मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कथा

मी अनुभवलेला कोसला...

अज्ञात ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
खूप दिवसांपूर्वी वाचनात भालचंद्र नेमाडेंचा कोसला आल... (तसा मी वाचन वेडा अज्जिबात नाही... मी एवढा आळशी आहे कि एखादा पुस्तक संपवायला मला महिना वगैरे लागतो.. ) तर सुरवातीला पुस्तक हे साधाच वाटल... पण जस जस वाचत गेलो तसं तसं हे पुस्तक भलतच आवडायला लागल... हे पुस्तक वाचल्यावर मी खूप अस्वस्थही झालो. हे पुस्तक १९६५ च्या काळात लिहील असल तरी आजच्या तरुणाईच्या मानसिकतेचा ठाव घेणार आहे ... पुस्तक वाचून अस्वस्थ होण्यामागच खर कारण म्हणजे ह्या पुस्तकात लेखकाने नायकाची जी तगमगीचे .. मानसिक घाल्मेलीचे वर्णन केलेले आहे ते मला माझे स्वतःचे वर्णन वाटले..

बंध माळेचे

अरुण मनोहर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बंध माळेचे डायरीचे पान मिटवून भैय्याजींनी एक दीर्घ निश्वास सोडला. आजचा नामजप पूर्ण झाला होता. तस म्हटलं तर अजूनही जास्त करता आला असता. पण आज नको. आज रविवार असल्यामुळे सुशांत घरीच होता. एरवी तो कामावर गेला, आणि छोट्याला शाळेत पोहचवले की घरात फ़क्त भैय्याजी, बायको-प्रमिला आणि सून. कसा शांत आणि भरपूर वेळ मिळायचा. भैय्याजी नाम-सागरात, किंवा एखाद्या पुस्तकात स्वत:ला बुडवून घेत. सासु सुनेची स्वयंपाक घरातील आवरासावर संपली, की पूर्ण घर निस्तब्धतेच्या डोहात बुडून जायचे. अशा वेळी नामस्मरण करण्यात कशी वेगळीच अनुभुती यायची. रविवारी घरातील सगळे उगाचच प्रचंड उत्साहाने कोलाहल करीत असायचे.

भयंकर षडयंत्र

सागर ·
लेखनविषय:
डिस्क्लेमर : सदर कथा काल्पनिक असून त्याचे कोणत्याही घटनेशी वा व्यक्तीशी साम्य आढळल्यास योगायोग समजावा. *** वेळेअभावी संक्षिप्त स्वरुपात हे कथानक लिहितो आहे. *** भयंकर षडयंत्र उपोद्घातः फेब्रुवारी १९९८ अफगणिस्थानातील तोराबोरा या दुर्गम इलाख्यातील एक प्रशस्त गुहा आपल्या पॉश सोफ्यावर राजेशाही थाटात पाय पसरुन तो बसला होता. सोनी टीव्ही च्या आलिशान पडद्यावर तो अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्राध्याक्षांचे भाषण लोकांना मंत्रमुग्ध कसे करते हे तो पहात होता. गेली कित्येक वर्षे तो हे करत होता.

बिच्चूची गोष्ट

नगरीनिरंजन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
(मनोगतावर पुर्वी प्रकाशित झालेली माझी ही कथा इथे पुनर्प्रकाशित करीत आहे.) बिच्चू सकाळी ठरलेल्या वेळी जागा झाला तेव्हा नेहमीप्रमाणेच त्याच्या आजूबाजूला आई बाबा नव्हते. त्याना नेहमीच मालक-मालकीणबाईंच्या आधी उठावं लागे. जाग आल्याबरोबर बिच्चू छोट्या मालकीणबाईंच्या खोली कडे चालू लागला. किचनमधून जाताना त्याने आईकडे पाहिले तेव्हा ती ब्रेकफास्टची तयारी करत होती. तिने एकदा बिच्चूकडे पाहिले आणि पुन्हा आपल्या कामात गढून गेली. छोटासा बिच्चू तुरुतुरू चालत छोट्या मालकीणबाईंच्या खोलीच्या दाराशी पोचला. त्यांना उठवायची वेळ जवळजवळ झालीच होती.

घनश्याम सुंदरा

अरुण मनोहर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पहाट नेहमी कसा नवीन तजेला घेऊन येते! रात्रीचा अंधार कालच्या सगळ्या विवंचना, दु:खे घेऊन दूर पळून गेलेला असतो. त्या काळज्यांच्या सावल्या भले नंतर पुन्हा येवोत. पण उन्हाबरोबर परत येऊन त्यांनी मनाला अजून तरी झाकोळून टाकलेले नसते. तेव्हा हा वेळ चोवीस तासांमधला एकदम टवटवीत आणि बिनधास्त वेळ असतो. जो काही उद्योग आपण ह्या प्राईम टाईम मधे करू, त्यात प्रचंड सुख मिळते. कारण सुखाला अधूनमधून छेद देणाऱ्या कटकटींचे तात्पुरते का होईना, पहाटेच्या वेळेत विस्मरण झालेले असते.

शब्द

अरुण मनोहर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी सिगारेट का सोडली. श्री सुधीर काळे ह्यांचा लेख वाचून पुर्वी लिहून ठेवलेली ही स्वानुभवाची कथा आठवली. ....... ' शब्द. फ़ोनची घंटी वाजताच स्वातीने धावत जाऊन फ़ोन उचलला. मी अगदी मजेत आहे आई. तू काळजी करू नको. काळजी वाटणारच गं! लग्नानंतर इतक्या लांब गेलीस. तिथे तुम्ही दोघेच. सगळं घर लावायचं. कोणी मदतीला नाही..... विकास काय म्हणतात? त्याचं काम छान सुरू आहे. संध्याकाळी तसा लवकरच घरी येतो. दिवसभर मी एकटीच घरी. तू काळजी घे बाई. आई तू आली असतीस आमच्याबरोबर तर किती छान झाले असते! पण तुझी शाळा.

दुर्मुख

तिमा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
संध्याकाळ झाली होती. नेहेमीप्रमाणेच दुर्मुख स्वयंपाकघरात चहा घेत बसला होता. बेल वाजली. त्याने तत्परतेने दरवाजा उघडला. बायकोच्या हातातल्या जड पिशव्या आत आणून ठेवल्या. वॉश घेऊन आल्यावर तिने म्हटले," खायला आणले आहे, सामोसे आणि बंटीचा आज वाढदिवस आहे ना , म्हणून आइसक्रीमही आणले आहे." बिचारी दिवसभर नोकरी करुन स्टेशनवर उतरल्यावर, बाजारहाटही करत होती. दुर्मुखला नैराश्याचा झटका आल्यापसून तो घरातले काहीच काम करत नसे. ऑफिसला जाऊ लागला होता हेच नशीब! बायको त्याला चांगलीच संभाळून घेत होती. आईची चाहूल लागताच रुमचा दरवाजा उघडून बंटी बाहेर आला.