Skip to main content

पाणी अन् माती

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 10/11/2011 या दिवशी प्रकाशित केले.
(१) कसं असतं ना माती आणि पाणी यांच नातंच निराळ पाण्यातल्या मातीचे प्रमाण जास्त असेल तर पाणी दिसत नाही अन् मातीतल्या पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर माती दिसत नाही . . माणसाचही असंच असतं काहीसं कधी मातीच्या देहात डोळ्यातले पाणी दाटते तर कधी डोळ्यातल्या पाण्यात मातीचा देह विरघळतो अन् मग . . कधी माती, कधी पाणी कधी पाणी, कधी माती (२) मातीत पाणी नसेल तर बीजे रुजत नसतात मातीत पाण्याशिवाय फक्त निवडुंग फुलतात . अन् पाण्यात माती नसेल तर फक्त मनीप्लांट रुजतो . . . कधीही फुले न येणारा (३) कुठल्याही पाण्यात कुठलीही माती मिसळली तर मृदगंध दरवळत नसतो . जमिनीला तडा देणा-या अनेक रणरणत्या दिवसांमधून तापलेल्या मातीवर जेव्हा . अनेक डोंगर पार करून जडशीळ दु:खांचे बाष्प वाहून आणलेले कृष्णमेघ रिते होतात तेव्हाच . मृदगंधाचे उंची अत्तर दरवळून आल्हाद पसरतो |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१०/११/२०११)
काव्यरस

वाचने 2186
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

मस्त २ नं. जास्त आवडली आणि भावली.. ग्रेट. निवडुंग .. मनिप्लाँट मस्त सांगितले एकदम... पुन्हा पुन्हा वाचली ही कविता, ३ मधले जडशीळ दु;खाचेच बाष्प का ? .. आनंदाचे ... आर्त हाकेला ओ देणारे... प्रेमाचे.. वाट बघण्यातले अधीरतेचे बाष्प का नाही असे अनेक प्रश्न उभे राहिले .. १ मधले दूसरे कडवे अप्रतिम .. खुप छान ... परंतु पहिले कडवे लगेच मानले जात नाहि.. मातीत पाणी जास्त असले तरी मातीचे अस्तित्व पाण्याला ही गढुळ बनवते... आणि पाण्यात माती जास्त असली तरी पाणी आतुन ओलावा जिवंत ठेवते मातीतला ..

In reply to by गणेशा

३ मधले जडशीळ दु;खाचेच बाष्प का ? .. आनंदाचे ... आर्त हाकेला ओ देणारे... प्रेमाचे.. वाट बघण्यातले अधीरतेचे बाष्प का नाही असे अनेक प्रश्न उभे राहिले .. १ मधले दूसरे कडवे अप्रतिम .. खुप छान ... परंतु पहिले कडवे लगेच मानले जात नाहि.. मातीत पाणी जास्त असले तरी मातीचे अस्तित्व पाण्याला ही गढुळ बनवते... आणि पाण्यात माती जास्त असली तरी पाणी आतुन ओलावा जिवंत ठेवते मातीतला ..
तुम्ही म्हणताय ते पटतयं. पण ज्या क्षणाला तुमच्या समोर असे काही येते, तेव्हा तुमच्या मनातले भाव कसे आहेत त्यावर सगळं अवलंबून आहे. मी ते बघतांना कदाचीत उदास होतो काही कारणाने, म्हणून मला ते तसे दिसले. थोडक्यात जसे सुचले तसे उतरवले. :)

कविता आवडली. 'निवडुंग' आणि 'मनीप्लँट' खास .

दुसरी आवडली. त्यात माती आणि पाण्याचा संबंध चांगला खुलून आला आहे. तिसरीही छान आहे पण "कुठल्याही मातीत कुठलेही पाणी" असे म्हणण्याचा संदर्भ कळला नाही. माती आणि पाणी हे काही रुपक म्हणून वापरले आहे काय? असल्यास कसले ते कळले नाही.