आधीन
लेखनविषय:
काव्यरस
ओठात माणसांच्या पोटातले उखाणे
मेघात चांदण्यांचे संकेत आड गाणे
आधीन ओघळांच्या वाहे उदंड पाणी
एकांत सागराची पागोळते विराणी
थेंबास थेंब भेटे वाटेत पथिक गोटे
ओसांड अंतराचे पथ सोडुनी समेटे
कधि कुंपणे तळ्याची प्रतिबिंब अंबराचे
साकेत भ्रामकांचे अंदाज थेट खोटे
सारे खरे परंतू हृदयी उलाल कोणी
मातीत सांडलेले उगवे फिरून अवनी
संजीवनी जणू ही गत सुप्त भावनांना
आशा अजून वेडी संदेश हा पळांना
........................अज्ञात
वाचने
2534
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
सुंदर
In reply to सुंदर by मिसळलेला काव्यप्रेमी
मी एकदा तुमची डिक्शनरी चोरणार
In reply to मी एकदा तुमची डिक्शनरी चोरणार by अज्ञातकुल
डिक्शनरी
In reply to सुंदर by मिसळलेला काव्यप्रेमी
+१
सारे खरे परंतू हृदयी उलाल
mast mast.. khoopach chhan.. agreeing with MiKa
सारे खरे परंतू हृदयी उलाल
संजीवनी जणू ही गत सुप्त
क्या बात है! अप्रतिम !
क्या बात है. आवडली कविता
सर्वांचे मनापासून आभार
क्या बात है! अप्रतिम !
खुपच छान कविता आहे. आवडली
छान