Skip to main content

जीवनातील चंद्रकोर

लेखक सोहम कामत यांनी रविवार, 30/10/2016 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येकाच्या जीवनात असते, एक चंद्राची कोर, हृदयाच्या कोपर्यात दडते ती, जणु निरागस पोर । कधी नटखट कधी चंचल, कधी लाजाळूचे पान, तिच्या गालाच्या खळीपुढे, हरपते मनाचे भान । हृदय चोरून नेते ती, जाणते मनाचे बोल, ती आहे माझ्यासाठी, चांदणे अनमोल । भारावून टाकते मनास, तिची नखरेल अदा, तिच्या मनमोहक रूपापुढे झाला, माझा जीव फिदा । स्वप्नातील ती परी आता, बनली आहे मनाची आस, सतत तिचेच विचार असतात, सतत तिचाच लागे ध्यास । विचारांच्या या सानुल्या विश्वात ती, जाते मोरपीस फिरवून, तिच्या त्या कटारी नैनडोहात, माझे डोळे जातात हरवून । तिचा मंजुळ आवाज माझ्या, हृदयाला जाऊन छेडतो, तिचा लाजाळू चेहरा मला, आणखी प्रेमात पाडतो । तिच्या मंदहास्यापुढे चुकतो, माझ्या हृदयाचा ठोका, तिचे ते गोजिरे रूप जणु, नभतारा अनोखा । हृदयातील ती अपसरा नेहमी, माझ्या स्वप्नात येते, हसरी लाजरी चंद्राची कोर ती, मनास भुलवूनी जाते । अशी ही चंद्राची कोर, प्रत्येकाच्या जीवनात असते, कधी हृदयाच्या कोपर्यात दडते, तर कधी स्वप्नात येउन अलगद हसते ।

वाचने 663
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया