Skip to main content

अहो पाहुणे हळुहळू होवू द्या, घाई करू नका, असं लाजू नका

अहो पाहुणे हळुहळू होवू द्या, घाई करू नका, असं लाजू नका

Published on 25/11/2009 - 04:31 प्रकाशित मुखपृष्ठ
अहो पाहुणे हळुहळू होवू द्या अहो पाहुणे हळुहळू होवू द्या घाई करू नका, असं लाजू नका || धृ || लई दिसानं आलेत आज जेवण केलयं पुरणपोळीचा थाट स्वस्थ होवूद्या काय लागलं तर मागून घ्या जेवण निवांत होवूद्या ||१|| घाई करू नका, आसं लाजू नका || धृ || पुढ्यात ठेवलीय वाटी आन ताट त्याखाली दिलाय चंदनी पाट वरणभात कालवूनी करा सुरूवात आजच्या दिवस रहा जा हो उद्या ||२|| घाई करू नका, आसं लाजू नका || धृ || कुरडई पापड भजी अन पुरी ओरपा की जरा सार, गुळवणी तुप लावूनी घ्या एकदा पुरणपोळी पोटभर जेवा हात मारा आडवा |||३|| घाई करू नका, आसं लाजू नका || धृ || भरीत झालय झकास आज तुमच्या वहिनीन केलय खास ठेचा मिरचीचा लावा तोंडी ठसका जाईल तर लावा तांब्या ओठी तोंडी लावायला हाताशी आहे कांदा ||४|| घाई करू नका, आसं लाजू नका || धृ || सोयरे धायरे आपन जिवाभावाचे काय वेगळे नाही मानायचे असेच वरचेवर भेट द्यायला सच्याच्या घरी जरूर यायचे बरका ||५|| परत जायची घाई करू नका, आसं लाजू नका || धृ || २५/११/२००९ - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

याद्या 4914
प्रतिक्रिया 8

असली पंगत मांडलीय व्हय..आमाला वाटलं हॅ हॅ हॅ !! खास विडंबकांना खाद्य म्हणून तर नाही हे काव्य रचले ? ;-)

सुरूवात खतरा. कल्पनाशक्तीला चांगला वाव आहे. चालू ठेवा. पुढचा एपिसोड कधी येतोय? उमराणी सरकार
न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे

श्री भेद, खालील ओळी सर्वांगाला भिडल्या . ठसका जाईल तर लावा तांब्या ओठी तोंडी लावायला हाताशी आहे कांदा चड्डीतछेद

"कारभारी दमान".......या लावणी ची आठवण झाली. असो स्नेह (प्रिती) भोजन आवडलं बतावणि बाज जयपाल *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

=P~ डोळ्यासमोर आलं.