वळीवाचे बेत कसले,कसला वादळाचा पुकारा
इथल्या बंदूका नी आमच्या शांतता झेलून पाहा
दुरुन दिसते साजरे असेच सर्वदूर म्हणती
तुम्ही मात्र धरीत्रीला मनसोक्त बिलगून पाहा
गमते उदास जेंव्हा तुमचा मोठाच आधार होतो
आमच्या काळजांतही कधी जरासे ढुंकून पाहा
आकाशी म्हणे सगळे आलबेल आहे,दुरुस्त आहे
इथे येऊन गड्यांनो जरासा तालही सोडून पाहा
आमचे दाह आम्हीच जाणतो तरीही त्रुप्त जगतो
आत गोठल्या पावसाला आमचा रंग देऊन पाहा
******************************
******************************
लेखनविषय:
याद्या
2973
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
छान
एक सुंदर
सूंदर...
जोरदार
झ का स सू
झ का स सू