Skip to main content

चांदण्यात फिरतांना.....

चांदण्यात फिरतांना.....

Published on गुरुवार, 10/11/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
चांदण्यात फिरतांना........ १)अक्षरचांदण ती : इतक्या दूर आलास माझ्या अक्षरवेलीला धरुन, बघ माझ्या नभातलं लखलखणारं अक्षरचांदण. तो: या चांदण्यात न्हाहातांना डोळाभरुन पाहायच होत तुला. तू अनेक अक्षरांच टिपूर टिपलं असेल आजवर मी माझा टिपूर साठवतोय मनात-डोळ्यात-सार्‍या देहात. २) गुलाबी छटा ती: बघ या चांदण्या हळुहळु संधिप्रकाशात विरु लागल्या जणु काही त्याने चांदण्यांना गुलाबी मिठीत कोंडुन ठेवलय त्याची छटा सार्‍या आसमंतात विखुरली आहे.. तो: संधिप्रकाश चोरपावलांनी तुझा गोरा रंग चोरुन नेतोय आणि तू चांदण्यात भिजुन अंग निथळत बसलीस क्षितीजाच्या किनार्‍यावर.
लेखनविषय:

याद्या 993
प्रतिक्रिया 3

क्या बात!! आवडल्या २नी रचना

मस्त !!! आवडलि कविता !!