Skip to main content

चुकीचे हिशेब

चुकीचे हिशेब

Published on शुक्रवार, 11/11/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
मी मांडले हिशेब नेहमी ते सारे चुकीचे होते ढाळले अश्रु ज्यांसमोर त्यांना हे नेहमीचे होते सोसले घाव सारे ते तर माझ्या ओळखीचे होते ना कळले सागर जे तळ तयांचे खोलीचे होते आर्त स्वर माझे हे कधीतरी तुझ्या अंगणीचे होते दुख कधी ना कळले कुणाला कारण सारे हे माझ्या मनीचे होते यशवंत
लेखनविषय:

याद्या 1615
प्रतिक्रिया 10

सुझे साहेब तुमच्याच प्रतिसादची वाट पाहात होतो..

In reply to by यश पालकर

सुझे साहेब तुमच्याच प्रतिसादची वाट पाहात होतो ठिक आहे, मग मी प्रतिसाद देत नाही.

In reply to by यश पालकर

छे:....छे:.... राग अजिबात नाही. सहज गम्मत केली. पण मला वाटतं सुझे साहेब तुमच्याच प्रतिसादची वाट पाहात होतो.. हे 'सुझे'साहेबांना व्यनितुन अथवा खरडवहित कळवायला हवे होते. आपल्याच काव्यधाग्यावर एखाद्याच्या प्रतिसादाला 'खास' महत्त्व देताना इतरांच्या प्रतिसादाचे मुल्य आपण (नकळत) कमी करीत आहोत हे आपल्या लक्षात यावे अशी इच्छा होती. 'सुझे'साहेब गैरसमज नसावा. कविता छान आहे. अशाच अजून येऊ द्यात.

In reply to by प्रभाकर पेठकर

पुढील वेळेस नक्की काळजी घेईन.. आणी प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद!!!! :)

आवडली कविता . आशयपूर्ण आहे.