होती एक नजर.......
लेखनविषय:
होती एक नजर.......
मला पाहणारी
लाख झिडकारले तरी
अंगचटीस येणारी.....
होती एक नजर.......
मला शोधणारी
कधी कॉलेज, कधी बस्-स्टॉप
तर कधी खिडकीवर रेंगाळणारी
होती एक नजर.......
मला आसुसलेली
प्रत्येक नकाराने माझ्या
सुडाने ठसठसलेली...........
होती एक नजर.......
मला दाहणारी
पेटवून देहास माझ्या
खुनशी खदखदणारी..........
होती हर एक नजर....
माझ्यावरच खिळलेली
जेव्हा फोडला मी टाहो
तेव्हा हलकेच चुकचुकलेली.....
होती एक नजर.......
धुराने धुसरलेली
दिसत होते त्यात बाबा
अन आई लाघवी हसणारी.....
उरली एक नजर.........
जगण्यास धडपडणारी
प्रत्येक विझत्या निखर्यासवे
एक बाहुली कायमची.......निजलेली
वाचने
3259
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
आईइंग..........
एक एकटा एकटाच आत्तापर्यंत
कविता अतिशय आवडली. आशय खूपच
सगळ्यांचे आभार
शशकच्या गर्दीत हरवून गेली
In reply to शशकच्या गर्दीत हरवून गेली by जडभरत
बरोबर ओळखलत भरत
थोडसं ह्या कविते विषयी..............
In reply to थोडसं ह्या कविते विषयी.............. by एक एकटा एकटाच
त्या गुन्हेगारांचं पुढं काय
In reply to त्या गुन्हेगारांचं पुढं काय by जडभरत
त्या हरेश पटेल ने दुसऱ्या
In reply to त्या हरेश पटेल ने दुसऱ्या by एक एकटा एकटाच
मग तर बरं झालं!!!
कविता प्रभावी आणि प्रतिसादात
अजून पोर्न ची बाजू घ्या .
In reply to अजून पोर्न ची बाजू घ्या . by तुडतुडी
तुडतुडी
कविता अस्वस्थ करणारी आहे
In reply to कविता अस्वस्थ करणारी आहे by एस
+111
कविता आवडली,
एक रूपक म्हणून कविता आवडली.
In reply to एक रूपक म्हणून कविता आवडली. by सौन्दर्य
अगदी बरोबर..........
प्रतिसाद आणि प्रोत्साहनासाठी
छान...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nancy Ajram - Ah We Noss / نانسى عجرم - آه ونص