Skip to main content

कथा

ती...

लेखक भारतीय यांनी सोमवार, 26/07/2010 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
ती... कोण होती ती? तसं माझं अन् तिचं नातं नव्हतच. साधारण ६ वर्षांपूर्वी तिचं आमच्या समोर राहणार्‍या एका तरुणासोबत लग्न झाल्यामुळे आमच्या समोर रहावयास आलेली.. पण मोकळा स्वभाव असल्यामुळे आमच्याही घरी कायम येणे जाणे.. त्यातून उलगडत गेली ती आणि तिचं आयुष्य.. तिला सख्खा भाऊ नव्हता म्हणून मला भाऊ मानलं.. आणि आता ही नात्याची वीण एवढी घट्ट झालीये की ती मला माझ्या सख्ख्या बहीणींईतकीच प्रिय..आणि म्हणूनच 'ती'ची कथा ईथे मांडावीशी वाटली.. ती.. अक्षरशः गोरीपान, सुंदर.. सोनेरी केसांमुळे गर्दीतही सहज ओळ्खू येणारी.. तिचं ५वी पर्यंत शिक्षण गावीच तिच्या वडीलांजवळ झालं.

आजोळ

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 26/07/2010 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे किती वेळ लावताय पोरांनो गुच्छ करायला! माझे बघा बरं सहा गुच्छ तयारही झाले." रत्नामावशीचा उत्साह अगदी सळसळून वहात होता! कॉफी घेऊन आलेल्या केतकीला तिनं लहान मुलाच्या कौतुकानं मुलांनी बनवलेले गुच्छ दाखवले. सगळी तयारी अगदी जय्यत झाली होती. आज रत्नामावशीच्या पाळणाघराचा 'आजोळ'चा पहिला वाढदिवस होता. साठीच्या घरातली रत्नामावशी अगदी लहान मूल झाली होती! तिला असं आनंदानं रसरसलेलं पहाताना केतकी खूप खूप मागे गेली. रत्ना, केतकीच्या आईची दूरच्या नात्यातली बहीण. आठ बहिणी आणि एक भाऊ यांच्यातली सगळ्यांत धाकटी. बालपण असं तिला लाभलंच नाही.

आषाढी एकादशी काही कथा

लेखक बज्जु यांनी बुधवार, 21/07/2010 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
आषाढी एकादशी:- म्रुदुमान्य नावाच्या एका दैत्याने शंकराची आराधना करुन त्याला प्रसन्न करुन घेतले आणि त्याच्याकडून वर मिळवीला की त्याला कोणत्याही प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही, फ़क्त एका स्त्रीच्या हातून तो मरेल. या म्रुदुमान्याने या वराच्या जोरावर सर्व देवांना जिंकले आणि श्रीविष्णूस जिंकण्यासाठी तो वैकुंठास गेला, उभयतांच्या लढाईत श्रीविष्णूचा पराभव होऊन तो शंकराकडे गेला पण शंकरही आपल्या वरामुळे हताश झाला होता. नंतर ब्रम्हा - विष्णू - महेश व सर्व देव एका पर्वताच्या गुहेत लपुन राहिले. तिथे काही दिवसानी ब्रम्हा - विष्णू - महेश या तीघांच्या श्वासाने एक देवी उत्पन्न झाली.

टणत्कार (खुलाशासह )

लेखक अवलिया यांनी सोमवार, 19/07/2010 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
किर्र किर्र रातकिड्यांचा आवाज चालु होता. गेल्या दोन दिवसांपासुन पावसाचा जोर कमी झाला म्हणुन पर्णकुटीच्या बाहेरच गवताची शय्या केली होती. तिच्यावर पडल्या पडल्या आभाळात नजर टाकता टाकता कधी डोळा लागला ते कळलंच नाही. गार हवेने आता जाग आली. मधुनच दोन चार चुकार ढग हळुच चालले आहेत. पुर्वेकडे चंद्रकोर दिसत आहे म्हणजे पहाट व्हायला आली असावी. कृष्ण पक्ष चालु आहे. बोलता बोलता चार महीने झाले ह्या पर्णकुटीत राहुन. येवढा पावसाळा संपला की आपण कामाला लागु हे आश्वासन मिळाले अन त्या आश्वासनावर मनातले दुःख कसं बसं सावरुन धरलं आहे. पण असं तर नाही ना की माझे काम तो विसरुन गेला असेल?

गाढव, रानडुक्कर, घुबड, कोल्हा आणि सिंह

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 16/07/2010 06:29 या दिवशी प्रकाशित केले.
पंचतंत्रात प्राणीजगतातली पात्रे घेऊन अगदी सोप्या भाषेत जीवनाचे तत्वज्ञान सांगणार्‍या नितीकथा आहेत. आजच्या औद्योगीक (कॉर्पोरेट) जगातले प्राणी कसल्या कथा सांगत असतील? माझ्या कल्पनेतून काही कथांची भर घालण्याचे ठरवले. आणि काही नवयुगाच्या औद्योगीक पंचतंत्र कथा जन्माला आल्या. मी या आधी ही कथा मिपावर टाकली होती. पण काही वाचकांनी ती संस्थळावरील घडामोडींच्या संदर्भात वाचली. त्यामुळे गैरसमज नको, म्हणून आणखी जास्त दंगा होण्याआधी ती काढून टाकली. मग नीट विचारांती ह्या टिपणी सह द्यायचे ठरवले. ह्या कथा स्वरचित आहेत. औद्योगीक जगातले अनुभव प्राण्यांच्या मुखवट्यामधून दाखवून रुपके रचली आहेत.

कॉलेज कट्टा भाग - अंतिम

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 16/07/2010 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
---भाग - १ --- ---भाग - २ --- ---भाग - ३ --- ---भाग - ४ --- ---भाग - ५ --- "ज्या पोरी पोरांवर जाळं टाकायला सुरुवात करतात, त्त्यांच्यावर नजर ठेवुन मोका मिळताच त्यांना खलास करायचं" - रुपेश सगळ्यांचे रक्ताळलेले सैतानी डोळे एकमेकाकडे बघत होते. आतल्या ज्वालामुखीला वाट मिळाली होती.

राजयोग

लेखक हर्षद आनंदी यांनी गुरुवार, 15/07/2010 01:57 या दिवशी प्रकाशित केले.
काशिब, तसे भारताच्या नकाशावरील शोधुनही न सापडणारे गाव. इतर कुठल्याही गावासारखेच शांत आणि सुंदर. निसर्गरम्य. गावातुन वाहणारी नदी, दोन्ही तीरावर विस्तीर्ण शेती. गावकरी गरीब पण खाऊन - पिऊन सुखी. स्वातंत्र्यानंतर जी काही स्थित्यंतर झाली, त्याचे पडसाद गावावर पण पडले. अशातच पाटलचा पोरगा सुर्याजी आधी सरपंच मग आमदार झाला आणि गावाने जणु कातच टाकली. सुर्याजीने आणि त्याच्या पूढच्या पीढीने गावाचा नकाशा पार बदलुन टाकला. घरा घरात वीज आली, पक्के रस्ते झाले. गावा बाहेरच्या जंगलाची साफ-सफाई करुन दोन-तीन कारखाने पण आले. गावात एस.टी तर होतीच, पण आता दोन-चाकी, चार-चाकी पण गावात दिसायला लागल्या.