Skip to main content

अनाहत

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शुक्रवार, 21/08/2015 07:13 या दिवशी प्रकाशित केले.
साकळली पावसाळी रात्र गाते गहिऱ्या व्रणाचे गूढ ऐकूनी तो अनाहत नाद गायी गोठ्यातल्या दिग्मूढ़ पाचोळा नीजलेला शांत येई दचकून त्याला जाग शीरांच्या त्या शिळ्या स्वप्नांस मंत्रोच्चारात लावी आग घुबडांचे थांबले घुत्कार छपराला टांगले वाघूळ माळावरच्या कुबट कोषात निर्वाताची व्यथा गाभूळ घाबरला वळचणीचा जीव सैरावैरा पळे फडताळ केविलवाणे दडे ते बीळ काळोखाला चरे विक्राळ पागोळ्यांच्या भिडे हृदयास भिजलेला आर्त अंतर्नाद कातर सूरात देती हाक देणारा ना कुणी प्रतिसाद गहिवरलेल्या घराची भिंत घेते पिऊन ते नि:श्वास डोळे थिजले कुणाची आस पावा वाजेल हा विश्वास
लेखनविषय:

वाचने 3004
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

आहाहा...! अब हम क्या बोले स्वामिज्जि? बस ऐसे ही छोड देते है.. बगैर शब्दों के .. खाली कागज भी कभी कभी बोहोत कुछ बोल जाए..वैसे।

अस्वस्थ करून गेली रचना.

किती छान लिहिलंय!

केवढी हुकूमत आहे स्वामीजी तुमची शब्दांवर... एक नंबर. तुमच्या लिखाणाचे हे वैशिष्ट्य जाम आवडते बुवा आपल्याला. अजुन टाका...

नमस्कार संकेजी, हे एखाद्या नाग / अजगर याचे वर्णन आहे का? शेवटी तो कुठल्यातरी पक्षाचा किंवा प्राण्याचा घास घेतो. बरोबर का?

In reply to by मांत्रिक

नाही हो. ही एक चिरवेदना आहे. आता कल्पना करा की, कान्हा मथुरेला गेलाय. राधा शोकविव्हळ आहे. तिच्या वेदनेची तीव्रता कशी वर्णन करावी? ती चराचरात व्यापली आहे. ती वेदना तिथल्या सजीव निर्जीव सगळ्यांवर परिणाम करुन गेली आहे. प्रतिक्षेत थिजले आहेत पण अखेरीस आशावाद आहे. पण चिरवेदनेपासून मुक्ती हीसुद्धा शाश्वत असावी लागते, नाही का? आता परत कविता वाचा, कदाचित नव्याने प्रतिमा कळतील. प्रत्येक प्रतिमेमागे निश्चित अशी एक कल्पना आहे ती कदाचित कळेल. तुम्हाला जो अजगर जाणवला तो पोस्ट-कृष्ण ब्रजभुमीत व्यापून राहिलेल्या वेदनेचा आहे म्हणा हवे तर... :)

आवडली कविता. -दिलीप बिरुटे