Skip to main content

कथा

" मित्र हवा असल्यास एकच मार्ग आहे कुणाचा मित्र झालं पाहिजे."

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 18/09/2009 06:06 या दिवशी प्रकाशित केले.
"मला वाटतं, लोक जोपर्यंत त्यांना जे वाटतं ते कसलीच भिडभाड न ठेवता बोलूं शकले तर त्यांना भविष्याबद्दल आशावादि राहायला काहीच हरकत नसावी." माझ्या आईच्या जून्या घराची डागडूजी करायला मला माझ्या गावी जावं लागलं.पैसे आहेत म्हणून सरळ कॉन्टॅक्टरला बोलवून घर दुरस्त करता येत नाही.हे मला गांवात गेल्यानंतर कळलं.म्युनिसिपालिटीची परवानगी असावी लागते.प्लान पास करून घ्यावा लागतो.वगैरे वगैरे.मी घेतलेल्या सुट्टीत ही कामं पुर्ण होतील ह्याची मला खात्री नव्ह्ती.पण एकदाचा म्युनिसिपालिटिच्या कचेरीत गेलो.चौकशी केल्यावर मला कळलं.

दयाशील असणं ही एक प्रकारची देणगी आहे.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 17/09/2009 07:01 या दिवशी प्रकाशित केले.
"जेव्हा दयाशीलता आणि प्रेम ह्या मधली संदिग्धता जास्त स्पष्ट होत जाते तेव्हा त्या मधली बारकाई पाहून मी बराच प्रभावित होतो." कमलाकर धारणकर हा माझा शाळकरी दोस्त.आपल्या आईवडीलांचा एकूलता एक मुलगा.म्हणून लाडावलेला नव्हता. लहानपणापासूनच तो हुशार आणि शिस्त बाळगून होता.हे गुण त्याच्या अंगात उपजतच आले होते.कधी कधी आम्ही भेटलो की बालपणाच्या आठवणी काढून गप्पा मारतो.आणि आता ह्या वयावर त्यावेळच्या मनावर बिंबवून गेलेल्या आठवणीत ठेवण्यासारख्या घटनांचं चर्वीचरण करून एखाद्या तरी निर्णयाला येतो.कमलाकर मनाने अळकूळा होता.जरा मन दुखलं की रडायचा. "तू लहानपणी खूपच भावनाप्रधान होतास.तसाच आता आहेस का?

दिर्घ आयुष्याची गुरूकिल्ली.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 15/09/2009 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
"समूहात गाणं म्हणजेच तल्लीन होऊन गाणं.सहमूहात गाताना इतर वाद्दांची जरूरी भासत नाही.तसंच सर्वांमधे सामिल होऊन गाणं म्हटल्याने स्वतःला समूहात विलीन झाल्यासारखं वाटतं." मी मधे खानोलीला जत्रा पहायला गेलो होतो.जत्रेला खूपच मजा आली.त्यानंतर मी एक आठवडा खानोलीत मुक्काम केला होता.विषेश करून मला खानोलीची समुद्रचौपाटी खूपच आवडते.आणि जास्तकरून घाटीच्या माथ्यावरून फेसाळलेला तो समुद्र पाहून मन प्रसन्न होतं.आठ दिवसाच्या मुक्कामात मी रोज घाटीवर चढून जात असे.रोज कोण ना कोण तरी गावातले प्रतिष्टीत बरोबर फिरायला यायचे किंवा वाटेत भेटायचे.असेच एकदा मला प्रमोद खानोलकर आणि त्यांचे स्नेही विजय खानोलकर भेटले.घाटी चढ

लहान लहान विचार.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 13/09/2009 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी आम्ही मुंबईहून न चुकता उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात आंबे, गरे,बोंडू खाण्यासाठी आणि विश्रांती आणि मजा मारण्यासाठी जात असूं. आता संसाराच्या रग्याड्यात,तसंच ऑफिसच्या कामाच्या व्यापात कोकणातल्या आमच्या खेपा त्यामानाने कमीच झाल्या आहेत. पण कधी कधी उलटं होतं.अलीकडे कोकणातून उन्हाळ्याच्या सुट्टीत आमची मित्रमंडळी आणि नातेवाईक मुंबईला येतात.

धो-धो पावसात ठाणाळ्याहून तेलबैला...

लेखक विमुक्त यांनी शुक्रवार, 11/09/2009 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
"हँलो आई, मी पालीला आलोय... आता बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊन भटकायला जाणार आहे" मी. "अरे, पण तू तर साताऱ्याला जाणार होतास ना आज?" आई. "हो, पण अजित आणि सरांचा आज भटकायला जायचा बेत होता... मग मला राहवलं नाही... उद्या जातो साताऱ्याला" मी. "बर..." आई. असं अचानकच अजित आणि सरांसोबत मी भटकायला निघालो. ठाणाळ्याहून वाघजाई घाटानं चढून तेलबैलाला पोचायचा बेत होता. गर्दी नसल्यामुळे बल्लाळेश्वराचं दर्शन निवांत झालं. सकाळी पुण्याहून उपाशी पोटीच निघालो होतो, मग देवळा जवळच एका हॉटेल मधे खाऊन घेतलं. हॉटेल मधे चौकशी केल्यावर कळालं, की डायरेक्ट ठाणाळ्याला बस जात नाही. "पालीहून नाडसूरला जा आणि तिथून २-३ कि.मी.

अंगात चांगूलपणा सहजासहजी येत नसतो.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 11/09/2009 07:54 या दिवशी प्रकाशित केले.
"मी माझ्या लेखनात नेहमी, स्वातंत्र्य,कायद्याची अंमलबजावणी,ईश्वराचं महत्व आणि धर्मातून ईश्वराकडे पोहोचणं ह्या विषयावर लिहित असते." कमला पेंडसे यांचे बरेचसे लेख मी काही मासिकात वाचले आहेत.निरनीराळ्या विषयावरचे त्यांचे लेख वाचायला मला आवडतं.कधी तरी त्यांना प्रत्यक्ष भेटून हे विषय त्यांना कसे सुचतात म्हणून विचारावं असं माझ्या मनात नेहमी यायचं. माझा मित्र नाना पेंडसे ह्याला मी एक दिवस सहज विचारलं, "काय रे नाना, ही कमला पेंडसे जी लेखिका म्हणून प्रसिद्ध आहे ती तुझी आडनांव-भगीनी आहे का, की तुझं तिच्याशी खरंच नातं आहे.?" आश्चर्याची गोष्ट म्हणजे नाना म्हणाला, "अरे ती माझी सख्खी चुलत बहिण आहे.दादरला गो

भेट...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी शुक्रवार, 11/09/2009 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
टर्रर्रर्रर्र... घड्याळानं भोकाड पसरलं आणि अगदी एका सेकंदात आबासाहेबाचा सरावलेला हात गाप्पकिनी त्या घड्याळाच्या डोक्यावर आपटला. घड्याळाचा आवाज बंद. आबासाहेबानं नुसती कूस बदलल्यासारखी केली आणि परत पहाटेच्या गुलाबी थंडीत विरून गेला. खरं तर आबासाहेबाला घड्याळाची गरजच नव्हती. शाळेत असल्यापासून पहाटे ५ वाजता उठायची सवय लागली होती. आणि आता गेल्या १०-१२ वर्षात तर ही सवय इतकी अंगवळणी पडली होती की एकवेळ घड्याळ बंद पडेल पण आबासाहेबाचा डोळा ५ वाजता उघडणार नाही असं होणारच नाही. शाळेत कॉलेजात अभ्यास तरी असायचा, आता तेही नाही, तरीही येतेच जाग. लोळता लोळता आबासाहेबाला परत छान डुलकी लागली.

कथा प्रवृत्ती निवृत्तीची

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 09/09/2009 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्व प्रसिद्धी - रविवार सकाळ, १९.०४. १९९८ राजा विक्रमादित्याने आपला हट्ट काही सोडला नाही. त्याने झाडावरचे प्रेत आपल्या खांद्यावर ऒढून घेतले आणि तो स्मशानाचा रस्ता चालू लागला. राजाच्या चिकाटीने प्रभावित होऊन प्रेतामधला वेताळ मानवी वाणीने बोलू लागला आणि म्हणाला, "राजा तुझ्या जिद्दीचे मला खूप कौतुक वाटतॆ. तुझे कष्ट थोडेफार हलके व्हावेत म्हणून मी तुला एक गोष्ट सांगतॊ." "फार पूर्वी या पृथ्वीतलावर प्रवृत्तिपाद आणि निवृत्तिपाद या नावाचे दोन फार मोठे राजे होऊन गेले. प्रवृत्तिपादाच्या राज्याचे नाव होते प्रवृत्तिपुर आणि निवृत्तिपादाच्या राज्याचे नाव होते निवृत्तिपुर.

म्हाळसाक्का.. ३

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 08/09/2009 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
म्हाळसाक्का १ म्हाळसाक्का २ तो ही चालू लागला. कुठेतरी या म्हातारीबद्दल माया वाटू लागली होती. "काम मिळाले की या म्हातारीला भेटायला यायचं पुन्हा" असा निश्चय त्याने केला.. पण इतक्यात.. काम??? दामू कडं... !! काय सांगायचं ??म्हातारीनं पाठवलं म्हणून?? कोण म्हातारी?? कुठली?? नाव काय?? दामूला कुठल्या म्हातारीनं पाठवलं म्हणून सांगायचं?? त्याला काहीच सुधरेना.. हिचं नाव आपण परत विचारलंच नाही. काय करायचं?? बघू!! काहीतरी करूच.. दामूने नाही दिलं काम तर दुसरीकडे कुठेतरी करू..