Skip to main content

कथा

तु आणि मी (मिसळपाव स्टाईल!)

लेखक इंटरनेटस्नेही यांनी शुक्रवार, 24/09/2010 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपावच्या इतिहासात प्रथमच खफ वरील साहित्य इथे प्रकाशित करतो आहे. आपण धाग्याचा खफ अनेकदा झालेला पाहिला असेल पण ही अशी ही पहिलीच वेळ असावी की आम्ही खफचाच धागा करुन एक प्रकारे बॅकवर्ड इंटीग्रेशन केले आहे. तरी कोणत्याही पुर्वग्रहदुषित नजरेने आमच्या सदर धाग्याचा आस्वाद घ्यावा आणि प्रतिक्रियांचा पाऊस त्यावर पाडावा ही न्रम विनंती. हे साहित्य आमचे एकट्याचे नसुन आमच्या ह्या योजनेत अभावितपणे सहभागी झालेल्या श्री नावातकायआहे, श्री भेन्डिबाजार, श्री कुक, श्री स्वानंद व सौ.

पाचवी ’क’ परंपरा पाळतो

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 24/09/2010 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
खाटोळी बुद्रुक गावी पानतवणे पाटलांनी मागील वरशीपासून कळशीबाई पानतवणे पाटील माध्यमिक शीकशण सौंस्ता सुरू केली होती. आत्तापावरतो चौथीच्या फ़ुड शिकशाण घेयला धा कोसावर्च्या तालुक्याला जाव लागायच. पानतवणे पाटलांचा पोरगा जीतू, चौथी पास झाला, तेव्हा केवळ त्याच्यासाठी म्हनून पाटलांनी आपल्या स्वरगीय पत्नीचे नांव देऊन माध्यमीक शाळा सुरू केली. दमादमानं वाढवू म्हनून आधी येकच वर्ग म्हनजे इयत्ता पाचवी सुरू केला. आता दमादमानं वाढणार म्हनजे दर वर्शी जीतूबरोबरच फ़ुडच्या वर्ग सुरू होनार हे सगळ्यांना ठावं होतंच. घरबसल्या आपली पोर म्याट्रीकपातूर जाणार म्हनून गाववाले पाटलांवर खूष होते.

नीळा पक्षी

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 24/09/2010 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
साठीला आली होती ती. क्षणांची वाळू झरझर झपाट्यानी काळाच्या चाळणीतून गळून जात होती. आताशा रोज तिची कंबर दुखत असे, हाडं कुरकुरत, पायात गोळे येत असत पण अजूनही नीळा मखमली पक्षी दिसायचं नाव नव्हतं. परंतु त्या पक्षाची आस, त्याचं तिच्या मनावरचं गारुड तसूभरही कमी झालं नव्हतं. लहानपणी नीळ्या मखमली पक्षाला भेटण्याचं जितकं वेड होतं त्याहीपेक्षा जास्त वेड आता तिला लागलं होतं. या पक्षाचं गुपीत नक्की केव्हा तिने ऐकलं तिलाही सांगता येणार नाही कारण ते तसं कोणी सांगीतलच नव्हतं तिला. ते तिला मनोमन आकळलं होतं. तिला जोपर्यंत आठवत होतं तोपर्यंत तिला त्याला भेटण्याच्या ध्यासानी झापटलेलं होतं हेच आठवतं होतं.

मीमीची गोष्ट

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 23/09/2010 07:54 या दिवशी प्रकाशित केले.
मीमी एका भरल्या कुटुंबातली मुलगी. ह्या कुटूंबाचा एक असा काही पत्ता सांगता येणार नाही. शोधले की कुणीही सांगेल. प्रत्येक पेठेत अशी घरे आणि घरा घरात अशी माणसे दिसतील. विविधतेत एकता म्हणा हवे तर! घरी आजोबा-आजी, बाबा-आई, लग्न झालेला मोठा भाऊ-वहिनी, त्यांचे छोटे बाळ, आणि ताई, असे मीमीचे भरगच्च कुटुंब. आजोबा, आजी, भाउ वगैरे नाती त्या त्या लोकांविषयी बोलतांना काही नावे द्यायची म्हणून दिलेली नावे. नाहीतर मीमीचे कोणाशी खास असे नाते नाही. नेहमी आपल्या आपल्यामधेच गुरफ़टून असते ती. मात्र ह्या सगळ्यांची मीमी ही एक अतिशय लाडावलेली मैत्रीण. अगदी वाया गेलेलीच म्हणा ना! पण नको. तसे नाही म्हणुया.