मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कथा

शरदाचं चांदणं.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गांवाला आमच्या शेजारीच शरदचं घर होतं आणि त्याच्या शेजारी त्याच्या काकांचं घर होतं.आम्ही सर्व मुलं त्याच्या काकांच्या घरी खेळायला जायचो.हे मला पक्कं आठवतं. शरदची राहणी अगदी साधी पण विचारसरणी मात्र उच्च होती.त्यावेळी त्याच्या सहवासात असतानाच त्याच्या ह्या वृत्तीचा मला पडताळा आला होता.शरद मुळातच गरीब स्वभावाचा होता.दुसर्‍याच्या भावना आपल्या कडून दुखवल्या जाऊं नयेत म्हणून तो पराकाष्टा करायचा हे माझ्या नजरेतून चूकलं नव्हतं. आता मला भेटला तेव्हा मला आमच्या बालपणाची आठवण प्रकर्शाने जाणवली. मी शरदला म्हणालो, "मी माझ्या लहानपणी तुझ्याकडून खूप शिकत होतो.

तुमच्या मनांत आहे ते माझ्या हातात(ईडंबनात) नाही.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझ्या त्या (अजून आणखी एक ईडंबन केलं आहे.) मधल्या "पुष्टावलेल्या ऊसाच्या" विडंबनाचा जन्म असा झाला.

सायकलवर नीळकंठेश्वरला...एकटाच...

विमुक्त ·
लेखनविषय:
मला सायकल चालवायला जाम आवडतं. सायकल असली, की उगीचच पैसे आणि इंधन न जाळता आपल्या सोई नुसार हवं तीथं वेळेत पोचता येतं. सायकलवर एखादा घाट चढताना जाम दमून घाटमाथ्यावर पोचण्याचा आनंद वेगळाच असतो. मग हँडल वरचे हात सोडून घाट उतरण्याचा रोमांच तर भारीच (हा प्रकार करताना लहानपणी एकदा जाम वाईट आपटलो होतो... त्याच्या खुणा अजूनपण कपाळावर आणि गुढघ्यावर आहेत...). तर गेल्या पावसात एका weekend ला आराम करायचा बेत होता. मग शनीवार काहीतरी वाचण्यात आणि टेकडीवर भटकण्यात घालवला. उद्या कुठंतरी भटकायला जायला पाहीजे असं शनीवारी रात्री वाटायला लागलं.

"बट-शेवंतीची फुलझाडं."

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
दादा कर्णिक रेल्वेत ऑडीटर म्हणून काम करून रेल्वेतूनच निवृत्त झाले.एक दिवशी मला भेटायला म्हणून माझ्या घरी आले होते.ऑडीटरचं मुळ काम म्हणजे हिशोब चोख तपासायचे,आणि त्यात काही गफलत दिसली तर ती मॅनेजमेन्टच्या नजरेस आणायची. मी कर्णिकांना म्हणालो, "हिशोबातली वास्तविकता पडताळून पहात राहिल्याने खर्‍या आयुष्यात पण त्याच दृष्टीने पहाण्याची तुम्हाला संवय झाली असेल नाही काय?" मला दादा कर्णिक म्हणाले, "गेल्या साठ वर्षाचं माझं जीवन- किंवा एकप्रकारची विस्फोटक स्थिती म्हटलं तरी चालेल- पाहिल्यास ज्या प्रकारे माझा निर्वाह व्हायचा आणि कधी कधी उन्नति पण व्हायची त्याचं मुख्य कारण मी नेहमीच नव्या वास्तविकतेला-reality

एक अनुभव

विमुक्त ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काल मी PMT नं डेक्कनला चाल्लो होतो.. मी पुरुषांच्याच seat वर बसलो होतो... बस एकदम full भरली होती... महिलांसाठी राखीव असलेल्या seats वर बरेच पुरुष बसले होते... एका स्टाँपवर आजीबाई चढल्या... माझ्या seat जवळ येऊन उभ्या राहील्या... मला वाटलं की त्या कोणाला तरी उठवतील (राखीव seats वर बसलेल्यांपैक्की )... पण नाही.... त्या तश्याच उभ्या राहील्या... मग मीच उठून आजीबाईंना बसायला दीलं (एकतर....महिलांसाठी राखीव असलेल्या seats वर बसलेल्या एकातरी पुरुषानं आजीबाईंना बसायला द्यासला हवं होतं..

कर्नाळा - जैत रे जैत

विमुक्त ·
लेखनविषय:
गो.नी.दां. च्या दुर्ग भ्रमण गाथेत कर्नाळ्या बद्दल वाचल्या पासुन मला तीथं जायच होतं. नंतर जैत रे जैत बघीतल्या पासुन तर कधी एकदा लिंगोबाला (कर्नाळा) जातोय असं झालं होतं. अलीबाग हून पनवेल ला जाताना S.T. च्या खिडकीतून कर्नाळा बऱ्याचदा बघीतला होता, पण जाणं काही जमलं नव्हतं. एका weekend ला यशदीप आमच्या घरी आला होता. तेंव्हा आम्हां तिघांचा (मी, मझा भाऊ प्रसाद आणि यशदीप ) कर्नाळ्याला जायचा प्लान ठरला. पनवेल पर्यंत बस आणि मग पनवेल हून कर्नाळ्याला जायला टम-टम मधे बसलो. पनवेल हून पेणच्या दिशेने ५-६ km पुढे गेलो की रस्ता कर्नाळ्याच्या जंगलातूनच जातो आणि झाडीतून लिंगोबा डोकावताना दिसतो.

सकाळी सूर्योदयाबरोबर उठावं, आणि रात्री सूर्यास्ताबरोबर झोपावं.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेली तीस-पस्तिस वर्षं भाई नेरूरकर एका शाळेत शिक्षक म्हणून काम करीत आहेत.रोज पहाटे पांचला ऊठून दिवसाची सुरवात करायचे ते रात्री सर्व कामं आटपून झोपायला त्यांना अकरा वाजायचे.आणि परत दुसरा दिवस उजाडल्यावर परत तेच. समाजातले सर्वच जण असंच करतात म्हणा.

माणसाच्या ज्ञानाला मर्यादा.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"माणसाच्या ज्ञानाला मर्यादा आहेत.त्यामुळे सगळ्याच गोष्टीचं ज्ञान असणं कठीण आहे आणि तुम्ही म्हणता तसं मग ते बौद्धिक असो,व्यावहारीक असो वा अध्यात्मिक असो." आज बाहेर फारच उष्मा होत असल्याने मी प्रो.देसायांना म्हणालो, "भाऊसाहेब आज तळ्यावर जाण्याचं रद्द करून आपण इथे आमच्याच घरी चर्चा करूंया" "तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात.अहो, मी तुमच्या घरी येईपर्य़ंत मला इतकं गरम झालं की सहन होई ना!.तरूणपणात भर उन्हात आमच्या गांवाला एका डोंगरावरून दुसर्‍या डोंगरावर चढून जाण्याची आमच्यात शर्यत लागायची.दोन तीन बाटल्या पाणी ढोसल्यावर जीव शांत व्ह्यायचा.पण एव्ह्डी कोलाहल होत नसायची." मी म्हणालो, "भाऊसाहेब आता "ag