मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फ्लोरिडा वॉल्ट डिस्ने पार्क

मीली · · कलादालन
यंदा मार्च मध्ये फ्लोरिडा ला जायचा योग आला...म्हणजे आणावा लागला...त्याचे असे झाले कि मार्च मध्ये अमेरिकेमध्ये मुलांना स्प्रिंग ब्रेक असतो. तसे बरेच ब्रेक असतात.तेव्हडेच मुलांना हुंदडायला बरे! म्हटले यावेळी आपण का मागे राहावे! नवर्यानेही हो, नाही म्हणता म्हणता होकार दिला.मग आम्ही मी,आणि माझ्या मुलाने त्याला विचार करायला वेळच नाही दिला. जास्त विचार करून ताण येतो ना! ते जावू द्या...सर्वप्रथम आम्ही डिस्ने पार्क बघायचे ठरवले.तसे बरेच आहेत पण आम्ही ५ दिवस फ्लोरिडा मध्ये असल्याने मुख्य पार्क करायचे ठरवले.सगळ्यात आधी एपीकोट पार्क ला गेलो.एखाद्या स्वप्ननगरी मध्ये गेल्याचा भास झाला.तसे खूप काही लिहिण्यापेक्षा म्हटले फोटो ने जास्त मजा येईल म्हणून मिपाकरांसाठी खास. नंतर विकीपेडिया मध्ये वॉल्ट डिस्ने बद्दल माहिती वाचली त्यात होते कि लोकांना आनंदी करण्यासाठी जी स्वप्न- नागरी त्याने उभारली ती तो पाहू शकला नाही . खरेच आबाल वृद्ध सगळ्यांचा विचार करून त्याने ही पार्क्स उभारली आहेत.नंतर त्याचा भावू रॉय डिस्ने याने हे स्वप्न पूर्ण केले आणि त्याला "वॉल्ट डिस्ने वर्ल्ड" नाव दिले. अशा सुंदर फुलांच्या ताटव्याने येणार्याचे स्वागत होते. हे छोटे गाव पाहून पुण्याच्या संभाजी उद्यानातील देखाव्याची आठवण झाली. धावणारी छोटी रेल्वे पाहायला मज्जा येते खरी. हिरवीगार हिमगौरी आणि सात बुटके! देशांची वैशिष्ठे लक्षात घेवून हॉटेल्स साकारली आहेत. एपिकोत पार्क बघायला आम्ही ११ वाजता सकाळी सुरुवात केली .खूप चालण्याची तयारी असावी लागते.नाहीतर रात्री ११ वाजेपर्यंत सर्व पाहून होत नाही. खरेखुरे नाही पण मंगळावर जायचा अनुभव घेता आला. यात बसुन..! एक तास रांगेत उभे राहावे लागले तेव्हा नंबर लागला. एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना खूप छान बागेतून फिरायला मजा येते. इथे गेल्यावर आपण छोटे होवून जातो!" Honey I shrunk the kids " मुलांसारखे. जपान मधील pagoda रात्री निमो वर्ल्ड पाहिल्यावर मात्र पाय खूप दुखत आहेत असे जाणवायला लागले. मग परत निघालो.मुलगा मात्र उत्साहात म्हणत होता उद्या Magic किंग्डम ला जायचे आहे ना!
लेखनविषय:

वाचने 5161 वाचनखूण प्रतिक्रिया 14

रेवती 20/04/2010 - 06:35
फोटो छान आलेत! इथेच पाहून घेते. आम्ही या वर्षी तरी जाऊ असे वाटत नाही. रेवती

llपुण्याचे पेशवेll 20/04/2010 - 07:06
फ्लोरीडा मस्त आहे. मला तर कोकणासारखं वाटलं होतं. जेव्हा ऑरलँडोला गेलो तेव्हा कळालं की तिथे खूप अ‍ॅम्युझमेंट पार्कस आहेत. पुढच्या वेळेला परत येऊ असे म्हणून त्या वेळेला गेलो नव्हतो सगळीकडे. :) फोटो आणि लेख छान. पुण्याचे पेशवे Phoenix

अमोल केळकर 20/04/2010 - 12:28
अरे वा !! मस्त आमची फुलराणी ( झुक झुक गाडी ) पण आहे की !! अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

टारझन 20/04/2010 - 13:13
व्वा !!! फोटु केवळ अप्रतिम !! खुपच धम्माल केलीये वाट्टं :) - मजेश डिस्नेपार्कवी

दिपाली पाटिल 20/04/2010 - 13:27
डिस्ने म्हणजे मला तर जादुई दुनियाच वाटते...अगदी जे काल-पर्वापर्यंत टिव्हीत दिसणारे सगळेच इकडे गुण्यागोविंदाने नांदतात...आपणही अगदी लहान होउन जातो...फक्त लाइनीत उभे राहणे नकोसे वाटते... दिपाली :)

संदीप चित्रे 22/04/2010 - 01:47
तिथे आता हॅरी पॉटरचीही थीम पार्क / राईड सुरू झाली आहे ना? ती पाहिली का? --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

In reply to by संदीप चित्रे

निस्का 22/04/2010 - 04:52
मला वाटतं ती Universal Studios (Islands of Adventure) ला सुरु झाली आहे. मागच्या वेळी गेले असताना तिथे construction चालू होतं. आता पूर्ण झाल असेल. नि...

प्राजु 22/04/2010 - 07:35
आम्ही गेल्या वर्षी लॉस एंजिलिस ला डिस्ने लॅंड पाहिले आहे.. तेव्हाही खूप मजा आली होती. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

मदनबाण 22/04/2010 - 07:36
छान आहेत फोटो... :) मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama

मीली 22/04/2010 - 18:00
हॅरी पॉटरच्या पार्क ला काही जाणे झाले नाही.फ्लोरिडा ला कमी दिवस असल्याने बरेच पहिले पण बरेच राहूनही गेले बघायचे. हा ..पण जे पहिले त्याचा आनंद खूप आहे. मीली Smile; it's a curve that makes things straight.

अरुंधती 22/04/2010 - 21:47
मस्त फोटू आहेत! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/